WI vs SA: पहिल्याच दिवशी 17 विकेट्स, गोलंदाजांचा धमाका, विंडिजनंतर दक्षिण आफ्रिकेच कमबॅक
West Indies vs South Africa 2nd Test Day 1 Highlights: वेस्ट इंडिज विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यातील दुसऱ्या कसोटीतील पहिला दिवस हा पूर्णपणे गोलंदाजांचा राहिला.
दक्षिण आफ्रिका क्रिकेट टीम वेस्ट इंडिज दौऱ्यावर आहे. विंडिज विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यात 2 सामन्यांची कसोटी मालिका खेळवण्यात येत आहे. या मालिकेतील दुसऱ्या आणि शेवटचा सामन्यातील पहिला दिवस हा गोलंदाजांच्या नावावर राहिला. पहिला दिवसाचा खेळ आटोपला तोवर दोन्ही संघांनी मिळून एकूण 17 विकेट्स गमावल्या. दक्षिण आफ्रिकेने टॉस जिंकून बॅटिंगचा निर्णय घेतला. मात्र शामर जोसेफ याच्या पंचसमोर दक्षिण आफ्रिकेला 160 धावांपर्यंत मजल मारता आली. तर त्यानंतर विंडिजने दिवसाचा खेळ संपेपर्यंत 28.2 ओव्हरमध्ये 7 विकेट्स गमावून 97 धावा केल्या आहेत. विंडिज अजून 63 धावांनी पिछाडीवर आहे.
दक्षिण आफ्रिकेला 160 धावांवर गुंडाळल्यानंतर विंडिजकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा होती. मात्र तसं झालं नाही. दक्षिण आफ्रिकेनेही विंडिजला जशास तसं उत्तर देत 7 झटके दिले. दक्षिण आफ्रिकेकडून वियान मुल्डर याने शानदार बॉलिंग केली. वियानने अवघ्या 6 ओव्हरमध्ये 3 च्या इकॉनॉमीने 18 धावा देत 4 विकेट्स घेतल्या. वियानने विंडिज कॅप्टन क्रेग ब्रेथवेट, अलिक अथानाजे, केवम हॉज आणि जोशुआ डी सिल्वा या चौघांना मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला. नांद्रे बर्गर याने 2 विकेट्स घेतल्या. तर केशव महाराज याने 1 विकेट घेतली. तर जेसन होल्डर हा 33 धावांवर नाबाद आहे.
दक्षिण आफ्रिकेची बॅटिंग, शामरचा पंजा
दरम्यान त्याआधी ट्रिस्टन स्टब्स आणि डेव्हिड बेडिंगहॅम या दोघांचा अपवाद वगळता टॉप आणि मिडल ऑर्डरमधील फलंदाज फ्लॉप ठरले. स्टब्स आण डेव्हिड या दोघांनी 28 आणि 26 अशा धावा केल्या. दक्षिण आफ्रिकेच्या चौघांना भोपळाही फोडता आला नाही. तर काइल वेरेन याने 21 धावांचं योगदान दिलं. त्यामुळे दक्षिण आफ्रिकेची 9 बाद 97 अशी स्थिती झाली. मात्र दक्षिण आफ्रिकेच्या शेवटच्या जोडीने 63 धावांची भागीदारी करत लाज राखली. नांद्रे बर्गर आणि डेन पिएड या दोघांनी दहाव्या विकेटसाठी 63 रन्सची पार्टनरशीप केली. बर्गर आणि पिएडने 23 आणि 38* धावा केल्या. विंडिजसाठी शामर जोसेफने 5 विकेट्स घेण्याची तिसरी वेळ ठरली. जेडेन सील्सने 3 विकेट्स घेतल्या. तर जेसन होल्डर आणि गुडाकेश मोती या दोघांनी 1-1 विकेट घेतली.
पहिला दिवस गोलंदाजांचा
That’s it on Day 1️⃣ in Guyana!🏏#WIvSA #MenInMaroon pic.twitter.com/v6DZGLfsKa
— Windies Cricket (@windiescricket) August 15, 2024
वेस्ट इंडीज प्लेइंग ईलेव्हन : क्रेग ब्रॅथवेट (कॅप्टन), मिकाईल लुईस, केसी कार्टी, ॲलिक अथानाझे, कावेम हॉज, जेसन होल्डर, जोशुआ दा सिल्वा (विकेटकीपर), गुडाकेश मोटी, जोमेल वॉरिकन, शामर जोसेफ आणि जेडेन सील्स.
दक्षिण आफ्रिका प्लेइंग ईलेव्हन : टेम्बा बावुमा (कर्णधार), एडन मार्करम, टोनी डी झॉर्झी, ट्रिस्टन स्टब्स, डेव्हिड बेडिंगहॅम, काइल वेरेन (विकेटकीपर), विआन मुल्डर, केशव महाराज, डेन पिएड, कागिसो रबाडा आणि नांद्रे बर्गर.