WI vs SA: टेम्बा बावुमा झिरोवर ढेर, शामर जोसेफकडून दक्षिण आफ्रिकेला 1 ओव्हरमध्ये 2 धक्के

Temba Bavuma Duck: दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार टेम्बा बावुमा हा वेस्ट इंडिज विरूद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात झिरोवर आऊट झाला आहे. शामर जोसेफने यासह एका ओव्हरमध्ये 2 विकेट्स घेतल्या.

WI vs SA: टेम्बा बावुमा झिरोवर ढेर, शामर जोसेफकडून दक्षिण आफ्रिकेला 1 ओव्हरमध्ये 2 धक्के
teamba bavumaImage Credit source: Icc X account
Follow us
| Updated on: Aug 15, 2024 | 10:10 PM

वेस्ट इंडिज विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यातील दुसरा आणि शेवटचा कसोटी सामना गयाना येथील प्रोव्हीडन्स स्टेडियम येथे खेळवण्यात येत आहे. दक्षिण आफ्रिकेने टॉस जिंकून बॅटिंगचा निर्णय घेतला. मात्र विंडिजच्या गोलंदाजांनी दक्षिण आफ्रिकेला झटपट धक्के देत अप्रतिम सुरुवात केली. जेडेन सील्स याने टोनी डी झॉर्झी याला बोल्ड करत विंडिजला पहिली विकेट मिळवून दिली. जेडनने सामन्यातील चौथ्या ओव्हरमधील तिसर्‍या बॉलवर झॉर्झीला आऊट केलं. झॉर्झी 10 बॉलमध्ये 1 धाव करुन माघारी परतला. त्यानंतर शामर जोसेफने 11 व्या ओव्हरमध्ये धमाका केला.

एकाच ओव्हरमध्ये 2 झटके

जेडेन सील्सने झॉर्झीला आऊट केल्याने दक्षिण आफ्रिकेचा स्कोअर 1 आऊट 8 असा होता. त्यानंतर शामर जोसेफने 11 व्या ओव्हरमधील तिसऱ्या आणि पाचव्या बॉलवर विकेट्स घेत दक्षिण आफ्रिकेला 2 झटके दिले. शामरने एडन मार्करम याला 14 धावावंर क्लिन बोल्ड केलं. त्यानंतर शामरने कॅप्टन टेम्बा बावुमा याला मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला. शामरने टेम्बाला खातंही उघडू दिलं नाही. शामरने टेम्बाला दुसऱ्याच बॉलवर एलबीडबल्यू आऊट केलं. त्यामुळे दक्षिण आफ्रिकेची 10.5 ओव्हरनंतर 3 बाद 20 अशी नाजूक स्थिती झाली. दक्षिण आफ्रिकेने पहिल्या सत्रात लंचपर्यंत 26 ओव्हरमध्ये 4 विकेट्स गमावून 64 धावा केल्या आहेत.

पहिलं सत्र विंडिजच्या नावावर

पहिला सामना अनिर्णित

दरम्यान वेस्ट इंडिज विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यातील पहिला सामना हा अनिर्णित राहिला. त्यामुळे 2 सामन्यांची मालिका 0-0 ने बरोबरीत आहे. त्यामुळे दोन्ही संघांना सीरिजमधील दुसरा सामना जिंकून मालिका जिंकण्याची संधी आहे.

वेस्ट इंडीज प्लेइंग ईलेव्हन : क्रेग ब्रॅथवेट (कॅप्टन), मिकाईल लुईस, केसी कार्टी, ॲलिक अथानाझे, कावेम हॉज, जेसन होल्डर, जोशुआ दा सिल्वा (विकेटकीपर), गुडाकेश मोटी, जोमेल वॉरिकन, शामर जोसेफ आणि जेडेन सील्स.

दक्षिण आफ्रिका प्लेइंग ईलेव्हन : टेम्बा बावुमा (कर्णधार), एडन मार्करम, टोनी डी झॉर्झी, ट्रिस्टन स्टब्स, डेव्हिड बेडिंगहॅम, काइल वेरेन (विकेटकीपर), विआन मुल्डर, केशव महाराज, डेन पिएड, कागिसो रबाडा आणि नांद्रे बर्गर.

'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?.