मेलबर्न: टी 20 वर्ल्ड कपमध्ये (T2O World cup) बुधवारी अल्जारी जोसेफने (Alzarri Joseph) झिम्बाब्वेची वाट लावली. झिम्बाब्वेने मॅच जिंकण्याचे शर्थीचे प्रयत्न केले. पण त्यांना यश मिळालं नाही. ग्रुप बी मधील हा सामना वेस्ट इंडिजने (wi vs zim) जिंकला. वेस्ट इंडिजची टीम सुपर 12 च्या शर्यतीत कायम आहे. वेस्ट इंडिजच्या टीमने पहिली बॅटिंग केली. त्यांनी 153 धावा केल्या. झिम्बाब्वेची टीम 122 धावांवर ऑलआऊट झाली. झिम्बाब्वेची टीम पूर्ण 20 ओव्हर्सही खेळू शकली नाही.
जे चार्ल्सने संभाळला वेस्ट इंडिजचा डाव
वेस्ट इंडिजचा कॅप्टन निकोलस पूरनने टॉस जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. सिकंदर रजाने घातक गोलंदाजी केली. वेस्ट इंडिजच्या टीमने 20 ओव्हर्समध्ये 153 धावा केल्या. टीमसाठी चार्ल्सने 45 आणि रोव्हमॅन पॉवेलने 28 धावा केल्या.
टीमची सुरुवात चांगली झाली नाही. मायर्स अवघ्या 13 रन्सवर आऊट झाला. जे चार्ल्स आणि लुईसने चांगली भागीदारी केली. सिकंदर रजाने लुईसला आऊट करुन ही भागीदारी तोडली. कॅप्टन पूरनही खास कमाल करु शकला नाही. 7 धावांवर तो आऊट झाला.
रोव्हमॅन पॉवेलची तुफानी बॅटिंग
अखेरच्या षटकात रोव्हमॅन पॉवेलने वेगवान फलंदाजी केली. त्याने टीमची धावसंख्या 153 पर्यंत पोहोचवली. सिकंदर रजाने तीन आणि मुजरबानीने दोन विकेट घेतल्या.
अल्जारी जोसेफसमोर झिम्बाब्वेची शरणागती
झिम्बाब्वेने सावध सुरुवात केली. वेस्ली मधावीरे आणि रेजिस चकाबवाने पहिल्या विकेटसाठी 29 धावाांची भागीदारी केली. अल्जारी जोसेफने सर्वात आधी चकाबवाला बाद केलं. 17 धावांमध्ये झिम्बाब्वेच्या चार विकेट पडल्या. त्यांची संपूर्ण टीम 18.2 ओव्हर्समध्ये 122 धावात ऑलआऊट झाली. अल्जारीने चार विकेट घेतल्या. त्याने चारही फलंदाजांना क्लीन बोल्ड केलं. जेसन होल्डरने तीन विकेट घेतल्या.