IND vs WI T20 Live Streaming | तिसरा सामना टीम इंडियासाठी प्रतिष्ठेचा, कुठे पाहता येणार? जाणून घ्या सर्वकाही
west indies vs india 3rd t20i live streaming | वेस्ट इंडिज विरुद्ध टीम इंडिया यांच्यात 5 सामन्यांची टी 20 मालिका खेळवण्यात येत आहे.
गयाना | वेस्ट इंडिज विरुद्ध टीम इंडिया यांच्यातील तिसरा आणि निर्णायक टी 20 सामना हा मंगळवारी 8 ऑगस्ट रोजी खेळवण्यात येणार आहे. टीम इंडियाला पहिल्या सामन्यात 4 धावांनी पराभूत व्हावं लागलं. तर दुसरा सामना विंडिजने 2 विकेट्सने जिंकला. त्यामुळे विंडिज 5 सामन्यांच्या मालिकेत 2-0 ने पुढे आहे. आता तिसरा सामना हा टीम इंडियासाठी ‘करो या मरो’ असा आहे. त्यामुळे टीम इंडिया तिसऱ्या सामन्यात मालिका वाचवण्याच्या हिशोबाने मैदानात उतरणार आहे.
विंडिज विरुद्ध टीम इंडिया तिसरा सामना कधी, कुठे पाहता येणार, सामन्याला किती वाजता सुरुवात होणार, याबाबत आपण सविस्तर जाणून घेऊयात.
वेस्ट इंडिज विरुद्ध टीम इंडिया तिसरा टी 20 सामना केव्हा?
वेस्ट इंडिज विरुद्ध टीम इंडिया तिसरा टी 20 सामना मंगळवारी 8 ऑगस्ट रोजी खेळवण्यात येणार आहे.
वेस्ट इंडिज विरुद्ध टीम इंडिया तिसरा टी 20 कोणत्या स्टेडियममध्ये पार पडणार?
वेस्ट इंडिज विरुद्ध टीम इंडिया तिसरा टी 20 सामना या गयाना इथील प्रोव्हिडेंस स्टेडियममध्ये खेळवण्यात येणार आहे.
वेस्ट इंडिज विरुद्ध टीम इंडिया तिसरा टी 20 सामना किती वाजता सुरु होणार?
वेस्ट इंडिज विरुद्ध टीम इंडिया तिसरा टी 20 सामना रात्री 8 वाजता सुरु होणार आहे. तर 7 वाजून 30 मिनिटांनी टॉस होणार आहे.
वेस्ट इंडिज विरुद्ध टीम इंडिया तिसरा टी 20 सामना टीव्हीवर कुठे पाहता येईल?
वेस्ट इंडिज विरुद्ध टीम इंडिया तिसरा टी 20 सामना टीव्हीवर डीडी स्पोर्ट्स या चॅनेलवर पाहता येईल.
वेस्ट इंडिज विरुद्ध टीम इंडिया तिसरा टी 20 सामना ऑनलाईन कसा पाहायचा?
वेस्ट इंडिज विरुद्ध टीम इंडिया तिसरा टी 20 सामना हा जिओ एप आणि फॅनकोड एपद्वारे मोबाईल आणि लॅपटॉपवर पाहता येईल. जिओ एपवर फुकटात सामना पाहता येईल. तर फॅनकोडवर पाहण्यासाठी तुम्हाला खिसा हलका करावा लागेल.
टी 20 मालिकेसाठी वेस्ट इंडिज क्रिकेट टीम
रोवमॅन पॉवेल (कॅप्टन), कायले मेयर्स (उपकर्णधार), जॉनसन चार्ल्स, रोस्टन चेज, शिमरोन हेटमायर, जेसन होल्डर, शाई होप, अकील होसेन, ओशाने थॉमस, अल्झारी जोसेफ, ब्रँडन किंग, ओबेड मॅककॉय, निकोलस पूरन, रोमारियो शेफर्ड आणि ओडियन स्मिथ.
टी 20 सीरिजसाठी टीम इंडिया
हार्दिक पांड्या (कॅप्टन), शुबमन गिल, यशस्वी जयस्वाल, ईशान किशन (विकेटकीपर), तिलक वर्मा, सूर्यकुमार यादव (उपकर्णधार), संजू सॅमसन (विकेटकीपर), अक्षर पटेल, युजवेंद्र चहल, कुलदीप यादव, रवी बिश्नोई, अर्शदीप सिंग, उमरान मलिक, आवेश खान आणि मुकेश कुमार.