WI vs IND 4th T20 | टीम इंडियाचा विजयासह रेकॉर्ड, यशस्वीच्या नावावर खास किर्तिमान

| Updated on: Aug 13, 2023 | 9:12 AM

WI vs IND 4th T20 | फ्लोरिडामध्ये भारतीय टीमच्या विजयाचा सिलसिला कायम आहे. लॉडरहिल मैदानात टी 20 क्रिकेटमध्ये पाचव्या विजयाची नोंद केली. वेस्ट इंडिज विरुद्ध पाच मॅचच्या सीरीजमध्ये 2-2 अशी बरोबरी केली आहे.

WI vs IND 4th T20 | टीम इंडियाचा विजयासह रेकॉर्ड, यशस्वीच्या नावावर खास किर्तिमान
wi vs ind 4th 20 Yashasvi Jaiswal half century
Image Credit source: AFP
Follow us on

फ्लोरिडा : काही दिवसांपूर्वी टीम इंडिया वेस्ट इंडिज विरुद्ध T20 सीरीजमध्ये पराभवाच्या सावटाखाली होती. सलग दोन पराभवांमुळे हार्दिक पांड्याच नेतृत्व अडचणीत आलं होतं. त्यानंतर टीम इंडियाने पुढच्या दोन सामन्यात जोरदार पुनरागमन केलं. आता मालिकेत टीम इंडिया 2-2 अशी बरोबरीत आहे. आता रविवारी 13 ऑगस्टला होणाऱ्या पाचव्या निर्णायक सामन्याकडे सगळ्यांच लक्ष लागलं आहे. हा सामना जिंकणार संघ सीरीज विनर ठरेल. फ्लोरिडामध्ये चौथा सामना खेळला गेला. या मॅचमध्ये टीम इंडियाने 9 विकेटने मोठा विजय मिळवला. सोबत काही रेकॉर्डही आपल्या नावावर केले.

टीम इंडियाने 179 धावांच्या लक्ष्याचा यशस्वी पाठलाग केला. फ्लोरिडाच्या मैदानावरील टी 20 इंटरनॅशनलमध्ये धावांचा यशस्वी पाठलाग करण्याचा हा आतापर्यंतचा सर्वात मोठा रेकॉर्ड आहे.

टीम इंडियाचा फ्लोरिडाच्या मैदानावर यशाचा सिलसिला कायम आहे. टीम इंडिया इथे सर्वाधिक सामने जिंकणारी टीम बनली आहे. भारताने 7 सामने खेळले, त्यात 5 मॅचमध्ये विजय मिळवला.

भारताकडून शुभमन गिल आणि यशस्वी जैस्वाल या सलामीवीरांच्या जोडीने 165 धावांची भागीदारी केली. टी 20 इंटरनॅशनलमध्ये टीम इंडियासाठी हा ओपनिंग पार्टनरशिपचा संयुक्त रेकॉर्ड आहे. याआधी रोहित शर्मा आणि केएल राहुलने 165 धावांच्या पार्ट्नरशिपचा रेकॉर्ड केला.

यशस्वी जैस्वाल 84 धावांवर नाबाद राहिला. दुसऱ्या आंतरराष्ट्रीय टी 20 मॅचमध्ये त्याने अर्धशतक झळकावलं. त्याने 20 वर्ष 227 दिवस वय असताना हा कारनामा केला. टी 20 मध्ये अर्धशतक झळकवणारा सर्वात कमी वयाचा युवा भारतीय ओपनर बनला आहे.


T20 इंटरनॅशनलमध्ये टीम इंडियाने पहिल्यांदा 150 पेक्षा जास्त धावांच्या लक्ष्याचा फक्त 1 विकेट गमावून यशस्वी पाठलाग केला.