Team India | टीम इंडियाचा ‘हा’ स्टार बॉलर अखेर परतलाच, विंडिज दहशतीत
West Indies vs Team India 2023 | वेस्टइंडिज विरुद्धच्या कसोटी मालिकेच्या निमित्ताने टीम इंडियात स्टार गोलंदाजांचं तब्बल जवळपास अडीच वर्षांनी कमबॅक झालं आहे. जाणून घ्या कोण आहे तो?
मुंबई | टीम इंडिया जुलै महिन्यात वेस्टइंडिज दौरा करायचा आहे.भारतीय क्रिकेट संघ या दौऱ्यात वेस्टइंडिज विरुद्ध एकदिवसीय, वनडे आणि टी 20 मालिका खेळणार आहे. बीसीसीआयने कसोटी आणि वनडे सीरिजसाठी टीम इंडियाचा संघ जाहीर केलाय. रोहित शर्मा टेस्ट आणि वनडे सीरिजमध्ये भारतीय संघाच्या कर्णधारपदाची जबाबदारी सांभाळणार आहे. तसेच कसोटीत अजिंक्य रहाणे तर वनडेत हार्दिक पंड्या याच्याकडे उपकर्णधारपदाची धुरा सोपवण्यात आली आहे. तसेच निवड समितीने युवा खेळाडूंना संधी दिलीय. तर काही खेळाडूंचं अनेक महिन्यांनी संघात कमबॅक झालंय.असाच एक खेळाडू आहे, ज्याला जवळपास अडीच वर्षांनंतर संघात स्थान देण्यात आलंय.
नवदीप सैनी याची एन्ट्री
नवदीप सैनी याची कसोटी संघात एन्ट्री झाली आहे. टीम इंडिया विंडिज दौऱ्याची 2 सामन्यांच्या कसोटी मालिकेने सुरुवात करणार आहे. या कसोटी मालिकेसाठी सैनीची निवड करण्यात आली आहे. सैनीचं टीम इंडियात जवळपास अडीच वर्षांनंतर पुनरागमन झालंय. नवदीपने अखेरचा कसोटी सामना हा 15 जून 2021 रोजी ऑस्ट्रेलिया विरुद्ध खेळला होता. हा सामना बॉर्डर गावसकर ट्रॉफी 2020-21 मालिकेतील होता. त्या सामन्यापासून सैनीला टीम इंडियात पुन्हा संधी मिळाली नव्हती.
नवदीप सैनी याचं भारतीय संघात पुनरागमन
Navdeep Saini has made a Test comeback ??#INDvsWI #TeamIndia #BCCI #NavdeepSaini #CricketTwitter pic.twitter.com/bvSpK8z13k
— InsideSport (@InsideSportIND) June 23, 2023
सैनीची क्रिकेट कारकीर्द
नवदीप सैनीने टीम इंडियाकडून 11 टी 20, 2 टेस्ट आणि 8 एकदिवसीय सामने खेळला आहे. सैनीने टी 20 क्रिकेटमध्ये 13, कसोटीत 4 आणि एकदिवसीय सामन्यांमध्ये 6 फलंदाजांना मैदानाबाहेरचा रस्ता दाखवलाय.
कसोटी मालिकेसाठी टीम इंडिया
NEWS – India’s squads for West Indies Tests and ODI series announced.
TEST Squad: Rohit Sharma (Capt), Shubman Gill, Ruturaj Gaikwad, Virat Kohli, Yashasvi Jaiswal, Ajinkya Rahane (VC), KS Bharat (wk), Ishan Kishan (wk), R Ashwin, R Jadeja, Shardul Thakur, Axar Patel, Mohd.… pic.twitter.com/w6IzLEhy63
— BCCI (@BCCI) June 23, 2023
विंडिज विरुद्धच्या टेस्ट सीरिजसाठी टीम इंडिया | रोहित शर्मा (कॅप्टन), अजिंक्य रहाणे (उपकर्णधार), शुबमन गिल, ऋतुराज गायकवाड, विराट कोहली, यशस्वी जैस्वाल, केएस भरत (विकेटकीपर), इशान किशन (विकेटकीपर), आर अश्विन, आर जडेजा, शार्दुल ठाकूर, अक्षर पटेल, मोहम्मद सिराज, मुकेश कुमार, जयदेव उनाडकट आणि नवदीप सैनी.
विंडिज विरुद्धच्या वनडे सीरिजसाठी टीम इंडिया | रोहित शर्मा (कर्णधार), हार्दिक पांड्या (उपकर्णधार), शुबमन गिल, ऋतुराज गायकवाड, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, संजू सॅमसन (विकेटकीपर), इशान किशन (विकेटकीपर), शार्दुल ठाकूर, रविंद्र जडेजा, अक्षर पटेल, युझवेंद्र चहल, कुलदीप यादव, जयदेव उनाडकट, मोहम्मद सिराज, उमरान मलिक आणि मुकेश कुमार.