WI vs IND | टीम इंडियात ‘या’ पर्पल कॅप विनर बॉलरची 8 वर्षानंतर एन्ट्री!

Team India Tour Of West Indies 2023 | टीम इंडिया वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनलमधील पराभवाच्या आठवणी मागे टाकून वेस्टइंडिज दौऱ्यासाठी सज्ज होणार आहे. या विंडिंद दौऱ्यातून स्टार खेळाडूचं कमबॅक होणार आहे.

WI vs IND | टीम इंडियात 'या' पर्पल कॅप विनर बॉलरची 8 वर्षानंतर एन्ट्री!
Follow us
| Updated on: Jun 14, 2023 | 12:11 AM

मुंबई | टीम इंडियाला पुन्हा एकदा वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनल सामन्यात पराभूत व्हावं लागलं. न्यूझीलंडनंतर ऑस्ट्रेलियाने टीम इंडियावर वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप महाअंतिम सामन्यात मात केली.आता टीम इंडिया हे सर्व विसरून वेस्टइंडिज दौऱ्यासाठी तयारी करणार आहे. टीम इंडिया काही दिवसांच्या विश्रांतीनंतर विंडिज दौऱ्याला निघणार आहे. टीम इंडियाचा हा 33 दिवसांचा दौरा असणार आहे. या दौऱ्यात टीम इंडिया टेस्ट, वनडे आणि शेवटी टी 20 सीरिज खेळणार आहे.

बीसीसीआयने वेस्टइंडिज दौऱ्याचं वेळापत्रकही जाहीर केलंय. टीम इंडियाच्या या दौऱ्याला कसोटी मालिकेने सुरुवात होणार आहे. एकूण 2 सामन्यांची ही कसोटी मालिका असणार आहे. त्यानंतर 3 मॅचची वनडे सीरिज आणि अखेरीस 5 सामन्यांच्या टी 20 मालिकेने दौऱ्याची सांगता होणार आहे.

टीम इंडियाचे बरेचसे खेळाडू हे आतापर्यंत सातत्याने फ्लॉप ठरलेत. त्यामुळे विंडिज दौऱ्यात टीम इंडियात बदल होणार आहेत. या पार्श्वभूमीवर टीम इंडियात तब्बल 8 वर्षांनी स्टार गोलंदाजांच कमबॅक होण्याची शक्यता आहे. या बॉलरची टी 20 सारिजसाठी निवड होऊ शकते.

मोहित शर्मा याची एन्ट्री?

टीम इंडियात विंडिज विरुद्धच्या टी 20 मालिकेत मोहित शर्मा याला संधी मिळू शकते. हार्दिक पंड्या गेल्या अनेक मालिकांपासून टी 20 मध्ये टीम इंडियाचं नेतृ्व करतोय. हा खेळाडू आयपीएलमध्ये गुजरात टायटन्सकडून हार्दिकच्या नेतृ्त्वात खेळलाय. तसेच नुकत्याच पार पडलेल्या आयपीएल 16 व्या मोसमात सर्वाधिक दुसऱ्या क्रमांकाच्या विकेट्स या गोलंदाजांने घेतल्या होत्या. आपण बोलतोय ते मोहित शर्मा याच्याबाबत. मोहितने 14 सामन्यात 27 विकेट्स घेतल्या. तसेच मोहित पर्पल कॅप विनरही राहिलाय. मोहितने 2014 मध्ये पर्पल कॅप जिंकली होती.

टीम इंडियात 8 वर्षांनी कमबॅक!

दरम्यान मोहित टीम इंडियातून गेल्या 8 वर्षांपासून बाहेर आहे. मात्र आता आयीपीएलमधील कामगिरीच्या जोरावर त्याला टीम इंडियात पुन्हा एन्ट्री मिळू शकते. मोहितने टीम इंडियाकडून अखेरचा वनडे सामना हा 25 ऑक्टोबर 2015 रोजी खेळला होता. तर अखेरचा टी 20 सामना हा 5 ऑक्टोबर 2015 ला खेळला होता. मोहितने हे दोन्ही सामने दक्षि आफ्रिके विरुद्ध खेळले होते. तेव्हापासून मोहित टीम इंडियातून बाहेर आहे.

बीसीसीआयने अजून विंडिज दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा केलेली नाही. त्यामुळे मोहित शर्मा याला टी 20 सीरिजसाठी टीम इंडियात संधी मिळेल, अशी आशा व्यक्त केली जात आहे.

कसोटी मालिकेचं वेळापत्रक

पहिला सामना – 12 ते 16 जुलै, डोमिनिका.

दुसरा सामना – 20 ते 24 जुलै, पोर्ट ऑफ स्पेन.

वनडे सीरिजचं वेळापत्रक

पहिला सामना, 27 जुलै, बारबाडोस.

दूसरा सामना, 29 जुलै, बारबाडोस.

तिसरा सामना – 1 ऑगस्ट, त्रिनिदाद.

कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?.
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....