WI vs IND 3rd T20I | टीम इंडियाला विंडिज विरुद्ध शेवटची संधी, तिसऱ्या टी 20त युवा खेळाडूची एन्ट्री!
West Indies vs India 3rd T20I | वेस्ट इंडिज विरुद्धचा तिसरा टी 20 सामना हा टीम इंडियासाठी 'करो या मरो' असा आहे.
गयाना | टेस्ट आणि वनडे सीरिज जिंकल्यानंतर आता टीम इंडियावर टी 20 मालिकेत ‘करो या मरो’ची स्थिती उद्भवली आहे. सलग 2 सामन्यात सपाटून मार खाल्ल्यानंतर टीम इंडियाला 5 सामन्यांच्या मालिकेतील आव्हान कायम ठेवण्याची ही शेवटची संधी आहे. विंडिज या मालिकेत 2-0 ने आघाडीवर आहे. त्यामुळे विंडिजचा तिसऱ्या सामन्यासह मालिका जिंकण्याचा प्रयत्न असणार आहे. टीम इंडियाच्या फलंदाजांनी आणि गोलंदाजांनी पहिल्या 2 सामन्यात निराशाजनक कामगिरी केली. त्यामुळे पराभूत व्हावं लागलं. मात्र आता जर आव्हान कायम राखणयासाठी विजयाशिवाय गत्यंतर नाही.
टीम इंडियाच्या बहुतांश खेळाडूंनी ढिसाळ कामगिरी केली. ईशान किशन याने विंडिज विरुद्ध कसोटी पदार्पण केलं. कसोटीत ईशानला फार काही करण्याची संधी मिळाली नाही. मात्र वनडे सीरिजमध्ये ताबडतोब कामगिरी केली. मात्र ईशानला दोन्ही टी 20 सामन्यात लौकीकाला साजेशी कामगिरी करता आलेली नाही. त्यामुळे टीम इंडिया प्लेईंग इलेव्हनमध्ये तिसऱ्या सामन्यासाठी बदल होणार हे निश्चित आहे. ईशान किशन याला तिसऱ्या सामन्यातून डच्चू दिला जाऊ शकतो.
तर ईशानऐवजी टी 20 स्पेशालिस्ट यशस्वी जयस्वाल याला संधी दिली जाऊ शकते. यशस्वीला संधी मिळाल्यास त्याचं टी 20 पदार्पण होईल. यशस्वीने याआधी विंडिज विरुद्धच टेस्ट डेब्यू केला होता. त्यामुळे आता यशस्वीला संधी मिळते की कॅप्टन हार्दिक पंड्या ईशानवरच विश्वास दाखवतो, हे अवघ्या काही तासात स्पष्ट होईल.
टी 20 मालिकेसाठी वेस्ट इंडिज क्रिकेट टीम
रोवमॅन पॉवेल (कॅप्टन), कायले मेयर्स (उपकर्णधार), जॉनसन चार्ल्स, रोस्टन चेज, शिमरोन हेटमायर, जेसन होल्डर, शाई होप, अकील होसेन, ओशाने थॉमस, अल्झारी जोसेफ, ब्रँडन किंग, ओबेड मॅककॉय, निकोलस पूरन, रोमारियो शेफर्ड आणि ओडियन स्मिथ.
टी 20 सीरिजसाठी टीम इंडिया
हार्दिक पांड्या (कॅप्टन), शुबमन गिल, यशस्वी जयस्वाल, ईशान किशन (विकेटकीपर), तिलक वर्मा, सूर्यकुमार यादव (उपकर्णधार), संजू सॅमसन (विकेटकीपर), अक्षर पटेल, युजवेंद्र चहल, कुलदीप यादव, रवी बिश्नोई, अर्शदीप सिंग, उमरान मलिक, आवेश खान आणि मुकेश कुमार.