WI vs IND 3rd Odi | टीम इंडियासाठी प्रतिष्ठेचा सामना, मालिका जिंकण्याचं आव्हान, कोण जिंकणार?

India vs West Indies 3rd ODI | टीम इंडियासाठी विंडिज विरुद्धच्या तिसरा आणि शेवटचा सामना हा 'करो या मरो' असा आहे.

WI vs IND 3rd Odi | टीम इंडियासाठी प्रतिष्ठेचा सामना, मालिका जिंकण्याचं आव्हान, कोण जिंकणार?
Follow us
| Updated on: Aug 01, 2023 | 5:08 PM

त्रिनिदाद | वेस्ट इंडिज विरुद्ध टीम इंडिया यांच्यातील एकदिवसीय मालिकेतील तिसरा आणि अंतिम सामना हा आज 1 ऑगस्टला खेळवण्यात येणार आहे. ही मालिका 1-1 ने बरोबरीत आहे. त्यामुळे तिसरा सामना हा निर्णायक आणि सीरिज डिसायडर आहे. तसेच दोन्ही संघांना मालिका विजयाची संधी आहे. मात्र जिंकणार कोणतीतरी एकच टीम. त्यामुळे दोन्ही संघांनी सामन्यासह मालिका जिंकण्यासाठी नेट्समध्ये रेटून सराव केला आहे.

टीम इंडियाने मालिका जिंकली तर निश्चितच आगामी आशिया कप आणि वनडे वर्ल्ड कपच्या पार्श्वभूमीवर विश्वास दुणावेल. मात्र जर पराभवाचा सामना करावा लागला तर टीकेचा सामना करावा लागेल. कारण टीम इंडियाने 2006 पासून विंडिज विरुद्ध एकही द्विपक्षीय मालिका गमावलेली नाही. त्यामुळे टीम इंडियासाठी ही मालिका प्रतिष्ठेची आणि सन्मानाची झाली आहे.

टीम इंडियाने पहिला सामना जिंकून विजयी सुरुवात केली. तर विंडिजने टीम इंडियावर रोहित शर्मा-विराट कोहली या दोघांच्या अनुपस्थितीत विजय मिळवला. यासह विंडिजने मालिकेत बरोबरी साधली. त्यामुळे तिसरा सामना हा अटीतटीचा झालाय.

हे सुद्धा वाचा

रोहित-विराट खेळणार?

मालिका निर्णायक वळणावर असल्याने तिसऱ्या सामन्यात रोहित शर्मा आणि विराट कोहली या दोघांची पुन्हा एन्ट्री होणार असल्याचं म्हटलं जात आहे. मात्र विराट तिसऱ्या मॅचसाठी टीम इंडियासह गेला नसल्याचंही चर्चा आहे. त्यामुळे विराट आणि रोहित खेळणार की नाहीत, हे काही वेळेत स्पष्ट होईल.

वनडे सीरिजसाठी टीम इंडिया | रोहित शर्मा (कॅप्टन), शुबमन गिल, ऋतुराज गायकवाड, संजू सॅमसन (विकेटकीपर), इशान किशन (विकेटकीपर), विराट कोहली, सूर्यकुमार यादव, शार्दुल ठाकूर, हार्दिक पंड्या (उपकर्णधार), रविंद्र जडेजा, अक्षर पटेल, युझवेंद्र चहल, कुलदीप यादव, जयदेव उनाडकट, उमरान मलिक आणि मुकेश कुमार.

टीम इंडिया विरुद्धच्या वनडे सीरिजाठी वेस्ट इंडिज संघ | शाई होप (कॅप्टन), एलिक एथनेज, यानिक कॅरिया, कीसी कार्टी, डॉमिनिक ड्रेक्स, शिमरॉन हेटमायर, अल्जारी जोसफ, ब्रँडन किंग, रोवमन पॉवेल (उपकर्णधार), काइल मेयर्स, गुडकेश मोती, जेडन सील्स, रोमारियो शेफर्ड, केविन सिंक्लेयर आणि ओशेन थॉमस.

महाराष्ट्राची चिंता वाढली;7 वर्षीय मुलासह 13 वर्षीय मुलीला HMPVची लागण
महाराष्ट्राची चिंता वाढली;7 वर्षीय मुलासह 13 वर्षीय मुलीला HMPVची लागण.
मुडेंनी राजीनामा दिला? राजीनाम्याच्या प्रश्नावर म्हणाले, 'योग्य वेळी'
मुडेंनी राजीनामा दिला? राजीनाम्याच्या प्रश्नावर म्हणाले, 'योग्य वेळी'.
HMPV Virus : तुम्हाला 'ही' लक्षणं दिसताच सावध व्हा अन् अशी घ्या काळजी
HMPV Virus : तुम्हाला 'ही' लक्षणं दिसताच सावध व्हा अन् अशी घ्या काळजी.
मुंडेंच्या भेटीनंतर दादा-फडणवीसांमध्ये बैठक, राजीनाम्याचा दबाव वाढला
मुंडेंच्या भेटीनंतर दादा-फडणवीसांमध्ये बैठक, राजीनाम्याचा दबाव वाढला.
आता माझ्या भावना मेल्यात, नाराज असलेले छगन भुजबळ नेमकं काय म्हणाले?
आता माझ्या भावना मेल्यात, नाराज असलेले छगन भुजबळ नेमकं काय म्हणाले?.
आधी पैसे देणाऱ्यांवरच कारवाई करा, बच्चू कडूंचा सरकारला घरचा आहेर
आधी पैसे देणाऱ्यांवरच कारवाई करा, बच्चू कडूंचा सरकारला घरचा आहेर.
राजीनाम्यावरुन दबाव? मुंडे दादांच्या भेटीला, चर्चेत नेमकं काय ठरलं?
राजीनाम्यावरुन दबाव? मुंडे दादांच्या भेटीला, चर्चेत नेमकं काय ठरलं?.
मुंडे यांनीच 3 कोटींची खंडणी मागितली, सुरेश धसांचा खळबळजनक आरोप अन्...
मुंडे यांनीच 3 कोटींची खंडणी मागितली, सुरेश धसांचा खळबळजनक आरोप अन्....
मुंडेंना अजितदादा पाठिशी घालताय? बीड प्रकरणासंदर्भात धसांचा मोठा दावा
मुंडेंना अजितदादा पाठिशी घालताय? बीड प्रकरणासंदर्भात धसांचा मोठा दावा.
राजीनाम्याची मागणी सुरू असताना धनंजय मुंडे तडकाफडकी दादांच्या भेटीला
राजीनाम्याची मागणी सुरू असताना धनंजय मुंडे तडकाफडकी दादांच्या भेटीला.