आयपीएल 2024 स्पर्धेच्या जेतेपदावर केकेआर नाव कोरणार? असा आहे योगायोग
आयपीएल 2024 स्पर्धेत कोलकाता नाईट रायडर्सची विजयी घोडदौड सुरु आहे. सलग तीन सामने जिंकत कोलकात्याने अव्वल स्थानी झेप घेतली आहे. कोलकात्याची तीन सामन्यातील कामगिरी पाहता यंदाच्या पर्वातील प्रबळ दावेदार मानलं जात आहे. यात कर्णधार श्रेयस अय्यर आणि प्रशिक्षक गौतम गंभीर यांच्यातील खास कनेक्शनही सांगितलं जात आहे.
Follow us
कोलकाता नाईट रायडर्सने दिल्ली कॅपिटल्स संघाचा 106 धावांनी धुव्वा उडवला. या मोठ्या विजयाने गुणतालिकेत 2 गुणांसह जबरदस्त फायदा झाला आहे. रनरेटमुळे थेट अव्वल स्थानी झेपट घेतली आहे. या मोसमातील कोलकाता संघाच्या कामगिरीबद्दल गौतम गंभीरचे खूप कौतुक होत आहे.
कोलकाता नाइट रायडर्स संघाने आतापर्यंत दोनदा (2012, 2014) आयपीएलचे विजेतेपद पटकावले आहे. गौतम गंभीरच्या नेतृत्वाखाली संघाने दोन वेळा ही कामगिरी केली आहे. 2012 मध्ये केकेआरची जबाबदारी स्वीकारण्यापूर्वी गंभीर दिल्ली कॅपिटल्समध्ये होता. 2011 च्या लिलावात कोलकात्याने 14.9 कोटी रुपयांची बोली लावली आणि संघात घेतलं.
गौतम गंभीरप्रमाणेच श्रेयस अय्यरही कोलकाताकडून खेळण्यापूर्वी दिल्लीकडून खेळला होता. 2018 मध्ये गंभीरने दिल्लीचे कर्णधारपद सोडले तेव्हा अय्यरची कर्णधारपदी नियुक्ती करण्यात आली.2021 पर्यंत दिल्लीकडून खेळत राहिला. दिल्ली संघाने त्याला 2022 मध्ये सोडले.
गंभीरप्रमाणे श्रेयस अय्यर कोलकात्यासाठी सर्वात महागडा खेळाडू ठरला. आयपीएल 2022 च्या हंगामातील तीन सर्वात महागड्या खेळाडूंमध्ये त्याचा समावेश झाला. केकेआरने 12.25 कोटींची बोली लावून संघात समावेश केला. गंभीरप्रमाणेच त्याला ताबडतोब कर्णधार बनवण्यात आले.
श्रेयस अय्यर आता कोलकाताकडून दुसरा सीझन खेळत आहे. कारण 2023 मध्ये तो दुखापतीमुळे संपूर्ण हंगाम बाहेर होता. आता केकेआरसाठी आपला दुसरा हंगाम खेळत असताना अय्यरच्या नेतृत्वाखाली केकेआर संघाची कामगिरी पाहता विजेतेपदाचा प्रबळ दावेदार मानला जात आहे.
गंभीरने केकेआरसाठी आयपीएलचे जेतेपद पटकावले होते, तीच कामगिरी अय्यर त्याच्या दुसऱ्या सत्रात करू शकतो का, हे पाहणे बाकी आहे.