WI vs IND 3rd T20I | कॅप्टन रोवमेन पॉवेल याची फटकेबाजी, टीम इंडियाला 160 रन्सचं टार्गेट
india vs west india 3rd t20i | वेस्ट इंडिजने टीम इंडियासमोर विजयासाठी 160 रन्सचं टार्गेट ठेवलं आहे.
गयाना | कॅप्टन रोवमेन पॉवेल याने अखेरच्या क्षणी केलेल्या फटकेबाजीच्या जोरावर वेस्ट इंडिजने टीम इंडियाला विजयासाठी तिसऱ्या टी 20 सामन्यात विजयासाठी 160 धावांचं आव्हान दिलं आहे. विंडिजने 20 ओव्हरमध्ये 5 विकेट्स गमावून 159 धावा केल्या. रोवमेनने 19 बॉलमध्ये 1 फोर आणि 3 सिक्सच्या मदतीने आणि 210.53 च्या स्ट्राईक रेटने नाबाद 40 धावा केल्या. रोवमेनच्या या फटकेबाजीच्या जोरावर विंडिजने 150 पार मजल मारली.
विंडिजकडून ओपनर ब्रँडन किंग याने सर्वाधिक 42 धावांची खेळी केली. कायले मयेर्स याने 25 धावांचं योगदान दिलं. जॉन्सन चार्ल्स याने 12 धावा करुन मैदानाबाहेरचा रस्ता धरला. विकेटकीपर निकोलस पूरन याला कुलदीप यादव याने 20 धावांवर रोखलं. तर शिमरॉन हेटमायर याने 9 रन्स केल्या.तर रोमरियो शेफर्ड 2 धावांवर नाबाद परतला.
टीम इंडियासमोर 160 रन्सचं टार्गेट
Innings Break!
3⃣ wickets for Kuldeep Yadav 1⃣ wicket each for Axar Patel & Mukesh Kumar
Target ? for #TeamIndia – 160
Scorecard ▶️ https://t.co/3rNZuAiOxH#WIvIND pic.twitter.com/djULwmzXMF
— BCCI (@BCCI) August 8, 2023
टीम इंडियाकडून कुलदीप यादव याने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या. कुलदीपने ब्रँडन किंग, जॉन्सन चार्ल्स आणि निकोलस पूरन या तिघांचा काटा काढला. तर अक्षर पटेल आणि मुकेश कुमार या दोघांनी प्रत्येकी 1-1 विकेट घेतली.
टीम इंडियात 2 बदल
दरम्यान तिसऱ्या टी 20 सामन्यात टीम इंडिया प्लेईंग इलेव्हनमध्ये एकूण 2 बदल करण्यात आले. ईशान किशन याच्या जागी यशस्वी जयस्वाल याला संधी देण्यात आली. यशस्वी जयस्वाल याचं टी 20 पदार्पण ठरलं. तर कुलदीप यादव याने दुखापतीनंतर कमबॅक केलं. त्यामुळे रवी बिश्नोई याला बाहेर व्हांव लागलं.
वेस्ट इंडिज प्लेईंग इलेव्हन | रोव्हमन पॉवेल (कॅप्टन), ब्रँडन किंग, कायल मेयर्स, जॉन्सन चार्ल्स, निकोलस पूरन (विकेटकीपर), शिमरॉन हेटमायर, रोमॅरियो शेफर्ड, रोस्टन चेस, अकेल होसेन, अल्झारी जोसेफ आणि ओबेद मॅककॉय.
टीम इंडिया प्लेईंग इलेव्हन | हार्दिक पंड्या (कॅप्टन), शुबमन गिल, यशस्वी जयस्वाल, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, संजू सॅमसन (विकेटकीपर), अक्षर पटेल, कुलदीप यादव, अर्शदीप सिंग, युझवेंद्र चहल आणि मुकेश कुमार.