IND vs NZ : स्मृतीचं शतक-हरमनप्रीतचं अर्धशतक, टीम इंडियाचा मालिका विजय, अंतिम सामन्यात न्यूझीलंडचा 6 विकेट्सने धुव्वा
India Women vs New Zealand Women 3rd Odi Highlights In Marathi : टीम इंडियाने तिसऱ्या आणि अंतिम सामन्यात न्यूझीलंडवर 6 विकेट्सने मात करत मालिका जिंकली. टीम इंडियाने या विजयासह 3 सामन्यांची मालिका 2-1 ने आपल्या नावावर केली.
वूमन्स टीम इंडियाने तिसऱ्या आणि अंतिम सामन्यात न्यूझीलंडचा 6 विकेट्सने धुव्वा उडवत 3 सामन्यांची मालिका 2-1 अशा फरकाने जिंकली आहे. न्यूझीलंडने टीम इंडियाला विजयासाठी 233 धावांचं आव्हान दिलं होतं. टीम इंडियाने हे आव्हान स्मृती मंधाना हीचं शतक आणि कॅप्टन हरमनप्रीत कौर हीच्या नाबाद अर्धशतकी खेळीच्या जोरावर आणि 4 विकेट्स गमावून सहज पूर्ण केलं. टीम इंडियाने 44.2 ओव्हरमध्ये 236 धावा केल्या आणि मालिकेवर नाव कोरलं. या अंतिम सामन्याचं आयोजन हे अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये करण्यात आलं होतं.
टीम इंडियाची बॅटिंग
शफाली वर्मा आणि स्मृती मंधाना या सलामी जोडीला टीम इंडियाला चांगली सुरुवात करुन देता आली नाही. टीम इंडियाने 16 धावांवर पहिली विकेट गमावली. शफाली वर्मा 12 धावांवर बाद झाली. त्यानंतर स्मृती आणि यास्तिका भाटीया या दोघांनी दुसर्या विकेटसाठी 76 धावांची भागीदारी केली. ही जोडी सेट झाली होती. मात्र न्यूझीलंडची कर्णधार सोफी डेव्हाईन हीने ही जोडी फोडली. यास्तिकाने 49 चेंडूत 4 चौकारांच्या मदतीने 35 धावांचं योगदान दिलं.
त्यानंतर स्मृती आणि कॅप्टन हरमनप्रीत कौर या जोडीने तिसऱ्या विकेटसाठी शतकी भागीदारी करत टीम इंडियाच्या विजयाचा मार्ग मोकळा केला. या दोघींनी तिसऱ्या विकेटसाठी 117 धावांची भागीदारी केली. स्मृतीने या दरम्यान एकदिवसीय कारकीर्दीतील आठवं आणि विक्रमी शतक झळकावलं. मात्र त्यानतंर स्मृती बाद झाली. स्मृतीने 10 चौकारांच्या मदतीने 100 धावा केल्या. स्मृती बाद झाल्यानंतर हरमनप्रीत आणि जेमीमाह रॉड्रिग्स या दोघींनी टीम इंडियाला विजयानजीक नेलं. मात्र जेमीमाह 22 धावा करुन माघारी परतली.
त्यानंतर हरमनप्रीत कौर आणि तेजल हसबनीस या जोडीने टीम इंडियाला विजयी केलं. हरमनप्रीतने 63 बॉलमध्ये 6 फोरसह नॉट आऊट 59 रन्स केल्या. तर तेजल शून्यावर नाबाद परतली. न्यूझीलंडकडून हॅना रोवे हीने 2 विकेट्स घेतल्या. तर कॅप्टन सोफी डेव्हाईन व्यतिरिक्त फ्रॅन जोनास हीने 1 विकेट घेतली.
जिंकलो रे
3rd ODI ✅ Series ✅#TeamIndia win the third and final #INDvNZ ODI by 6 wickets and complete a 2-1 series win over New Zealand 👏
Scoreboard ▶️ https://t.co/B6n070iLqu@IDFCFIRSTBank pic.twitter.com/grwAuDS6Qe
— BCCI Women (@BCCIWomen) October 29, 2024
टीम इंडिया प्लेइंग ईलेव्हन : हरमनप्रीत कौर (कर्णधार), स्मृती मंधाना, शफाली वर्मा, यस्तिका भाटिया (विकेटकीपर), जेमिमाह रॉड्रिग्स, तेजल हसबनीस, दीप्ती शर्मा, राधा यादव, रेणुका ठाकूर सिंग, सायमा ठाकोर आणि प्रिया मिश्रा.
न्यूझीलंड प्लेइंग ईलेव्हन : सोफी डेव्हाईन (कर्णधार), सुझी बेट्स, जॉर्जिया प्लिमर, लॉरेन डाउन, ब्रुक हॅलिडे, मॅडी ग्रीन, इसाबेला गझ (विकेटकीपर), हॅना रोवे, ली ताहुहू, ईडन कार्सन आणि फ्रॅन जोनास.