Rohit Sharma | दुसरा सामना ड्रॉ झाल्यानंतर कॅप्टन रोहित शर्मा याचं ट्विट, म्हणाला, “मुंबई…”
Team India Captain Rohit Sharma | कॅप्टन रोहित शर्मा याने वेस्ट इंडिज विरुद्धचा दुसरा कसोटी सामना ड्रॉ झाल्यनंतर एक ट्विट केलंय. हे ट्विट सोशल मीडियावर व्हायरल झालंय.
त्रिनिदाद | वेस्ट इंडिज विरुद्ध टीम इंडिया यांच्यातील त्रिनिदादमध्ये खेळवण्यात येणारा कसोटी मालिकेतील दुसरा आणि अंतिम सामना हा अनिर्णित राहिला. टीम इंडियाने विंडिजला विजयासाठी 365 धावांचं आव्हान दिलं होतं. विंडिजने चौथ्या दिवसापर्यंत 2 विकेट्स गमावून 76 धावा केल्या. त्यामुळे पाचव्या दिवशी विजयासाठी वेस्ट इंडिजला 289 रन्सची गरज होती. तर टीम इंडियाला मालिका 2-0 अशा एकतर्फी फरकाने जिंकण्यासाठी 8 विकेट्स हव्या होत्या. टीम इंडियाला पूर्णपणे सामना जिंकण्याची संधी होती. त्यामुळे पाचव्या दिवसाची क्रिकेट चाहत्यांना प्रतिक्षा होती.
मात्र पाचव्या दिवशी त्रिनिदादमध्ये 80 टक्के पाऊस होणार असा अंदाज वर्तवण्यात आला होता. हवामानाचा अंदाज खरा ठरला. पाचव्या दिवसापासून जोरदार पावसाला सुरुवात झाली. पाऊस थांबण्याची प्रतिक्षा क्रिकेट चाहच्यांना होती. आता थांबेल, नंतर थांबेल असं म्हणता म्हणता पावसामुळे पहिल्या सत्राचा खेळ वाया गेला. त्यानंतर रात्री 10 वाजून 45 मिनिटांनी सामन्याला सुरुवात होईल, अशी माहिती बीसीसीआयने दिली.
मात्र त्यानंतरही सामन्याला सुरुवात झाली नाही. काही वेळ विश्रांती घेत्यानंतर पाऊस पुन्हा सुरु झाला. त्यामुळे अखेर सामना अनिर्णित राहिला. टीम इंडियाला हा सामना जिंकून वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप 2023-25 पॉइंट्स टेबलमध्ये अव्वल स्थान आणखी भक्कम करण्याची संधी होती. पण मॅच ड्रॉ झाल्याने टीम इंडिया आणि वेस्ट इंडिजला प्रत्येकी 4-4 पॉइंट्स मिळाले. या पॉइंट्समुळे टीम इंडियाच्या विजयी टक्केवारीवर परिणाम झाला. त्यामुळे टीम इंडियाची दुसऱ्या क्रमांकावर घसरण झाली. तर पाकिस्तान अव्वलस्थानी पोहचली.
पावसामुळे संपूर्ण सामन्याचा खेळखंडोबा झाला. टीम इंडियाच्या हाताशी आलेला विजय पावसाने हिरावून घेतला. सातत्याने झालेल्या या पावसामुळे टीम इंडियाचा कॅप्टन रोहित शर्मा याने एक ट्विट केलं. हे ट्विट चांगलंच व्हायरलं झालंय.
रोहित शर्मा याचं ट्विट
Mumbai ya Trinidad ??️ pic.twitter.com/jOPINPXW4a
— Rohit Sharma (@ImRo45) July 25, 2023
रोहित शर्माने सामना ड्रॉ झाल्यनंतर दुसऱ्या दिवशी अर्थात 25 जुलै रोजी सकाळी 7 वाजून 45 मिनिटांनी ट्विट केलंय. रोहितने या ट्विटमध्ये टीम इंडियासोबतचा पावसातला फोटो पोस्ट केलाय. “मुंबई आहे की त्रिनिदाद”, असं कॅप्शन रोहितने या फोटोला दिलंय.