IPL 2024 : हार्दिक पांड्याच्या नेतृत्वात मुंबई इंडियन्स जेतेपद मिळवणार? अशी असू शकते रणनिती
आयपीएल स्पर्धेचं 17 वं पर्वाचे वेध सुरु झाले आहेत. जेतेपदासाठी 10 संघांनी कंबर कसली आहे. खासकरून मुंबई इंडियन्स हार्दिक पांड्याच्या नेतृत्वात मैदानात उतरणार आहे. हार्दिक पांड्या विश्वास सार्थकी लावणार का? असा प्रश्न अनेकांना पडला आहे. हार्दिक पांड्याची यंदाच्या आयपीएल पर्वात काय रणनिती असू शकते, जाणून घ्या.
मुंबई : मुंबई इंडियन्स फ्रेंचायसीने हार्दिक पांड्याच्या नेतृत्वावर विश्वास टाकला आहे. रोहित शर्मासारखा सक्षम नेतृत्व असतानाही हार्दिक पांड्याच्या हाती धुरा सोपवली आहे. त्यामुळे हार्दिक पांड्याला मुंबई इंडियन्सच्या ड्रेसिंग रुममधील वातावरण आणि जेतेपदासाठी चांगलीच कसरत करावी लागणार आहे. रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, जसप्रीत बुमराह यासारख्या वरिष्ठ खेळाडूंना सांभाळावं लागणार आहे. त्यामुळे त्याच्या नेतृत्वाचा कस लागणार आहे. एखाद्या खेळाडूला डावलण्यापासून संधी देण्यापर्यंत हार्दिक पांड्याची कसरत असणार आहे. रोहित शर्मासारखा अनुभवी खेळाडू संघात असताना काय रणनिती करावी? असा प्रश्नही असेल. रोहित शर्माच्या नेतृत्वात मुंबई इंडियन्सने पाचवेळा जेतेपदावर नाव कोरलं आहे. आता सहाव्यांदा जेतेपद मिळवून देण्याची जबाबदारी हार्दिक पांड्यावर असणार आहे. मागच्या पर्वात रोहितच्या नेतृत्वा मुंबई इंडियन्स संघ प्लेऑफमध्ये पोहोचला होता. पण अंतिम फेरी गाठण्यात अपयश आलं होतं.
अशी असू शकते हार्दिक पांड्याची रणनिती
आयपीएल 2024 पर्वात संघाकडून सलामीला रोहित शर्मा आणि इशान किशन जोडी मैदानात उतरेल. तिसऱ्या क्रमांकावर टी20 फॉर्मेटमधील नंबर 1 खेळाडू सूर्यकुमार यादव येईलय चौथ्या क्रमांकावर तिलक वर्माला संधी मिळेल. पाचव्या क्रमांकावर टिम डेविडला संधी मिळू शकते. तर सहाव्या खुद्द हार्दिक पांड्या उतरू शकतो. गोलंदाजीची धुराही तो सांभळणार आहे. त्यामुळे चार षटकं टाकण्याची जबाबदारी त्याच्यावर असणार आहे.
प्लेइंग इलेव्हनमध्ये अनुभवी पियुष चावलाला संधी मिळेल. तसेच त्याला श्रेयस गोपालची साथ मिळू शकते. तर वेगवान गोलंदाजीची धुरा जसप्रीत बुमराह आणि गेराल्ड कोएत्झीच्या खांद्यावर असू शकते. दोन बाउंसरची परवानगी असल्याने रोमारियो शेफर्डलाही वेगवान गोलंदाजीच्या ताफ्यात संधी मिळेल. हा तळाशी येऊन फलंदाजीही करू शकतो.
आयपीएल 2024 साठी मुंबई इंडियन्स बेस्ट प्लेइंग 11
रोहित शर्मा, इशान किशन (विकेटकीपर), सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, टिम डेविड, हार्दिक पंड्या (कर्णधार), रोमारियो शेफर्ड, गेराल्ड कोएत्जी, जसप्रीत बुमराह, श्रेयस गोपाल, पीयूष चावला.