WI vs IND : मानलं भावा तुला, मुंबईच्या वानखेडेबाहेर पाणीपुरी विकणाऱ्या पोराची टीम इंडियात निवड!
Team India Squad for WI Tour : कधी काळी मुंबईच्या वानखेडे मैदानाच्या पाणी पुरीचा ठेला लावणारा जयस्वाल आता टीम इंडियाचं प्रतिनिधित्त्व करताना दिसणार आहे. त्याच्या जिद्द आणि चिकाटीला यश आलं आहे.
मुंबई : वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी बीसीसीआयने टीम इंडियाची घोषणा केली आहे. यामधील कसोटी संघामध्ये दोन युवा खेळाडूंची निवड झाली आहे. ऋतुराज गायकवाड आणि दुसरा यशस्वी जयस्वाल आहे. आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्ससाठी खोऱ्याने धावा काढणाऱ्या यशस्वीने 14 सामन्यात 639 धावा केल्या होत्या. कधी काळी मुंबईच्या वानखेडे मैदानाच्या पाणी पुरीचा ठेला लावणारा जयस्वाल आता टीम इंडियाचं प्रतिनिधित्त्व करताना दिसणार आहे.
टीम इंडिया आणि वेस्ट इंडिजमध्ये पहिला कसोटी सामना 12 जुलैला होणार आहे. या सामन्यामध्ये जयस्वालला संधी मिळण्याची दाट शक्यता आहे. विशेष म्हणजे कसोटी संघामधून भरवशाचा फलंदाज अशी ओळख निर्माण केलेल्या चेतेश्वर पुजारा याला डच्चू दिला आहे. तर अजिंक्य रहाणे याला परत एकदा उपकर्णधारपदाची जबाबदारी देण्यात आली आहे.
भारताचा एकदिवसीय संघ: रोहित शर्मा (C), शुभमन गिल, रुतुराज गायकवाड, विराट कोहली, सूर्य कुमार यादव, संजू सॅमसन (विकेटकीपर), इशान किशन (W), हार्दिक पंड्या (VC), शार्दुल ठाकूर, आर. जडेजा, अक्षर पटेल, युझवेंद्र चहल, कुलदीप यादव, जयदेव उनाडकट, मोहम्मद. सिराज, उमरान मलिक, मुकेश कुमार.
भारताचा कसोटीसाठी संघ |रोहित शर्मा (कर्णधार), अजिंक्य रहाणे (उपकर्णधार), शुबमन गिल, ऋतुराज गायकवाड, विराट कोहली, यशस्वी जैस्वाल, केएस भरत (विकेटकीपर), इशान किशन (विकेटकीपर), आर अश्विन, आर जडेजा, शार्दुल ठाकूर, अक्षर पटेल, मोहम्मद. सिराज, मुकेश कुमार, जयदेव उनाडकट आणि नवदीप सैनी.
वेस्टइंडीज दौऱ्याचं वेळापत्रक :
टेस्ट मॅच
पहिली टेस्ट 12 ते 16 जुलै, डोमिनिका दुसरी टेस्ट 20 ते 24 जुलै, पोर्ट ऑफ स्पेन
वनडे मॅच
पहिली मॅच – 27 जुलै, ब्रिजटाउन दुसरी मॅच – 29 जुलै, ब्रिजटाउन तीसरी मॅच – 1 ऑगस्ट, पोर्ट ऑफ स्पेन
टी- 20 सामने
पहिली मॅच – 3 ऑगस्ट, पोर्ट ऑफ स्पेन दुसरी मॅच – 6 ऑगस्ट, गुयाना तीसरी मॅच -8 ऑगस्ट, गुयाना चौथी मॅच -12 ऑगस्ट, फ्लोरिडा पाजवी मॅच -13 ऑगस्ट, फ्लोरिडा