Test Cricket: टेस्ट क्रिकेटमध्ये 11 खेळाडू झिरोवर आऊट, आले तसेच गेले
वेस्ट इंडिज विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यात झालेल्या दुसऱ्या आणि अंतिम कसोटी सामन्यात दोन्ही संघांचे एकूण 11 खेळाडू हे झिरोवर आऊट झाले.
क्रिकेट विश्वात दररोज अनेक रेकॉर्ड्स होतात आणि ते ब्रेकही होतात. काही रेकॉर्ड्स हे ब्रेक होणं अशक्य असे असतात. तर काही विक्रम मोडीतही निघतात. मात्र काही विक्रम हे असे असतात, ते कुणालाही ब्रेक करावेसे वाटत नाही, कारण ते विक्रमच नकोसे असतात. असाच एक विक्रम आहे, जिथवर 14 संघ संयुक्तरित्या पोहचले आहेत. मात्र तो रेकॉर्ड ब्रेक झालेला नाही. हा रेकॉर्ड कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक वेळा झिरोवर आऊट होण्याचा आहे. नुकतीच वेस्ट इंडिज विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यातील 2 सामन्यांची कसोटी मालिका पार पडली. मालिकेतील दुसरा आणि अंतिम सामना हा प्रोव्हीडन्स स्टेडियम, गयाना येथे पार पडला. दक्षिण आफ्रिकेने हा सामना 40 धावांनी जिंकला. या सामन्यात दोन्ही संघांचे एकूण 11 खेळाडू हे शून्यावर बाद झाले.
एका कसोटी क्रिकेट सामन्यात 11 खेळाडू झिरोवर आऊट होण्याची ही इतिहासातील 14 वी घटना ठरली. इंग्लंड विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात 30 ऑगस्ट 1988 रोजी झालेल्या सामन्यात दोन्ही संघाचे एकूण 11 खेळाडू झिरोवर आऊट होते. कसोटी क्रिकेटमध्ये अशी घटना घडण्याची ही पहिली वेळ ठरली होती. त्यानंतर आतापर्यंत एकूण 13 वेळा कसोटी क्रिकेटमध्ये 11 खेळाडू शून्यावर बाद झाले. मात्र 11 पेक्षा अधिक खेळाडू झिरोवर आऊट झाले नाहीत.
सामन्याबाबत थोडक्यात
दक्षिण आफ्रिकेने पहिल्या डावात 160 धावा केल्या. त्यानंतर विंडिजला पहिल्या डावात 144 धावापर्यंतच मजल मारता आली. त्यामुळे दक्षिण आफ्रिकेला 16 धावांची आघाडी मिळाली. दक्षिण आफ्रिकेने दुसर्या डावात 246 धावा केल्या. अशाप्रकारे विंडिजला 263 धावांचं आव्हान मिळालं. विंडिजचा या धावांचा पाठलाग करताना 222 धावांवर डाव आटोपला. दक्षिण आफ्रिकेने यासह हा सामना 40 धावांनी जिंकला. दक्षिण आफ्रिकेने यासह 2 सामन्यांची मालिका 1-0 अशा फरकाने जिंकली.
वेस्ट इंडीज प्लेइंग ईलेव्हन : क्रेग ब्रॅथवेट (कॅप्टन), मिकाईल लुईस, केसी कार्टी, ॲलिक अथानाझे, कावेम हॉज, जेसन होल्डर, जोशुआ दा सिल्वा (विकेटकीपर), गुडाकेश मोटी, जोमेल वॉरिकन, शामर जोसेफ आणि जेडेन सील्स.
दक्षिण आफ्रिका प्लेइंग ईलेव्हन : टेम्बा बावुमा (कर्णधार), एडन मार्करम, टोनी डी झॉर्झी, ट्रिस्टन स्टब्स, डेव्हिड बेडिंगहॅम, काइल वेरेन (विकेटकीपर), विआन मुल्डर, केशव महाराज, डेन पिएड, कागिसो रबाडा आणि नांद्रे बर्गर.