दिल्ली कसोटीआधी टीम मॅनेजमेंटचा मोठा निर्णय, अचानक कॅप्टनच बदलला

टीम इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात दिल्लीत 17 फेब्रुवारीपासून दुसरा कसोटी सामना खेळवण्यात येणार आहे. या सामन्याआधी टीम मॅनेजमेंटने मोठा निर्णय घेतला आहे.

दिल्ली कसोटीआधी टीम मॅनेजमेंटचा मोठा निर्णय, अचानक कॅप्टनच बदलला
Follow us
| Updated on: Feb 16, 2023 | 8:02 PM

मुंबई : टीम इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात बॉर्डर गावसकर ट्रॉफीतील दुसरा कसोटी सामना हा 17 फेब्रुवारीपासून खेळवण्यात येणार आहे. या सामन्याचं आयोजन दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियममध्ये करण्यात आलंय. या सामन्याला सकाळी 9 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होणार आहे. टीम इंडिया दुसऱ्या सामन्यासाठी सज्ज आहे. टीम इंडियाच्या खेळाडूंनी जोरदार सराव केला आहे. या मालिकेत रोहित शर्मा टीम इंडियाचं नेतृत्व करतोय. मात्र दिल्ली कसोटीआधी क्रिकेट विश्वातून मोठी बातमी समोर आली आहे.

या टीमने बदलला कॅप्टन

वेस्टइंडिज क्रिकेटमध्ये खांदेपालट झाली आहे. विंडिजने कॅप्टन बदलला आहे. विंडिजने वनडे आणि टी 20 टीमचा कॅप्टन बदलला आहे. शाई होप याला वनडे तर रोवमॅन पॉवेल याला टी 20 टीमची जबाबदारी देण्यात आली आहे. ऑस्ट्रेलियात टी 20 वर्ल्ड कप पार पडला. यानंतर निकोलस पूरन याने विंडिज टीमच्या कर्णधारपदाचा राजीनामा दिला. त्यामुळे विंडिजकडे पूर्णवेळ कर्णधार नव्हता. त्यामुळे बुधवारी होप आणि पॉवेल या दोघांची कर्णधारपदी नियुक्ती करण्यात आली.

होप आणि पॉवेल या दोघांची कर्णधार म्हणून पुढील महिन्यातच कस लागणार आहे. विंडिज दक्षिण आफ्रिकेत 3 वनडे आणि 3 टी 20 सामन्यांची मालिका खेळणार आहे. विकेटकीपर बॅट्समन होप याला 100 वनडे सामन्यांचा अनुभव आहे. तसेच त्याला उपकर्णधारपदाचा अनुभव आहे. होपने 38 टेस्ट, 104 वनडे आणि 19 टी 20 सामन्यात विंडिजचं प्रतिनिधित्व केलंय.

हे सुद्धा वाचा

टीम इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलिया दुसरी कसोटी

दरम्यान टीम इंडिया ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या दुसऱ्या कसोटीत विजयी घोडदौड कायम ठेवण्याच्या निर्धाराने उतरणार आहे. टीम इंडियासाठी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनलच्या दृष्टीने ही मालिका निर्णायक आहे. त्यामुळे टीम इंडियाने कसून सराव केला आहे.

टीम इंडिया संभावित प्लेइंग इलेव्हन : रोहित शर्मा (कॅप्टन), शुबमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, श्रेयस अय्यर/सूर्यकुमार यादव, केएस भरत, रविंद्र जडेजा, अक्षर पटेल, आर अश्विन, मोहम्मद शमी आणि मोहम्मद सिराज.

टीम इंडिया विरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी ऑस्ट्रेलिया : पॅट कमिन्स (कर्णधार), डेविड वॉर्नर, एश्टोन एगर, स्कॉट बोलँड, एलेक्स कॅरी, कॅमरन ग्रीन, जोश हेझलवुड, पीटर हॅंडस्कॉम्ब, ट्रेविस हेड, उस्मान ख्वाजा, मार्नस लाबुशेन, नॅथन लियॉन, लांस मॉरिस, टॉड मरफी, मॅथ्यू रेनशॉ, स्टीव स्मिथ, मिशेल स्टार्क आणि मिशेल स्वीपसन.

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.