WIND vs WNZ : टीम इंडियासमोर 233 धावांचं आव्हान, कोण जिंकणार मालिका?
Women India vs New Zealand 3rd Odi 1st Innings Highlights : न्यूझीलंडने टीम इंडियासमोर मालिका विजयासाठी 233 धावांचं आव्हान दिलं आहे. आता या सामन्यासह मालिकेवर कोण नाव कोरणार? हे थोड्याच वेळात स्पष्ट होईल.
वूमन्स न्यूझीलंडने तिसर्या आणि अंतिम एकदिवसीय सामन्यात टीम इंडियाला विजयासाठी 233 धावांचं आव्हान दिलं आहे. न्यूझीलंडने 49.5 ओव्हरमध्ये ऑलआऊट 232 धावा केल्या. उभयसंघातील 3 सामन्यांची मालिका 1-1 ने बरोबरीत आहे. त्यामुळे दोन्ही संघांना या तिसऱ्या समन्यासह मालिका विजयाची दुहेरी संधी आहे. मात्र एकच कुणी विजेता ठरेल. त्यामुळे दोन्ही संघात आता मालिका विजयासाठी जोरदार चुरस आणि रस्सीखेंच पाहायला मिळणार आहे. टीम इंडियाच्या गोलंदाजांनी अप्रतिम कामगिरी केली. त्यानंतर आता फलंदाजांची पाळी आहे. आता भारतीय फलंदाज न्यूझीलंडच्या गोलंदाजांसमोर कशी कामगिरी करतात? याकडे साऱ्यांचं लक्ष असणार आहे.
न्यूझीलंडची बॅटिंग
न्यूझीलंडने टॉस जिंकून बॅटिंगचा निर्णय केला. मात्र भारतीय गोलंदाजांनी न्यूझीलंडला ठराविक अंतराने झटके देत 250 धावांच्या आत रोखण्यात यश मिळवलं. न्यूझीलंडसाठी ब्रूक हॅलिडे हीने सर्वाधिक धावांचं योगदान दिलं. हॅलिडेने 96 बॉलमध्ये 3 सिक्स आणि 9 फोरसह 86 रन्स केल्या. हॅलिडे व्यतिरिक्त एकीलाही भारतीय गोलंदाजांनी मोठी खेळी करण्याआधीच मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला. जॉर्जिया प्लिमर हीने 67 चेंडूमध्ये 6 चौकारांसह 39 धावा जोडल्या. इसाबेला गझ हीने 25 धावा केल्या. तर ली ताहुहु हीने नाबाद 24 धावा जोडल्या. मॅडी ग्रीन हीने 15 रन्स केल्या. हॅना रोवेने 11 रन्स केल्या. या व्यतिरिक्त इतरांना स्वस्तात गुंडाळलं.
टीम इंडियाकडून एकूण 7 जणींनी बॉलिंग केली त्यापैकी चौघीच यशस्वी ठरल्या. दीप्ती शर्मा हीने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या. प्रिया शर्मा हीने दोघांना मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला. तर सायमा ठाकोर आणि रेणुका सिंह या दोघींनी 1-1 विकेट घेतली.
कोण जिंकणार मालिका?
Innings Break!
3️⃣ wickets for @Deepti_Sharma06 2️⃣ wickets for Priya Mishra 1️⃣ wicket each for Renuka Singh Thakur and Saima Thakor
Chase of 233 coming up shortly 👍
Scoreboard ▶️ https://t.co/B6n070idAW#TeamIndia | #INDvNZ | @IDFCFIRSTBank pic.twitter.com/ngCjqVbZmd
— BCCI Women (@BCCIWomen) October 29, 2024
टीम इंडिया प्लेइंग ईलेव्हन : हरमनप्रीत कौर (कर्णधार), स्मृती मंधाना, शफाली वर्मा, यस्तिका भाटिया (विकेटकीपर), जेमिमाह रॉड्रिग्स, तेजल हसबनीस, दीप्ती शर्मा, राधा यादव, रेणुका ठाकूर सिंग, सायमा ठाकोर आणि प्रिया मिश्रा.
न्यूझीलंड प्लेइंग ईलेव्हन : सोफी डेव्हाईन (कर्णधार), सुझी बेट्स, जॉर्जिया प्लिमर, लॉरेन डाउन, ब्रुक हॅलिडे, मॅडी ग्रीन, इसाबेला गझ (विकेटकीपर), हॅना रोवे, ली ताहुहू, ईडन कार्सन आणि फ्रॅन जोनास.