“ज्या खेळाडूंना भूक आहे त्यांनाच खेळवणार…”, कर्णधार रोहित शर्माचा रोख कोणाकडे?

इंग्लंडविरुद्धची पाच सामन्यांची कसोटी मालिका भारताने 3-1 खिशात घातली आहे. पाचवा सामना आता औपचारिक असेल. पण वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या दृष्टीने विजय महत्त्वाचा आहे. चौथ्या सामन्यानंतर कर्णधार रोहित शर्मा याने पत्रकार परिषद घेतली आणि अप्रत्यक्षरित्या काही खेळाडूंना सुनावले.

ज्या खेळाडूंना भूक आहे त्यांनाच खेळवणार..., कर्णधार रोहित शर्माचा रोख कोणाकडे?
Follow us
| Updated on: Feb 26, 2024 | 6:32 PM

मुंबई : इंग्लंड विरुद्धची पाच सामन्यांची कसोटी मालिका खिशात घातल्यानंतर कर्णधार रोहित शर्माने आपलं परखड मत मांडलं आहे. भारताने इंग्लंडला चौथ्या कसोटी सामन्यात पाच गडी राखून पराभूत केलं. तसेच पाच सामन्यांची कसोटी मालिका 3-1 ने खिशात घातली. यासह टीम इंडियाने भारतात सलग 17 वी कसोटी मालिका जिंकली आहे. इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत युवा खेळाडूंचं योगदान मोलाचं ठरलं. सरफराज खान, ध्रुव जुरेल, य़सस्वी जयस्वाल आणि आकाशदीप या खेळाडूंनी आपली छाप पाडली. रोहित शर्माने या तरुण खेळाडूंचं कौतुक केलं. त्यांच्यात जिंकण्याची क्षमता असल्याचंही अधोरेखित केलं. तसेच टीम इंडियात पुनरागमनासाठी डोळे लावून बसलेल्या खेळाडूंवर रोहित शर्माने अप्रत्यक्षरित्या टीका केली. विजयाची भूक असलेल्या आणि मेहनती खेळाडूंनाच संधी मिळेल.

“ज्या लोकांना भूक आहे आम्ही त्याच लोकांना संधी देणार.”, असं कर्णधार रोहित शर्मा याने सांगितलं. “जर भूकच नसेल तर त्यांना खेळवून काहीच उपयोग नाही. मला या संघात भूक नसलेल्या एकही खेळाडू पाहायचा नाही. मग तो संघात असो की संघात खेळत नसू दे. कसोटी क्रिकेटमध्ये तुम्हाला खूप कमी संधी मिळतात. जर तुम्ही सिद्ध केलं नाही तर बाहेर फेकले जाल.”, असं कर्णधार रोहित शर्मा म्हणाला.

कर्णधार रोहित शर्मा याने खऱ्या अर्थाने बीसीसीआयची री ओढली. काही खेळाडू रणजी ट्रॉफीकडे कानाडोळा करत आहेत. तसेच आयपीएलला महत्त्व देत असल्याचं दिसलं आहे. 25 वर्षीय इशान किशनने रणजीकडे पाठ फिरवली आहे. तसेच बरोड्यात ट्रेनिंग घेत आहे. तर मुंबई इंडियन्सचा कर्णधार हार्दिक पांड्या पुढच्या महिन्यात आयपीएल खेळताना दिसणार आहे. यावरून रोहित शर्माला एक प्रश्न विचारण्यात आला. पैशांच्या हव्यासापोटी युवा खेळाडूंमध्ये कसोटी न खेळण्याची स्थिती दिसते.

“टेस्ट क्रिकेटमध्ये खऱ्या अर्थाने खेळाडूची कसोटी लागते. जर तुम्हाला या फॉरमॅटमध्ये यश मिळवायचं असेल तर तुमच्या विजयाची भूक असायला हवी. हे लगेच कळतं की कोणाला भूक नाही आणि कोणाला येथे राहायचं नाही. ज्यांना भूक आहे. कठीण प्रसंगात खेळायचं त्यांना संधी मिळेल. हे अगदी सोपं आहे. आयपीएल चांगलं आहे यात शंका नाही. पण कसोटी एक कठीण फॉरमॅट आहे. मागचे तीन विजय सहज मिळाले नाहीत. दीर्घ गोलंदाजी आणि बॅट्समनला घाम गाळावा लागला आहे. हे खरंच कठीण आहे.”, असंही रोहित शर्मा म्हणाला.

शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप
शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप.
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी.
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील.
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ.
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय...
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय....
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?.
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा.
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे.
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे.
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई.