WI vs SL : केविन सिनक्लेयर विकेट घेतल्यानंतरच सिलेब्रेशन व्हायरल, अशा मारल्या उड्या Watch Video

वनडे वर्ल्डकप स्पर्धेतून वेस्ट इंडिजला गाशा गुंडाळावा लागला आहे. शेवटच्या सामन्यातही श्रीलंकेने वेस्ट इंडिजला 8 विकेट्स आमि 34 चेंडू राखून पराभूत केलं.

WI vs SL : केविन सिनक्लेयर विकेट घेतल्यानंतरच सिलेब्रेशन व्हायरल, अशा मारल्या उड्या Watch Video
WI vs SL : केविन सिनक्लेयर गडी बाद केल्यानंतरची स्टाईल चर्चेत, पाहा Video
Follow us
| Updated on: Jul 07, 2023 | 8:18 PM

मुंबई : वनडे वर्ल्डकप स्पर्धेसाठी क्वालिफायर स्पर्धेतून श्रीलंका आणि नेदरलँड संघ पात्र ठरले आहे. त्यामुळे वेस्ट इंडिज विरुद्ध श्रीलंका हा सामना फक्त औपचारिक होता असंच म्हणावं लागेल. या सामन्यात श्रीलंकेने नाणेफेकीचा कौल जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. वेस्ट इंडिज संघाला 243 धावांवर रोखण्यात श्रीलंकन गोलंदाजांना यश आलं. तर विजयासाठी दिलेल्या 244 धावा श्रीलंकेने 2 गडी गमवून 44.2 षटकात पूर्ण केल्या. श्रीलंकेच्या दोन फलंदाजांना बाद करण्यात वेस्ट इंडिजला यश आलं. या सामन्यात केविन सिनक्लेयरने पाथुम निसांक्काची विकेट घेतली आणि वेगळंच सेलिब्रेशन केलं. त्याच्या सेलिब्रेशनची आता सोशल मीडियावर जोरदार चर्चा होत आहे.

असं केलं सेलिब्रेशन

वेस्ट इंडिजने दिलेल्या 244 धावांचा पाठलाग करण्यासाठी श्रीलंकेकडून पाथुम निस्सांका आणि दिमुथ करुणारत्ने ही जोडी मैदानात उतरली. पहिल्या गड्यासाठी दोघांनी 190 धावांची भागीदारी केली आणि विजय सोपा केला. ही जोडी फोडण्यात केविन सिनक्लेयर याला यश आलं. शतकी खेळी करणाऱ्या पाथुम निस्सांकाला तंबूत पाठवलं. त्याच्या गोलंदाजीवर रोस्टोन चेसने झेल घेतला. हा झेल घेतल्यानंतर साजरा केलेला आनंद चर्चेच आहे.

यापूर्वीही केविन सिनक्लेयर याने असाच आनंद साजरा केला आहे. त्यामुळे विकेट घेतल्यानंतर आनंद साजरा करण्याची त्याची एक स्टाईल आहे, असं क्रिकेटप्रेमींना माहिती आहे.

48 वर्षात पहिल्यांदाच वेस्ट इंडिज संघ वनडे वर्ल्डकपसाठी अपात्र ठरला आहे. वनडे वर्ल्डकप क्वॉलिफायर स्पर्धेत नेदरलँड, झिम्बाब्वे आणि स्कॉटलँडसारख्या दुबळ्या संघाकडून पराभवाचं तोंड पाहावं लागलं आहे. यामुळे वेस्ट इंडिज क्रीडाप्रेमींमध्ये प्रचंड नाराजी आहे. सोशल मीडियावर याबाबत त्यांनी तीव्र प्रतिक्रिया नोंदवल्या आहेत.  वनडे वर्ल्ड दर चार वर्षांनी होतो. तर वनडे वर्ल्डकप इतिहासात वेस्ट इंडिजने दोन वेळा जेतेपदावर नाव कोरलं आहे.

दोन्ही संघाचे खेळाडू

वेस्ट इंडिजचा संघ : ब्रँडन किंग, जॉनसन चार्ल्स, शरमाह ब्रूक्स, शाय होप, निकोलस पूरन, कीसी कॅर्टी, कायल मेयर्स, रोस्टोन चेस, रोमारियो शेफर्ड, केविन सिनक्लेयर, अकिल होसेन

श्रीलंकेचा संघ : पाथुम निस्सांका, दिमुथ करुणारत्ने, कुसल मेंडिस, सदीरा समाराविक्रमा, चरिथ असालंका, सहान अरच्चिगे, दासुन शनाका, दुशन हेमांथा, महीश थीकक्षाना, मथीशा पथिराना, दिशान मधुशंका

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.