Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs ENG | शफाली वर्मा हीचं इंग्लंड विरुद्ध खणखणीत अर्धशतक

Shafali Verma Fifty | शफाली वर्मा हीने इंग्लंड विरुद्ध तडाखेदार बॅटिंग करत जबरदस्त अर्धशतक ठोकलंय. शफालीने आतापर्यंत टीम इंडियासाठी अनेकदा अशी खेळी केली आहे.

IND vs ENG | शफाली वर्मा हीचं इंग्लंड विरुद्ध खणखणीत अर्धशतक
Follow us
| Updated on: Dec 06, 2023 | 10:22 PM

मुंबई | वूमन्स टीम इंडियाची लेडी वीरेंद्र सेहवाग अर्थात शफाली वर्मा हीने इंग्लंड विरुद्धच्या पहिल्या टी 20 सामन्यात मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर खणखणीत अर्धशतक ठोकलंय. शफालीने 197 धावांचा पाठलाग करताना शफालीने हे अर्धशतक केलं. शफालीने अवघ्या 37 चेंडूत अर्धशतक झळकावलं. शफालीने या अर्धशतकासह इंग्लंड विरुद्धच्या टी 20 मालिकेची जोरदार सुरुवात केली आहे. शफालीने या अर्धशतकी खेळीत जोरदार फटकेबाजी केली.

शफाली वर्मा आणि स्मृती मंधाना ही सलामी जोडी बॅटिंगसाठी आली. मात्र स्मृती टीम इंडियाचा स्कोअर 20 असताना 6 धावांवर आऊट झाली. त्यानंतर जेमिमाह रॉड्रिग्ज 4 धावांवर आऊट झाली. एका बाजूला ठराविक अंतराने विकेट जात होते. तर समोर 197 धावांचं आव्हान होतं. आता शफालीसोबत कॅप्टन हरमनप्रीत कौर होती. हरमनप्रीत कौरही आऊट झाली. मात्र शफाली एकटी इंग्लंड विरुद्ध उभी राहिली. शफालीने दांडपट्टा सुरु ठेवत अर्धशतक पूर्ण केलं.

एका बाजूला विकेट्स जात असल्याने शेफालीकडून भारतीय चाहत्यांना अपेक्षा होत्या. मात्र शफालीने क्रिकेट चाहत्यांनी निराशा केली. शफाली अर्धशतकानंतर 2 धावा जोडून आऊट झाली. शफालीने 52 धावा केल्या. शफालीने 42 बॉलमध्ये 9 चौकारांच्या मदतीने 52 धावांची खेळी केली.

शफाली वर्मा हीचं अर्धशतक

वूमन्स टीम इंडिया प्लेईंग ईलेव्हन | हरमनप्रीत कौर (कॅप्टन), स्मृती मंधाना, शफाली वर्मा, जेमिमाह रॉड्रिग्स, दीप्ती शर्मा, रिचा घोष (विकेटकीपर), श्रेयांका पाटील, कनिका आहुजा, पूजा वस्त्राकर, रेणुका ठाकूर सिंग आणि सायका इशाक.

वूमन्स इंग्लंड प्लेईंग ईलेव्हन | हेदर नाइट (कर्णधार), डॅनियल व्याट, सोफिया डंकले, अॅलिस कॅप्सी, नॅट सायव्हर-ब्रंट, एमी जोन्स (विकेटकीपर), फ्रेया केम्प, सोफी एक्लेस्टोन, सारा ग्लेन, लॉरेन बेल आणि माहिका गौर.