WI vs IND : ज्याती भीती तेच झालं, टीम इंडियासाठी वाईट बातमी

टीम इंडियाकडे आता तब्बल 250 पेक्षा जास्त धावांची आघाडी आहे. वेस्ट इंडिज संघाला आधी 150 धावांवर गुंडाळल्यावर दोन्ही सलामीवारांनी शतके केली. त्यानंतर मात्र ज्याची भीती तेच झालं.

WI vs IND : ज्याती भीती तेच झालं, टीम इंडियासाठी वाईट बातमी
दरम्यान रोहित शर्मा आणि यशस्वी जयस्वाल या जोडीने विंडिज विरुद्ध पहिल्या डावात 151 धावांची सलामी भागीदारी करत टीम इंडियाला आघाडी मिळवून दिली आहे. या दरम्यान या दोघांनी वैयक्तिक अर्धशतकं ठोकली आहेत. या सलामी जोडीकडून टीम इंडियाला मोठ्या खेळीची अपेक्षा असणार आहे.
Follow us
| Updated on: Jul 14, 2023 | 10:40 PM

मुंबई : वेस्ट इंडिज आणि भारत यांच्यामध्ये पहिला कसोटी सामना सुरू आहे. सामन्यावर भारतीय संघाची पकड असून 400 धावांचा टप्पा पार केला आहे. टीम इंडियाकडे आता तब्बल 250 पेक्षा जास्त धावांची आघाडी आहे. वेस्ट इंडिज संघाला आधी 150 धावांवर गुंडाळल्यावर दोन्ही सलामीवारांनी शतके केली. त्यानंतर मात्र ज्याची भीती तेच झालं.

नेमकं काय झालंय?

टीम इंडियामध्ये गेल्या काही महिन्यांनी संघात कमबॅक केलेल्या अजिंक्य रहाणेला परत एकदा मोठी खेळी करण्यात अपयश आलं आहे. ज्या मैदानावर 21 वर्षाच्या युवा यशस्वी जयस्वाल याने 172 धावांची धमाकेदार खेळी केली. यामध्ये  त्याने 16 चौकार आणि 1 षटकार मारला, तो बाद झाल्यावर मैदानात उतरलेल्या अजिंक्य रहाणेला फार काही वेळ मैदानात तग धरत आला नाही.

अजिंक्य रहाणेने 11 चेंडूत अवघ्या 3 धावा केल्या, वेस्ट इंडिजच्या केमार रोचने त्याला बाद करत तंबूत पाठवलं. रहाणे जर या मालिकेत अपयशी ठरला तर परत एकदा त्याच्या संघातील स्थानाबाबत टांगती तलवार आहे. आयपीएलमध्ये केलेल्या दमदार कामगिरीच्या जोरावर त्याने संघात कमबॅक केलं होतं. वर्ल्ड टेस्ट  फायनलमध्ये त्याने केलेल्या झुंजार खेळीमुळे त्याच्याकडे वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी त्याच्या गळ्यात उपकर्णधारजपदाची माळ पडली.

दरम्यान, अजिंक्य रहाणेला आता दुसऱ्या डावात चमकदार कामगिरी करावी लागणार आहे. आता  मैदानात विराट कोहली आणि रविंद्र जडेजा खेळत आहेत. भारत पहिल्या डावात किती धावा करणार पाहावं लागणार आहे.

वेस्ट इंडिज प्लेइंग इलेव्हन | क्रेग ब्रेथवेट (कर्णधार), टॅगेनरिन चंद्रपॉल, रेमॉन रेफर, जर्मिन ब्लॅकवूड, एलिक एथानझे, जोशुआ डासिल्वा, जेसन होल्डर, रहकीम कॉर्नवॉल, अल्झारी जोसेफ, केमर रोच आणि जोमे वॉरिकन.

टीम इंडिया प्लेइंग इलेव्हन | रोहित शर्मा (कॅप्टन), अजिंक्य रहाणे (उपकर्णधार) , यशस्वी जयस्वाल, शुबमन गिल, विराट कोहली, रविंद्र जडेजा, इशान किशन, आर अश्विन, शार्दुल ठाकुर, जयदेव उनाडकट आणि मोहम्मद सिराज.

तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल
तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल.
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती.
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे.
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस.
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार.
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू.
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी.
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.