WI vs IND 3rd T20 | सलग 2 पराभवानंतर बदल निश्चित, Playing 11 मधून कुणाचा पत्ता कट होणार?
west indies vs india 3rd t20i | वेस्ट इंडिज क्रिकेट टीम या 5 सामन्यांच्या मालिकेत 2-0 अशा फरकाने आघाडीवर आहे.
गयाना | कसोटी आणि एकदिवसीय मालिकेत धमाकेदार कामगिरी करणारी टीम इंडिया टी 20 सीरिजमध्ये आतापर्यंत सुपर फ्लॉप ठरली आहे. विंडिजने टीम इंडियाचा सलग दोन सामन्यात विजय मिळवला. विंडिजने यासह 5 सामन्यांच्या मालिकेत 2-0 अशी एकतर्फी आघाडी घेतली. टीम इंडियाच्या गोलंदाज आणि फलंदाजांनी घोर निराशा केली. आता तिसरा सामना हा मालिकेच्या दृष्टीने निर्णायक असा आहे. त्यामुळे या तिसऱ्या सामन्यासाठी प्लेईंग इलेव्हनमध्ये बदल होणार हे निश्चित समजलं जात आहे.
टीम इंडियात तिसऱ्या सामन्यासाठी कॅप्टन हार्दिक पंड्या हा 3 बदल करु शकतो. हार्दिक शुबमन गिल याच्या जागी यशस्वी जयस्वाल याला खेळवू शकतो. यशस्वी टी 20 स्पेशालिस्ट बॅट्समन आहे. यशस्वीने आयपीएलमध्ये आतापर्यंत केलेली कामगिरी सर्वांनीच पाहिली आहे. तर दुसऱ्या बाजूला शुबमन गिल हा सातत्याने अपयशी ठरतोय. त्यामुळे गिलच्या जागी यशस्वीला संधी मिळू शकते. यशस्वीला संधी मिळाल्यास त्याचं हे टी 20 डेब्यू ठरेल.
तर दुसरा बदल हा गोलंदाजांमधून केला जाऊ शकतो. तिसऱ्या सामन्यात मुकेश कुमार याची उचलबांगडी होऊ शकते. मुकेशच्या जागी जम्मू एक्सप्रेस उमरान मलिक याचा समावेश प्लेईंग इलेव्हनमध्ये केला जाऊ शकतो. मुकेश कुमारने दुसऱ्या सामन्यात 3.5 ओव्हरमध्ये 1 विकेट घेत 35 धावा लुटवल्या होत्या. त्यामुळे उमरानला संधी दिली जाऊ शकते.
तिसरा बदल हा रवी बिश्नोईला पुन्हा बाहेर बसावं लागू शकतं. कुलदीप यादव याला दुसऱ्या सामन्याआधी नेट्समध्ये सरावादरम्यान अंगठ्याला दुखापत झाली होती. त्यामुळे कुलदीपच्या जागी रवी बिश्नोई याचा समावेश करण्यात आला होता. कुलदीपच्या दुखापतीबाबत कोणतीही अपडेट देण्यात आलेली नाही. मात्र कुलदीप जर फिट झाला असेल, तर रवीला बाहेर बसावं लागू शकतं.
तिसऱ्या सामन्यासाठी टीम इंडिया संभावित प्लेईंग इलेव्हन | हार्दिक पंड्या (कॅप्टन), (यशस्वी जयस्वाल), ईशान किशन (विकेटकीपर), तिलक वर्मा, सुर्यकुमार यादव, संजू सॅमसन, अक्षर पटेल, रवि बिश्नोई, युजवेंद्र चहल, अर्शदीप सिंह आणि उमरान मलिक.
टी 20 मालिकेसाठी वेस्ट इंडिज क्रिकेट टीम
रोवमॅन पॉवेल (कॅप्टन), कायले मेयर्स (उपकर्णधार), जॉनसन चार्ल्स, रोस्टन चेज, शिमरोन हेटमायर, जेसन होल्डर, शाई होप, अकील होसेन, ओशाने थॉमस, अल्झारी जोसेफ, ब्रँडन किंग, ओबेड मॅककॉय, निकोलस पूरन, रोमारियो शेफर्ड आणि ओडियन स्मिथ.