WIND vs WBAN: रेणूका-राधासमोर बांगलादेश फुस्स, टीम इंडियासमोर 81 धावांचं आव्हान
India Women vs Bangladesh Women Semi Final 1st Innings Highlights: बांगलादेशने टॉस जिंकून बॅटिंगचा निर्णय घेतला. मात्र भारतीय गोलंदाजांसमोर त्यांचा निभाव लागू शकला नाही.
वूमन्स आशिया कप 2024 स्पर्धेतील पहिल्या सेमी फायनलमध्ये बांगलादेशने टीम इंडियाला विजयासाठी 81 धावांचं आव्हान दिलं आहे. टीम इंडियाच्या गोलंदाजांसमोर बांगलादेशचे फलंदाज फुस्स ठरले. राधा यादव आणि रेणूका सिंह या जोडीसमोर बांगलादेशने गुडघे टेकले. त्यामुळे बांगलादेशला पूर्ण 20 ओव्हर खेळूनही 100 पार मजल मारता आली नाही. बांगलादेशची कॅप्टन निगर सुल्ताना हीने केलेल्या 32 धावांच्या खेळीमुळे बांगलादेशला 80 धावांपर्यंत मजल मारता आली. आता टीम इंडिया हे माफक आव्हान किती ओव्हरमध्ये पूर्ण करतं, याकडे साऱ्या भारतीय चाहत्यांचं लक्ष असणार आहे.
बांगलादेशने टॉस जिंकून बॅटिंगचा निर्णय घेतला. मात्र टीम इंडियाच्या गोलंदाजांसमोर बांगलादेश फ्लॉप ठरली. बांगलादेशकडून निगार सुल्ताना आणि शोमा अक्टर या दोघींनी 32 आणि 19 धावा केल्या . निगार सुल्ताना हीने 51 बॉलमध्ये 2 चौकारांच्या मदतीने 32 धावा केल्या. तर शोमा अक्टरने अखेरच्या क्षणी 18 बॉलमध्ये 2 चौकरांसह नॉट आऊट 19 रन्स केल्या. तर इतरांनी गुडघे टेकले. बांगलादेशच्या 6 जणींना दुहेरी आकडाही गाठता आला नाही. राधा यादव आणि रेणूका सिंह या दोघींनी बांगलादेशचा कार्यक्रम केला. तर इतर गोलंदाजांनी चांगली साथ दिली.
रेणूका सिंहने 4 पैकी 1 ओव्हर मेडल टाकली. रेणूकाने 2.50 च्या इकॉनॉमीने 10 धावांच्या मोबदल्यात 3 विकेट्स घेतल्या. राधा यादवने धावांचा अपवाद वगळता रेणूकासारखीच कामगिरी केली. राधाने 4 ओव्हरमध्ये 14 धावा देऊन 3.50 च्या इकॉनॉमीने 3 विकेट्स घेतल्या. तर पूजा वस्त्राकर आणि दीप्ती शर्मा या दोघींना 1-1 विकेट मिळाली.
रेणूका सिंहचं विकेट्सचं अर्धशतक
दरम्यान रेणूकाने या 3 विकेट्ससह एक खास कामगिरी केली आहे. रेणूकाने टी20i क्रिकेटमध्ये 50 विकेट्स पूर्ण केल्या आहेत. रेणूकाने 46 टी20i सामन्यांमध्ये ही कामगिरी केली. रेणूकाने टी20i क्रिकेटमध्ये 1 वेळा 5 आणि 1 वेळा 4 विकेट्स घेतल्या आहेत.
टीम इंडियासमोर 81 धावांचं आव्हान
An excellent bowling performance from #TeamIndia has restricted Bangladesh to 80/8 👌👌
3⃣ wickets each for Renuka Singh & Radha Yadav 1⃣ wicket each for Pooja Vastrakar & Deepti Sharma
Scorecard ▶️ https://t.co/JwoMEaSoyn#INDvBAN | #WomensAsiaCup2024 | #ACC pic.twitter.com/VDiEqqEoRv
— BCCI Women (@BCCIWomen) July 26, 2024
वूमन्स टीम इंडिया प्लेइंग ईलेव्हन : हरमनप्रीत कौर (कर्णधार), शफाली वर्मा, स्मृती मानधना, उमा चेत्री, जेमिमाह रॉड्रिग्स, रिचा घोष (विकेटकीपर), दीप्ती शर्मा, पूजा वस्त्राकर, राधा यादव, तनुजा कंवर आणि रेणुका ठाकूर सिंग.
बांगलादेश वूमन्स प्लेइंग ईलेव्हन : निगार सुल्ताना (कॅप्टन आणि विकेटकीपर), दिलारा अक्टर, मुर्शिदा खातून, रुमाना अहमद, इश्मा तंजीम, रितू मोनी, राबेया खान, शोर्ना अक्टर, नाहिदा अक्टर, जहांआरा आलम आणि मारुफा अक्टर.