WI vs IND : पहिल्या वनडे सामन्यात ही प्लेइंग इलेव्हन ठरू शकते लकी, वाचा कोण आहेत ते खेळाडू
भारताने वेस्ट इंडिज विरुद्धचा मालिका 1-0 ने जिंकली असून आता वनडे मालिकेसाठी सज्ज आहे. वनडे मालिका वर्ल्डकपच्या दृष्टीने महत्त्वाची आहे. या सामन्यात हे खेळाडू बेस्ट ठरू शकतील.
मुंबई : भारताने कसोटी मालिका 1-0 ने जिंकली असून वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये गुणांची भर केली आहे. आता भारत विरुद्ध वेस्ट इंडिया यांच्यात तीन सामन्यांची वनडे मालिका 27 जुलैपासून सुरु होत आहे. ही मालिका भारताला वनडे वर्ल्डकपच्या दृष्टीने महत्त्वाची असणार आहे. या सामन्यात चांगली कामगिरी करणाऱ्या के या सामन्यासाठी दोन्ही संघांचे खेळाडू सज्ज असून काही खेळाडूंची खेळी महत्त्वाची ठरणार आहे. प्लेइंग इलेव्हनमध्ये या खेळाडूंची निवड तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकते. पण सरते शेवटी ते त्या दिवशी कसे खेळतात यावरही बरंच काही अवलंबून आहे. ढोबळमानाने आतापर्यंतची आकडेवारी आणि त्यांचा फॉर्म पाहून निवड करणं फायद्याचं असू शकतं.
पिच रिपोर्ट
वेस्ट इंडिजमधील केनसिंगटोन ओव्हल मैदानात आतापर्यंत बॅलेंस निकाल पाहिले गेले आहेत. आतापर्यंत या मैदानात 49 सामने झाले आहेत. त्यात प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाने या मैदानात 22 सामने जिंकले आहेत. तर 25 सामन्यात संघांनी दिलेलं आव्हान पूर्ण केलं आहे. त्यामुळे ही खेळपट्टी कोणासाठी जमेची ठरेल हे सांगणं कठीण आहे. पहिल्यांदा फलंदाजी करणाऱ्या संघाने या मैदानात 229 धावा केल्या आहेत. तर मागच्या काही सामन्यांमध्ये 300 हून अधिक धावा झाल्याचं पाहण्यात आलं आहे.पण असं असलं तरी मैदानात आव्हान पेलणं सोप असल्याचं दिसून आलं आहे. त्यामुळे नाणेफेकीचा कौल झाल्यानंतर प्रथम गोलंदाजी करण्याला पसंती दिली जाईल.
ही प्लेइंग इलेव्हन ठरू शकते बेस्ट
- कर्णधार : विराट कोहली
- उपकर्णधार आणि विकेटकीपर : शाय होप
- फलंदाज: शुभमन गिल, शिम्रॉन हेटमायर
- अष्टपैलू खेळाडू : हार्दिक पांड्या, कायल मेयर्स, रवींद्र जडेजा, रोमारियो शेफर्ड
- गोलंदाज : कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, केविन सिनक्लेयर
दोन्ही संघांची संभाव्य प्लेइंग इलेव्हन
टीम इंडिया : रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, संजू सॅमसन (विकेटकीपर), हार्दिक पांड्या, सूर्यकुमार यादव, शार्दुल ठाकुर, रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, उमरान मलिक
वेस्ट इंडिज : ब्रँडन किंग, कायल मेयर्स, अलिक एथान्झे, शाय होप (कर्णधार, विकेटकीपर), सिम्रॉन हेडमायर, रोवमॅन पॉवेल, रोमारियो शेफर्ड, अल्झारी जोसेफ, केविन सिनक्लेयर, गुडकेश मोटी, ओशेन थॉमस