IPL 2022 Final : दो दोस्तो की टक्कर, याद रखेगा जमाना! आयपीएलला नवा चॅम्पियन मिळणार की राजस्थान पुन्हा इतिहास घडवणार?

आयपीएलचा सामना पाहण्यासाठी गुजरातमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर एक लाखाहून अधिक प्रेक्षक पोहोचण्याची अपेक्षा आहे.

IPL 2022 Final : दो दोस्तो की टक्कर, याद रखेगा जमाना! आयपीएलला नवा चॅम्पियन मिळणार की राजस्थान पुन्हा इतिहास घडवणार?
गुजरात टायटन्स आणि राजस्थान रॉयल्सImage Credit source: social
Follow us
| Updated on: May 29, 2022 | 7:44 AM

अहमदाबाद : आयपीएलच्या (IPL 2022) पंधराव्या सीजनमधील विजेतेपद मिळवण्यासाठी आज गुजरातमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर (Narendra Modi Stadium) गुजरात टायटन्स (Gujarat Titans) आणि राजस्थान रॉयल्स (Rajasthan Royals) यांच्यात लढत होणार आहे. पंधरा वर्षापूर्वी आयपीएलच्या पहिल्या सीजनचे विजेतेपद मिळवणाऱ्या राजस्थान रॉयल्सला पुन्हा एकदा इतिहास घडवण्याची संधी आहे. तर दुसरीकडे दिग्गज संघांचा पराभव करून आयपीएलमध्ये पहिल्यांदा खेळणाऱ्या गुजरात टायटन्सला आयपीएलला नवा चॅम्पियन देण्याची संधी आहे. आज दोन शेजारील राज्यांचे संघ इतिहास घडवण्यासाठी मैदानात उतरतील. राजस्थान एकदा चॅम्पियन राहिलाय. मात्र, याला अनेक वर्ष झाले आहेत. तर गुजरात मात्र नवा संघ आहे. त्यामुळे आजच्या सामन्याकडे विशेष लक्ष असणार आहे.

गुजरात संघ फॉर्ममध्ये

अंतिम फेरीत विश्वविक्रम होणार का?

आयपीएलचा सामना पाहण्यासाठी गुजरातमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर एक लाखाहून अधिक प्रेक्षक पोहोचण्याची अपेक्षा आहे. हा सामना पाहण्यासाठी एक लाख 10 हजाराहून अधिक प्रेक्षक पोहोचले तर हा एक विश्वविक्रम ठरेल. आयपीएलचा अंतिम सामना जगातील सर्वात मोठ्या क्रिकेट स्टेडियममध्ये खेळवला जाणार आसल्यानं हे देखील त्यातल्या त्यात विशेष आहे. एवढ्या मोठ्या संख्येनं स्टेडियममध्ये बसून चाहत्यांनी सामना कधीच पाहिला नसेल. अशा परिस्थितीत गुजरात टायटन्सला याठिकाणी एक प्रकारचा वेगळाच आनंद मिळेल. कारण हा त्यांच्या घरच्या मैदानावरचा सामना असणार आहे.

वेळेत बदल

तापर्यंत आयपीएलमधील सर्व सामने एकतर संध्याकाळी 7.30 वाजता सुरू झाले आहेत किंवा डबल हेडर सामना असले की दुपारी  3.30 वाजता सुरू झाले आहेत. अगदी प्लेऑफ सामन्यांची वेळ 7:30 होती. मात्र, आयपीएलच्या 15 व्या हंगामातील अंतिम सामना 7.30 नाही तर 8.30 वाजता सुरू होईल. अशा परिस्थितीत चाहत्यांना रात्री उशिरापर्यंत गुजरात टायटन्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स यांच्या अंतिम सामन्याचा आनंद लुटता येणार आहे. या सामन्यात नाणेफेक भारतीय वेळेनुसार सायंकाळी सात वाजता होणार असून त्यापूर्वी विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

समारोप समारंभ

आयपीएलमध्ये गेल्या अनेक सीझनमध्ये उद्घाटन किंवा समारोप सोहळा पाहायला मिळत नाही. मात्र, यावेळी चाहत्यांना सामन्यापूर्वीचा रंगारंग कार्यक्रम पाहण्याची संधी मिळणार आहे. बॉलीवूड अभिनेता रणवीर सिंग, ऑस्कर विजेते ए .आर. रहमान, अभिनेत्री उर्वशी रौतेला आयपीएलच्या समारोप समारंभात परफॉर्म करताना दिसणार आहेत. यादरम्यान, सुपरस्टार आमिर खान देखील दिसणार आहे. जो त्याच्या आगामी चित्रपटाचा ट्रेलर लाँच करणार आहे. यावेळी बीसीसीआयचे सर्व अधिकारी उपस्थित राहणार आहेत.

ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?.
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...