WI vs IND Test Series | विंडिज विरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी अशी असेल टीम इंडिया
West Indies vs Team India Test Series 2023 | टीम इंडिया वेस्टइंडिज दौऱ्यावर कसोटी, वनडे आणि टी 20 सीरिज खेळणार आहे. या विंडिज दौऱ्याची सुरुवात 12 जुलैपासून होणार आहे.
मुंबई | टीम इंडियाला सलग दुसऱ्यांदा वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनलमध्ये पराभूत व्हावं लागलं. न्यूझीलंडने 2021 मध्ये भारतावर मात करत पहिल्याच झटक्यात वर्ल्ड टेस्ट चॅम्पियन होण्याचा मान मिळवला होता. त्यानंतर आता ऑस्ट्रेलियाने टीम इंडियाचं टेस्ट वर्ल्ड कप जिंकण्याचं स्वप्न भंग केलं. त्यामुळे टीम इंडियाची 10 वर्षांपासूनची प्रतिक्षा लांबली. आता टीम इंडिया हा पराभव विसरुन वेस्टइंडिज दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यात टीम इंडिया टेस्ट, वनडे आणि टी 20 साीरिज खेळणार आहे. या दौऱ्याची सुरुवात ही कसोटी मालिकेपासून होणार आहे. एकूण 2 कसोटी सामन्यांच्या मालिकेला 12 जुलैपासून सुरुवात होणार आहे.
वेस्टइंडिज विरुद्धच्या या कसोटी मालिकेसाठी टीम इंडिया युवा खेळाडूंना संधी मिळू शकते. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनलमधील पराभवानंतर निवड समिती टीममध्ये बदल करु शकते. चेतेश्वर पुजारा याचं नाव आघाडीवर आहे. पुजाराने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनलमध्ये निराशा केली. पुजारा याने महत्वाच्या सामन्याआधी काऊंटी क्रिकेटमध्ये द्विशतक-शतक ठोकत चांगली कामगिरी केली. त्यामुळे पुजाराकडून wtc final मध्ये चांगल्या कामगिरीची आशा होती. मात्र त्याने निराशा केली.
तब्बल 17 महिन्यांनी कमबॅक केल्यानंतर अजिंक्य रहाणे या एकट्यानेच दिलादायक कामगिरी केली. रहाणेने पहिल्या डावात 89 धावांची खेळी आणि शार्दुल ठाकुर याच्यासोबत शतकी भागीदारी केल्याने हा सामना पाचव्या दिवसापर्यंत लांबला. त्यामुळे निवड समिती विंडिज विरुद्धच्या मालिकेत रोहित शर्माऐवजी रहाणेला कर्णधारपदाची जबाबदारी दिली जाऊ शकते.
यशस्वी आणि सरफराजला संधी!
विंडिज विरुद्धच्या या मालिकेसाठी टीम इंडियाकडून युवा सरफराज खान, इशान किशन, यशस्वी जयस्वाल या खेळाडूंना संधी मिळण्याची शक्यता आहे. सरफराज टीम इंडियाकडून संधीच्या प्रतिक्षेत आहे. तर इशान किशन कसोटी डेब्युकडे लक्ष देऊन आहेत. तर यशस्वी जयस्वाल यालाही संधी मिळू शकते. यशस्वी याचा वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनल महामुकाबल्यासाठी राखीव खेळाडू म्हणून समावेश करण्यात आला होता.
कसोटी मालिकेचं वेळापत्रक
पहिला सामना – 12 ते 16 जुलै, डोमिनिका.
दुसरा सामना – 20 ते 24 जुलै, पोर्ट ऑफ स्पेन.
टीम इंडियाच्या विंडिज दौऱ्याचं वेळापत्रक
? NEWS ?
2️⃣ Tests3️⃣ ODIs5️⃣ T20Is
Here's the schedule of India's Tour of West Indies ?#TeamIndia | #WIvIND pic.twitter.com/U7qwSBzg84
— BCCI (@BCCI) June 12, 2023
विंडिंज विरुद्धच्या टेस्ट सीरिजसाठी संभावित टीम इंडिया | अजिंक्य रहाणे (कर्णधार), शुबमन गिल, केएल राहुल (विकेटकीपर), ईशान किशन (विकेटकीपर), श्रेयस अय्यर, विराट कोहली, सरफराज खान, यशस्वी जयस्वाल, रवीचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, मुकेश कुमार, मोहम्मद सिराज आणि शार्दुल ठाकुर.