IND vs WI Head To Head | टीम इंडिया की वेस्ट इंडिज, टी 20 सीरिजमध्ये आकडेवारी कुणाच्या बाजूने?
India vs West Indies T20I Head To Head | वेस्ट इंडिज विरुद्ध टीम इंडिया यांच्यात 5 सामन्यांची टी 20 मालिका खेळवण्यात येत आहे.
गयाना | वेस्ट इंडिज विरुद्ध टीम इंडिया यांच्यातील टी 20 मालिकेतील तिसरा सामना हा गयाना येथील प्रोव्हिडेंस स्टेडियममध्ये खेळवण्यात येणाक आहे. यजमान वेस्ट इंडिज टीमला हा सामना जिंकून इतिहास रचण्याची संधी आहे. विंडिजचा तिसरा सामना जिंकून मालिका खिशात घालण्याचा प्रयत्न असणार आहे. वेस्ट इंडिज या मालिकेत 2-0 ने आघाडीवर आहे. त्यामुळे तिसरा सामना जिंकला तर वेस्टइंडिजने टीम इंडिया विरुद्ध 7 वर्षांनंतर टी 20 मालिका जिंकेल. आता या प्रयत्नात विंडिज यशस्वी होते की टीम इंडिया रोखते याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष असणार आहे.
वेस्ट इंडिजने टीम इंडियावर 2016 मध्ये अखेरची द्विपक्षीय टी 20 मालिता जिंकली होती. टीम इंडियाने सुरु असलेल्या या 5 सामन्यांच्या मालिकेत सलग 2 सामने गमावले. पहिल्या सामना हा 4 धावांनी गमावला. तर विंडिजने दुसरा सामना हा 2 विकेट्सने जिंकला. निकोलस पूरन याने दुसऱ्या सामन्यात विजयी खेळी साकारली. टीम इंडियाने विंडिज विरुद्ध सलग 2 टी 20 सामने गमावण्याची क्रिकेट इतिहासातील पहिलीच वेळ ठरली.
सलग 2 सामने गमावल्याने टीम इंडियाची नाचक्की झाली. त्यामुळे आशिया कप आणि वर्ल्ड कपआधी टीम इंडियाच्या कामगिरीवरुन असंख्य प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे. या तिसऱ्या सामन्याआधी विंडिज विरुद्ध टीम इंडिया यांच्यातील टी 2O मालिकेत वरचढ कोण आहे, हे आपण आकड्यांच्या माध्यमातून जाणून घेऊयात.
आकडेवारी काय सांगते?
विंडिज विरुद्ध टीम इंडिया आतापर्यंत एकूण 27 टी 20 सामन्यात आमनेसामने आले आहेत. टीम इंडियाने या 27 पैकी 17 सामन्यात विजय मिळवला आहे. तर 9 वेळा विंडिजने टीम इंडियाला पाणी पाजलंय. तर 1 सामना अनिर्णित राहिला.
तसेच 9 सामने हे वेस्टइंडिजमध्ये झाले आहेत. विंडिजमध्ये झालेल्या 9 पैकी 4 सामन्यात टीम इंडियाने विजय मिळवलाय. तर 5 सामन्यात वेस्ट इंडिजने बाजी मारलीय. तसेच उभयसंघात एकूण 8 टी 20 सीरिज पार पडल्या आहेत. या 8 पैकी 6 टी 20 मालिका भारतीय संघाने जिंकल्या आहेत. तर वेस्ट इंडिजने 6 सीरिज जिंकल्या आहेत.
आकडेवारीच्या बाबतीत टीम इंडिया वरचढ आहे. मात्र सध्या टीम इंडिया पिछाडीवर आहे. त्यामुळे आता तिसऱ्या सामन्यात कुणाचा निकाल लागतो, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.
टी 20 मालिकेसाठी वेस्ट इंडिज क्रिकेट टीम
रोवमॅन पॉवेल (कॅप्टन), कायले मेयर्स (उपकर्णधार), जॉनसन चार्ल्स, रोस्टन चेज, शिमरोन हेटमायर, जेसन होल्डर, शाई होप, अकील होसेन, ओशाने थॉमस, अल्झारी जोसेफ, ब्रँडन किंग, ओबेड मॅककॉय, निकोलस पूरन, रोमारियो शेफर्ड आणि ओडियन स्मिथ.
टी 20 सीरिजसाठी टीम इंडिया
हार्दिक पांड्या (कॅप्टन), शुबमन गिल, यशस्वी जयस्वाल, ईशान किशन (विकेटकीपर), तिलक वर्मा, सूर्यकुमार यादव (उपकर्णधार), संजू सॅमसन (विकेटकीपर), अक्षर पटेल, युजवेंद्र चहल, कुलदीप यादव, रवी बिश्नोई, अर्शदीप सिंग, उमरान मलिक, आवेश खान आणि मुकेश कुमार.