NZ vs SA : विल यंगचा झेल पाहून तुम्ही थक्क व्हाल, ‘जबरदस्त’ हेच शब्द तुमच्या तोंडून बाहेर पडतील, पहा VIDEO

| Updated on: Feb 28, 2022 | 6:12 PM

NZ vs SA : क्राइस्टचर्च कसोटीत (New Zealand vs South Africa, 2nd Test) यजमान न्यूझीलंडची स्थिती खराब आहे. पाहुण्या दक्षिण आफ्रिकेच्या संघाने कसोटीवर मजबूत पकड बनवली आहे.

NZ vs SA : विल यंगचा झेल पाहून तुम्ही थक्क व्हाल, जबरदस्त हेच शब्द तुमच्या तोंडून बाहेर पडतील, पहा VIDEO
न्यूझीलंडच्या विल यंगने पकडलेला जबरदस्त झेल
Image Credit source: Image Credit Source: BLACKCAPS INSTAGRAM SCREENSHOT
Follow us on

नवी दिल्ली: क्राइस्टचर्च कसोटीत (New Zealand vs South Africa, 2nd Test) यजमान न्यूझीलंडची स्थिती खराब आहे. पाहुण्या दक्षिण आफ्रिकेच्या संघाने कसोटीवर मजबूत पकड बनवली आहे. पण कसोटीच्या चौथ्यादिवशी विल यंगचीच (Will Young) सर्वत्र चर्चा होती. त्याने आपल्या जबरदस्त फिल्डिंगच प्रदर्शन केलं. दक्षिण आफ्रिकेच्या दुसऱ्याडावात न्यूझीलंडच्या विल यंगने (Will Young Catch) एक अप्रतिम झेल टिपला. प्रत्यक्ष स्टेडियमवर उपस्थित असणारे हा झेल पाहताना थक्क झाले. सामन्याची कॉमेंट्री करणाऱ्यांनाही असा झेल कोण कसा काय घेऊ शकतो? असा प्रश्न पडला. विल यंगने दक्षिण आफ्रिकेच्या मार्को जॅनसेनचा झेल घेतला. डीन ग्रान्डहोमच्या चेंडूवर जॅनसनने चांगला फटका खेळला होता. पण सीमारेषेवर तैनात असलेल्या विल यंगने कमालीचा झेल घेतला.

तुम्ही सुद्धा थक्क व्हाल

मार्को जॅनसनने लाँग ऑन आणि मिडविकेटच्या मध्ये एक जबरदस्त फटका मारला. विल यंग झेल घेण्यासाठी चेंडूच्या दिशेने पळाला. अप्रतिम झेप घेत एकाहाताने त्याने ही कॅच पकडली. विल यंगच्या कॅचचा हा व्हिडिओ पाहून तुम्ही सुद्धा थक्क व्हाल. यंगचा हा कॅच पाहून मैदानावरच्या न्यूझीलंडच्या खेळाडूंनाही आश्चर्य वाटलं.

क्विंटन डिकॉकने अचानक निवृत्ती घेतल्यानंतर काइल वेरेने विकेटकिपिंगची जबाबदारी संभाळत आहे. त्याच्या शतकाच्या बळावरच दक्षिण आफ्रिकेने न्यूझीलंड विरुद्धच्या दुसऱ्या कसोटीच्या चौथ्यादिवशीच्या खेळावर वर्चस्व राखलं. वेरेनच्या नाबाद 136 धावांच्या बळावर दक्षिण आफ्रिकेने चहापानापूर्वी आपला दुसरा डाव 354 धावांवर घोषित केला. न्यूझीलंडला विजयासाठी 425 धावांचे लक्ष्य दिले आहे. यजमान संघ 94 धावांवर चार विकेट गमावून संकटामध्ये आहे.

will young amazing catch video of marco jansen new zealand vs south africa 2nd test