WI vs IND 3rd Odi Live Streaming | विंडिज विरुद्ध टीम इंडिया तिसरा एकदिवसीय सामना कुठे, कधी आणि केव्हा पाहता येणार?
West Indies vs India 3rd Odi | वेस्ट इंडिज विरुद्ध टीम इंडिया यांच्यातील 3 सामन्यांची मालिका ही 1-1 ने बरोबरीत आहे.
त्रिनिदाद | टीम इंडिया वेस्ट इंडिज दौऱ्यावर आहे. टीम इंडिया विंडिज विरुद्ध सध्या एकदिवसीय मालिका खेळत आहे. या 3 सामन्यांच्या मालिकेतील 2 सामने यशस्वीपणे पार पडले आहेत. ही मालिका 1-1 ने बरोबरीत आहे. त्यामुळे तिसरा आणि अंतिम सामना हा निर्णायक असणार आहे. दुसऱ्या कसोटीत रोहित शर्मा आणि विराट कोहली यांना विश्रांती देण्यात आली होती.त्यामुळे आरपारच्या असलेल्या तिसऱ्या सामन्यात विराट आणि रोहित हे दोन्ही दिग्गज कमबॅक करु शकतात. हा विंडिज विरुद्ध टीम इंडियातील तिसरा एकदिवसीय सामना कुठे, कधी पाहता येणार हे आपण जाणून घेऊयात.
विंडिज विरुद्ध टीम इंडिया तिसरा सामना केव्हा?
वेस्ट इंडिज विरुद्ध टीम इंडिया यांच्यातील तिसरा आणि अंतिम सामना हा 1 ऑगस्ट रोजी खेळवण्यात येणार आहे.
विंडिज विरुद्ध टीम इंडिया तिसऱ्या सामन्याचं आयोजन कुठे?
विंडिज विरुद्ध टीम इंडिया तिसऱ्या सामन्याचं आयोजन हे त्रिनिदादमधील ब्रायन लारा स्टेडियममध्ये करण्यात येणार आहे.
विंडिज विरुद्ध टीम इंडिया तिसऱ्या एकदिवसीय सामन्याला किती वाजता सुरुवात होणार?
वेस्ट इंडिज विरुद्ध टीम इंडिया यांच्यातील तिसऱ्या सामन्याला संध्याकाळी 7 वाजता सुरुवात होणार आहे. तर 6 वाजून 30 मिनिटांनी टॉस होईल.
वेस्ट इंडिज विरुद्ध टीम इंडिया तिसरी वनडे मॅच टीव्हीवर कुठे पाहता येणार?
वेस्ट इंडिज विरुद्ध टीम इंडिया यांच्यातील तिसरा एकदिवसीय सामना हा टीव्हीवर डीडी स्पोर्ट्सवर पाहता येईल.
वेस्ट इंडिज विरुद्ध टीम इंडिया तिसरा एकदिवसीय सामना मोबाईल आणि लॅपटॉपवर कुठे पाहता येणार?
वेस्ट इंडिज विरुद्ध टीम इंडिया तिसरा एकदिवसीय सामना हा मोबाईल आणि लॅपटॉपवर जिओ सिनेमाद्वारे पाहता येईल.
वनडे सीरिजसाठी टीम इंडिया | रोहित शर्मा (कॅप्टन), शुबमन गिल, ऋतुराज गायकवाड, संजू सॅमसन (विकेटकीपर), इशान किशन (विकेटकीपर), विराट कोहली, सूर्यकुमार यादव, शार्दुल ठाकूर, हार्दिक पंड्या (उपकर्णधार), रविंद्र जडेजा, अक्षर पटेल, युझवेंद्र चहल, कुलदीप यादव, जयदेव उनाडकट, उमरान मलिक आणि मुकेश कुमार.
टीम इंडिया विरुद्धच्या वनडे सीरिजाठी वेस्ट इंडिज संघ | शाई होप (कॅप्टन), एलिक एथनेज, यानिक कॅरिया, कीसी कार्टी, डॉमिनिक ड्रेक्स, शिमरॉन हेटमायर, अल्जारी जोसफ, ब्रँडन किंग, रोवमन पॉवेल (उपकर्णधार), काइल मेयर्स, गुडकेश मोती, जेडन सील्स, रोमारियो शेफर्ड, केविन सिंक्लेयर आणि ओशेन थॉमस.