WI vs IND 3rd Odi | चौघांची अर्धशतकं, विंडिजची जोरदार धुलाई, विजयासाठी 352 धावांचं आव्हान
india vs west indies 3rd odi | टीम इंडियाकडून शुबमन गिल, ईशान किशन, संजू सॅमसन आणि हार्दिक पांड्या या चौघांनी अर्धशतकी खेळी केली.
त्रिनिदाद | टीम इंडियाने वेस्ट इंडिजला तिसरा एकदिवसीय सामना जिंकण्यासाठी 352 धावांचं आव्हान दिलंय. टीम इंडियाने 50 ओव्हरमध्ये 5 विकेट्स गमावून 351 धावा केल्या. दोन्ही सामन्यात फ्लॉप ठरलेल्या फलंदाजांनी या तिसऱ्या सामन्यात मात्र विंडिजची चांगलीच धुलाई केली. ऋतुराज गायकवाड याचा अपवाद वगळता टीम इंडियाच्या सर्वच फलंदाजांनी धमाकेदार खेळी केली. टीम इंडियाकडून शुबमन गिल आणि ईशान किशन या सलामी जोडीने चांगली सुरुवात करुन दिली. या चांगल्या सुरुवातीचा फायदा नंतरच्या फलंदाजांनी घेतला.
शुबमन गिल आणि ईशान किशन या दोघांनी 143 धावांची सलामी भागीदारी केली. ईशान किशन याने 77 धावा केल्या. ऋतुराज गायकवाड याने निराशा केली. ऋतुराजला केवळ 8 धावाच करता आल्या. दुसऱ्या सामन्यात अपयशी ठरलेल्या संजू सॅमसन यानेही संधीचा फायदा घेत अर्धशतक ठोकलं. संजूने 41 बॉलमध्ये 51 धावांची अर्धशतकी खेळी केली.
टीम इंडियाकडून विंडिजला बेदम चोप
Innings Break!
Brilliant batting display from #TeamIndia! ? ?
8⃣5⃣ for @ShubmanGill 7⃣7⃣ for @ishankishan51 7⃣0⃣* for Captain @hardikpandya7 5⃣1⃣ for @IamSanjuSamson
Over to our bowlers now! ? ?
Scorecard ▶️ https://t.co/boUPUpFuSr#WIvIND pic.twitter.com/rLchdWjPgk
— BCCI (@BCCI) August 1, 2023
शुबमन गिल दुसऱ्या बाजूने आक्रमक पद्धतीने खेळत होता. शुबमनला शतक ठोकण्याची संधी होती. मात्र गुडकेश मोती याने शुबमनला शतक ठोकण्यापासून रोखलं. मोतीने शुबमनला 85 धावांवर आऊट केलं. गिलनंतर सूर्यकुमार यादव याने 35 धावा जोडल्या. कॅप्टन हार्दिक पंड्या याने नाबाद 70 धावांची खेळी केली. तर रविंद्र जडेजा नॉट आऊट 8 रन करुन परतला.
विंडिजकडून रोमरिया शेफर्ड याने सर्वाधिक 2 विकेट्स घेतल्या. तर अल्जारी जोसेफ, गुडाकेश मोती आणि यानिक कॅरिया या तिघांनी प्रत्येकी 1 विकेट घेतली.
टीम इंडिया प्लेईंग इलेव्हन | हार्दिक पंड्या (कॅप्टन), शुबमन गिल, संजू सॅमसन, ऋतुराज गायकवाड, ईशान किशन (विकेटकीपर), सूर्यकुमार यादव, रविंद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, कुलदीप यादव, मुकेश कुमार आणि जयदेव उनाडकट.
विंडिज प्लेईंग इलेव्हन | शाई होप (कॅप्टन आणि विकेटकीपर), कायल मेयर्स, ब्रँडन किंग, एलिक एथनेज, शिमरॉन हेटमायर, रोमारियो शेफर्ड, केसी कार्टी, यानिक कॅरिया, अल्झारी जोसफ, जेडन सील्स आणि गुडकेश मोती.