WI vs IND 5th T20I | पाचव्या आणि अंतिम सामन्यात टीम इंडियाने टॉस जिंकला, अशी आहे प्लेईंग इलेव्हन
West Indies vs India 5th T20I | पाचव्या आणि अंतिम सामन्यात नाणेफेकीचा कौल टीम इंडियाच्या बाजूने गेला आहे. टीम इंडियाने टॉस जिंकला आहे.
फ्लोरिडा | टीम इंडियाने वेस्ट इंडिज विरुद्धच्या पाचव्या आणि निर्णायक टी 20 सामन्यात टॉस जिंकला आहे. टीम इंडियाचा कॅप्टन हार्दिक पंड्या याने टॉस जिंकून बॅटिंगचा निर्णय घेतला आहे. विंडिजने प्लेईंग इलेव्हनमध्ये 2 बदल केले आहेत. तर टीम इंडियाने प्लेईंग इलेव्हनमध्ये कोणताही बदल केलेला नाही. ही 5 सामन्यांची मालिका 2-2 ने बरोबरीत आहे. त्यामुळे विंडिजला बरोबरीत असेलली मालिका जिंकण्यासाठी विजयी धावांचं पाठलाग करावं लागणार आहे. त्यामुळे टीम इंडिया विंडिजसमोर किती धावांचं आव्हान ठेवतं, याकडे क्रिकेट चाहत्यांना लक्ष असणार आहे.
टीम इंडिया टॉसचा बॉस
🚨 Toss Update 🚨#TeamIndia win the toss and elect to bat first in the 5th & final T20I 👌
Follow the match – https://t.co/YzoQnY7mft#WIvIND pic.twitter.com/GAKj29K2jM
— BCCI (@BCCI) August 13, 2023
टीम इंडियाची लॉडरहिलमधील कामगिरी
टीम इंडियाने आतापर्यंत लॉडरहिलमध्ये एकूण 7 सामने खेळले आहेत. या 7 पैकी 5 सामन्यात टीम इंडियाने विजय मिळवला आहे. तर 1 सामन्यात पराभव झालाय. तसेच एका सामन्याचा निकाल लागू शकला नाही. तसेच लॉडरहिलमध्ये टीम इंडियाने गेल्या 5 टी 20 सामन्यात विजय मिळवला आहे.
हेड टु हेड रेकॉर्ड्स
टीम इंडिया विरुद्ध वेस्ट इंडिज टी 20 क्रिकेटमध्ये आतापर्यंत 29 सामन्यात आमनेसामने आले आहेत. या 29 पैकी 19 सामन्यात टीम इंडिया विजयी राहिली आहे. तर वेस्ट इंडिजला 9 वेळा यश आलं आहे.
टीम इंडियाला वर्ल्ड रेकॉर्डची संधी
दरम्यान टीम इंडियाला पाचवा सामना जिंकून वर्ल्ड रेकॉर्ड करण्याची संधी आहे. आतापर्यंत एकाही टीमला पहिले 2 सामने गमावल्यानंवर 5 टी 20 सामन्यांच्या मालिका जिंकता आलेली नाही. त्यामुळे टीम इंडियाने मालिका जिंकली, तर अनोखा वर्ल्ड रेकॉर्डची नोंद होईल.
टीम इंडिया प्लेईंग ईलेव्हन | हार्दिक पंड्या (कर्णधार) यशस्वी जयस्वाल, शुबमन गिल, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, संजू सॅमसन, अक्षर पटेल, कुलदीप यादव, अर्शदीप सिंग, युझवेंद्र चहल आणि मुकेश कुमार.
वेस्ट इंडिज प्लेईंग ईलेव्हन | रोव्हमन पॉवेल (कॅप्टन), ब्रँडन किंग, कायल मेयर्स, शाई होप, निकोलस पूरन (विकेटकीपर), शिमरॉन हेटमायर, जेसन होल्डर, रोस्टन चेस, रोमॅरियो शेफर्ड, अकेल होसेन आणि अल्झारी जोसेफ.