WI vs SA 2nd Test: दक्षिण आफ्रिकेची विंडिजवर 40 धावांनी मात, सामन्यासह मालिका विजय
West Indies vs South Africa 2nd Test Match Highlights: पाहुण्या दक्षिण आफ्रिकेने यजमान विंडिजला 40 धावांनी पराभूत 1-0 फरकाने मालिका जिंकली आहे.
दक्षिण आफ्रिकेने वेस्ट इंडिज दौऱ्यावर धमाका केला आहे. विंडिज विरुद्ध दक्षिण आफ्रिकेतील सलामीचा सामना अनिर्णित राहिला. त्यानंतर दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजासह फलंदाजांनी दुसऱ्या कसोटी सामन्यात उल्लेखनीय कामगिरी केली. दक्षिण आफ्रिकेने दुसऱ्या डावात 246 धावा केल्या. तर त्यांच्याकडे 16 धावांची आघाडी होती. त्यामुळे विंडिजला विजयासाठी 263 धावांचं आव्हान मिळालं. मात्र दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांसमोर विंडिजचा डाव हा 222 धावांवर आटोपला. यासह दक्षिण आफ्रिकेने 40 धावांनी सामन्यासह मालिकाही जिंकली. दक्षिण आफ्रिकेचा विंडिज विरुद्धचा हा सलग 10वा कसोटी मालिका विजय ठरला. दक्षिण आफ्रिकेसाठी दुसऱ्या डावात 3 विकेट्स घेतल्या. तर केशवने दोन्ही सामन्यात एकूण 13 विकेट्स घेतल्या. त्यासाठी केशवला ‘मॅन ऑफ द सीरिज’ पुरस्काराने गौरवण्यात आलं.
दक्षिण आफ्रिकेने दुसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत 5 विकेट्स गमावून 223 धावा केल्या. मात्र पाहुण्या संघाने तिसऱ्या दिवशी 23 धावांच्या मोबदल्यात 5 विकेट्स गमावल्या. यासह दक्षिण आफ्रिकेचा डाव 246 धावांवर आटोपला. त्याआधी दक्षिण आफ्रिकेने पहिल्या डावात 160 धावा करुन विंडिजला 144 धावांवर गुंडाळलं. त्यामुळे त्याने 16 धावांची आघाडी मिळाली. त्यामुळे विंडिजला 263 धावांचं आव्हान मिळालं. विंडिजसाठी दुसऱ्या डावात जेडन सील्स याने 61 धावांच्या मोबदल्यात 6 विकेट्स घेतल्या.
विंडिजचा पराभव
विंडिजला 263 धावा करुन सामन्यासह मालिका विजयाची संधी होती. मात्र विंडिजचा अर्धा संघ हा 103 धावांवर माघारी परतलेला. त्यानंतर गुडाकेश मोती याने विंडिजच्या विजयाच्या आशा कायम ठेवल्या. मात्र त्याला दुसऱ्या बाजूने चांगली साथ मिळाली नाही. गुडाकेशला केशव महाराज याने मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला. गुडाकेशने 45 धावांची खेळी केली. गुडाकेशशिवाय इतर कुणालाही विशेष करता आलं नाही. त्यामुळे विंडिजचा डाव हा 222 धावांवर आटोपला. केशव आणि कगिसो रबाडा या दोघांनी प्रत्येकी 3-3 विकेट्स घेतल्या.
दक्षिण आफ्रिकेचा विंडिज विरुद्ध सलग 10 कसोटी मालिका विजय
🟢🟡Match Result
🇿🇦South Africa wins by 40 runs.
The Sir Vivian Richards Trophy is ours! 🏆#WozaNawe #BePartOfIt #SAvWI pic.twitter.com/u7RY7yXbdB
— Proteas Men (@ProteasMenCSA) August 17, 2024
वेस्ट इंडीज प्लेइंग ईलेव्हन : क्रेग ब्रॅथवेट (कॅप्टन), मिकाईल लुईस, केसी कार्टी, ॲलिक अथानाझे, कावेम हॉज, जेसन होल्डर, जोशुआ दा सिल्वा (विकेटकीपर), गुडाकेश मोटी, जोमेल वॉरिकन, शामर जोसेफ आणि जेडेन सील्स.
दक्षिण आफ्रिका प्लेइंग ईलेव्हन : टेम्बा बावुमा (कर्णधार), एडन मार्करम, टोनी डी झॉर्झी, ट्रिस्टन स्टब्स, डेव्हिड बेडिंगहॅम, काइल वेरेन (विकेटकीपर), विआन मुल्डर, केशव महाराज, डेन पिएड, कागिसो रबाडा आणि नांद्रे बर्गर.