Icc World Cup 2023 | वर्ल्ड कप आधी मोठी घोषणा, ‘हा’ दिग्ग्ज टीमच्या हेड कोचपदी

| Updated on: May 13, 2023 | 4:14 PM

क्रिकेट विश्वातून या क्षणाची मोठी बातमी समोर आली आहे. टीमला 2 वर्ल्ड कप जिंकून देणाऱ्या माजी कर्णधाराची हेड कोच म्हणून नियुत्ती करण्यात आली आहे. ट्विट करुन याबाबतची माहिती देण्यात आली आहे.

Icc World Cup 2023 | वर्ल्ड कप आधी मोठी घोषणा, हा दिग्ग्ज टीमच्या हेड कोचपदी
Follow us on

मुंबई | क्रिकेटच्या महासंग्रामाला अर्थात आयसीसी वनडे वर्ल्ड कप 2023 स्पर्धेला अवघे काही महिने बाकी आहेत. या वर्ल्ड कपचं आयोजन यंदा भारतात करण्यात आलं आहे. तब्बल 12 वर्षांनंतर भारताला आयसीसी वनडे वर्ल्ड कप स्पर्धेच्या यजमानपदाचा मान मिळाला आहे. या महत्वाच्या स्पर्धेसाठी सर्व संघांनी तयारी सुरु केलेली आहे. या वर्ल्ड कपआधी खेळाडूंचा सराव व्हावा, यासाठी द्विपक्षीय एकदिवसीय मालिका खेळवण्यात आल्या आहेत. तसेच अनेक वनडे सीरिज या प्रस्तावितही आहेत. या दरम्यान क्रिकेट विश्वातून एक मोठी बातमी समोर आली आहे. या वर्ल्ड कपआधी हेड कोचचं नाव जाहीर करण्यात आलं आहे. कोचपदी नियुक्ती करण्यात आलेल्या दिग्गजाने आपल्या नेतृत्वात टीमला 2 वर्ल्ड कप जिंकून दिले आहेत.

टीम मॅनेजमेंटने ट्विट करत याबाबतची माहिती दिली आहे. टीम मॅनेजमेंटने या दिग्गाच्या खांद्यावर वनडे आणि टी 20 या दोन्ही फॉर्मेटसाठी प्रशिक्षकपदाची जबाबदारी सोपवली आहे. वेस्ट इंडिजच्या टीमच्या मुख्य प्रशिक्षकपदी डॅरेन सॅमी याची निवड करण्यात आली आहे. डॅरेनने आपल्या कॅप्टन्सीत विंडिजला 2012 आणि 2016 साली टी 20 वर्ल्ड कप जिंकून दिला होता. तर विंडिज टेस्ट टीम आणि ए टीमचा कोच म्हणून आंद्रे कोली याची निवड केली गेली आहे.

डॅरेन सॅमी काय म्हणाला?

“माझ्यासाठी हे एक आव्हान असेल. मात्र या संधीसाठी मी उत्साही आहे. मी टीमला चॅम्पियन करण्यासाठी पूर्ण प्रयत्न करेन”, अशी प्रतिक्रिया डॅरेनने दिली. विंडिज टीमला वर्ल्ड कपसाठी थेट प्रवेश नाही. त्यामुळे विंडिजला पात्रता फेरीत विजय मिळवूनच वर्ल्ड कपसाठी प्रवेश मिळवता येणार आहे. या वर्ल्ड कप क्वालिफायर आयोजन हे 18 जूनपासून करण्यात आलं आहे. यामध्ये एकूण 10 संघ सहभागी होणार आहेत.

या दोघांची प्रशिक्षक म्हणून निवड

त्याआधी विंडिज विरुद्ध यूएई यांच्यात 5 ते 9 जून रोजी 3 सामन्यांची एकदिवसीय मालिका पार पडणार आहे. या मालिकेपासून सॅमीच्या प्रशिक्षकपदाच्या कार्यकाळाची सुरुवात होणार आहे.

विंडिज क्रिकेट बोर्डाने या क्वालिफायर आणि यूएई विरुद्धच्या वनडे सीरिजसाठी संघ जाहीर केला आहे.

वर्ल्ड कप पात्रता फेरीसाठी विंडिज टीम | शाई होप (कर्णधार), रोवमॅन पॉवेल (उपकर्णधार), शमर ब्रूक्स, यानिक कारिया, कीसी कार्टी, रोस्टन चेज, जेसन होल्डर, अकील होसेन, अल्जारी जोसेफ, ब्रँडन किंग, कायल मेयर्स, गुडाकेश मोती, कीमो पॉल, निकोलस पूरन आणि रोमारियो शेफर्ड.

यूएई विरुद्धच्या वनडे सीरिजसाठी विंडिज टीम | शाई होप (कॅप्टन), ब्रँडन किंग (उपकर्णधार), एलिक अथानाजे, शमरह ब्रूक्स, यानिक कारिया, कीसी कार्टी, रोस्टन चेज, डोमिनिक ड्रेक्स, केवम हॉज, अकीम जॉर्डन, गुडाकेश मोती, कीमो पॉल, रेमन रीफर, ओडियन स्मिथ आणि डेवोन थॉमस.