WIND vs WAUS 3rd T20I | ऑस्ट्रेलियाला विजयासाठी 148 धावांचं आव्हान, कोण जिंकणार मालिका?
India Women vs Australia Women 3rd T20I 1st Inning Highlights | ऑस्ट्रेलियाला तिसऱ्या सामन्यासह मालिका जिंकण्यासाठी टीम इंडियाने 148 धावांचं आव्हान दिलं आहे.
नवी मुंबई | वूमन्स टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाला तिसऱ्या आणि अंतिम टी 20 सामन्यात विजयासाठी 148 धावांचं आव्हान दिलं आहे. टीम इंडियाने 20 ओव्हरमध्ये 6 विकेट्स गमावून 147 धावा केल्या. टीम इंडियाकडून विकेटकीपर बॅट्समन रिचा घोष हीने सर्वाधिक 34 धावा केल्या. तर दीप्ती शर्मा आणि अमनज्योत कौर या दोघींनी अखेरीस छोटेखानी पण महत्त्वाच्या आणि निर्णायक धावा केल्या. तर ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांनी भारतीय फलंदाजांना बेछुटपणे फटकेबाजी करण्यापासून रोखलं.
ऑस्ट्रेलियाने टॉस जिंकून टीम इंडियाला बॅटिंगसाठी भाग पाडलं. शफाली वर्मा आणि स्मृती मंधाना ही सलामी जोडी मैदानात आली. या दोघांनी टीम इंडियाला आश्वासक सुरुवात करुन दिली. मात्र शफाली टीम इंडियाचा स्कोअर 39 असताना आऊट झाली. शफाली 17 बॉलमध्ये 6 चौकारांच्या मदतीने 26 धावा करुन आऊट झाली. इथून टीम इंडियाने ठराविक अंतराने विकेट्स गमावल्या.
त्यानंतर जेमिमाह रॉड्रिग्जस 2 धावा करुन झटपट आऊट झाली. जेमिमाहनंतर स्मृतीने मैदानाबाहेरचा रस्ता धरला. स्मृतीने 28 बॉलमध्ये 2 चौकार आणि 1 सिक्सच्या मदतीने 29 धावा केल्या. शफाली आणि स्मृती या दोघींनी अपेक्षित आणि चांगली सुरुवात मिळाली. मात्र दोघींनाही मोठी खेळी करता आली नाही. स्मृतीनंतर कॅप्टन हरमनप्रीत कौर 3 धावा करुन आऊट झाली.
मात्र त्यानंतर रिचा घोषने टीम इंडियाचा डाव सावरला. रिचाने 2 चौकार आणि 3 षटकारांच्या मदतीने 28 बॉलमध्ये 34 धावांची खेळी केली. दीप्ती शर्माने 14 धावांचं योगदान दिलं. तर अमनज्योत कौर हीने नाबाद 17 आणि पूजा वस्त्राकर हीने नॉट आऊट 7 धावा केल्या. तर ऑस्ट्रेलियाकडून अॅनाबेल सदरलँड आणि जॉर्जिया वेरहॅम या दोघींनी प्रत्येकी 2-2 विकेट्स घेतल्या. तर एश्ले गार्डनर आणि मेगन शूट या दोघींच्या खात्यात 1-1 विकेट गेली.
सामना आणि मालिका कोण जिंकणार?
Innings Break!
An entertaining knock from @13richaghosh powers #TeamIndia to 147/6 👌👌
Second innings coming up shortly!
Scorecard ▶️ https://t.co/nsPC3lefeg#INDvAUS | @IDFCFIRSTBank pic.twitter.com/G3JJa4Fqr0
— BCCI Women (@BCCIWomen) January 9, 2024
टीम इंडिया प्लेईंग इलेव्हन | हरमनप्रीत कौर (कॅप्टन), स्मृती मंधाना, शफाली वर्मा, जेमिमाह रॉड्रिग्स, दीप्ती शर्मा, ऋचा घोष (विकेटकीपर), अमनजोत कौर, पूजा वस्त्राकर, श्रेयंका पाटील, रेणुका ठाकूर सिंग आणि तितास साधू.
ऑस्ट्रेलिया प्लेईंग इलेव्हन | एलिसा हिली (कॅप्टन आणि विकेटकीपर), बेथ मूनी, ताहलिया मॅकग्रा, एलिस पेरी, अॅश्ले गार्डनर, फोबी लिचफील्ड, ग्रेस हॅरिस, अॅनाबेल सदरलँड, जॉर्जिया वेरहॅम, किम गर्थ आणि मेगन शूट.