WI vs SA : वेस्ट इंडिजविरुद्धच्या टी20 मालिकेसाठी संघाची घोषणा, मुंबई इंडियन्सच्या या खेळाडूला मिळालं स्थान

वेस्ट इंडिजविरुद्धच्या टी20 मालिकेसाठी दक्षिण अफ्रिकेने संघाची घोषणा केली आहे. या संघाची धुरा एडन मार्करमच्या खांद्यावर असणार आहे. दक्षिण अफ्रिकन संघाने दोन अनकॅप्ड खेळाडूंना संघात स्थान दिल्याने आश्चर्याचा धक्का बसल आहे.

WI vs SA : वेस्ट इंडिजविरुद्धच्या टी20 मालिकेसाठी संघाची घोषणा, मुंबई इंडियन्सच्या या खेळाडूला मिळालं स्थान
Follow us
| Updated on: Aug 14, 2024 | 6:58 PM

दक्षिण अफ्रिका संघ सध्या दक्षिण अफ्रिका दौऱ्यावर आहे. वेस्ट इंडिज आणि दक्षिण अफ्रिका यांच्यात तीन सामन्यांची टी20 मालिका होणार आहे. टी20 संघाची धुरा एडन मार्करम याच्या खांद्यावर असणार आहे. या मालिकेसाठी दक्षिण अफ्रिकेने 15 खेळाडूंची नावं जाहीर केली आहेत. पण दिग्गज खेळाडूंना वगळण्यात आलं आहे. तसेच दोन अनकॅप्ड खेळाडूंना संघात स्थान मिळालं आहे. क्विंटन डी कॉक, एनरिक नॉर्त्जे, तबरेज शम्सी आणि कगिसो रबाडा यांना संघातून वगळण्यात आलं आहे.खेळाडूंच्या निवडीबाबत समिती सदस्य वॉल्टर यांनी सांगितलं की, ‘काही खेळाडूंच्या नावाचा विचार केला नाही. या मागे काही कारणं आहेत. काही खेळाडू जखमी आहेत. तर काही खेळाडूंचा वर्कलोड मॅनेज करण्यासाठी निर्णय घेतला गेला आहे.’ क्वेना मफाकाला संघात स्थान दिलं आहे. क्वेना आयपीएल 2024 स्पर्धेत मुंबई इंडियन्सकडून खेळला होता.तसेच टी20 चॅलेंज स्पर्धेत चमकदार कामगिरी केलेल्या जेसन स्मिथला संघात घेतलं आहे.

जेसन स्मिथने टी20 चॅलेंज स्पर्धेत आपल्या खेळीने लक्ष वेधून घेतलं होतं. अंतिम सामन्यात 51 धावांची खेळी केली होती. तर संपूर्ण स्पर्धेत त्याने 41.57 च्या सरासरीने आणि 134.10 च्या स्ट्राईक रेटने 291 धावा केल्या होत्या. जेसन मीडियम स्पेस गोलंदाजीही करतो. दुसरीकडे, क्वेना मफाकालाही संघात स्थान मिळालं आहे. त्याने अंडर 19 वर्ल्डकपमध्ये चांगली गोलंदाजी केली होती. 9.71 च्या सरासरीने 21 विकेट घेतल्या होत्या. त्याच कामगिरीवर मुंबई इंडियन्सने त्याची निवड केली होती. पण आयपीएलमध्ये त्याची चमक हवी तशी दिसली नाही. पण दक्षिण अफ्रिकन निवड समितीने त्याच्यावर विश्वास दाखवला आहे. पहिला टी20 सामना 24 ऑगस्ट, दुसरा टी20 सामना 26 ऑगस्ट आणि तिसरा टी20 सामना 28 ऑगस्टला होणार आहे. भारतीय वेळेनुसार दुपारी 12.30 वाजता सामना सुरु होईल.

वेस्ट इंडिजविरुद्धच्या टी20 मालिकेसाठी दक्षिण अफ्रिकेचा संघ : एडन मार्कराम (कर्णधार), ओटनील बार्टमॅन, नंद्रे बर्गर, डोनोवन फरेरा, ब्योर्न फोर्टुइन, रेजा हेंड्रिक्स, पॅट्रिक क्रूगर, क्वेना मफाका, वियान मुल्डर, लुंगी एनगिडी, रेयान रिकेल्टन, जेसन स्मिथ, ट्रिस्टन स्टब्स, रसी वॅन डेर डुसेन, लिजाड विलियम्स.

भाजपचं ठरलं? विधानसभा निवडणुकीत 'इतक्या' जागा लढवणार
भाजपचं ठरलं? विधानसभा निवडणुकीत 'इतक्या' जागा लढवणार.
'महाराष्ट्र विकणाऱ्यांमध्ये शिंदेंचं नाव वर...', कोणी केला हल्लाबोल?
'महाराष्ट्र विकणाऱ्यांमध्ये शिंदेंचं नाव वर...', कोणी केला हल्लाबोल?.
अजित पवार गट भाजप नेत्यांची दिल्लीत तक्रार करणार, पण कारण नेमकं काय?
अजित पवार गट भाजप नेत्यांची दिल्लीत तक्रार करणार, पण कारण नेमकं काय?.
एकनाथ खडसेंचा चाकणकरांना खोचक टोला; म्हणाले, 'दुसऱ्याच्या घरात...'
एकनाथ खडसेंचा चाकणकरांना खोचक टोला; म्हणाले, 'दुसऱ्याच्या घरात...'.
चाकणकर अन् रोहिणी खडसेंमध्ये पुन्हा जुंपली, शाब्दिक वॉर बापापर्यंत...
चाकणकर अन् रोहिणी खडसेंमध्ये पुन्हा जुंपली, शाब्दिक वॉर बापापर्यंत....
मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावली, आमरण उपोषण सुरूच
मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावली, आमरण उपोषण सुरूच.
'मी मुख्यमंत्रिपदाचा चेहरा', जितेंद्र आव्हाड नेमकं काय म्हणाले?
'मी मुख्यमंत्रिपदाचा चेहरा', जितेंद्र आव्हाड नेमकं काय म्हणाले?.
तिकीट कन्फर्म! जागावाटपासंदर्भात बैठक,दादांकडून विद्यमान आमदारांना हमी
तिकीट कन्फर्म! जागावाटपासंदर्भात बैठक,दादांकडून विद्यमान आमदारांना हमी.
पुण्यात यंदा तब्बल 'इतके' तास विसर्जन मिरवणूक, 2 वर्षांचा रेकॉर्ड कायम
पुण्यात यंदा तब्बल 'इतके' तास विसर्जन मिरवणूक, 2 वर्षांचा रेकॉर्ड कायम.
'पोरांनो...'त्या' भानगडीत पडू नका', इंदुरीकरांचा तरूणांना काय सल्ला?
'पोरांनो...'त्या' भानगडीत पडू नका', इंदुरीकरांचा तरूणांना काय सल्ला?.