WIND vs WNZ : मेन्सनंतर वूमन्स न्यूझीलंडला मालिका विजयाची संधी, टीम इंडिया कोरणार का सीरिजवर नाव?
India Women vs New Zealand Women 3rd ODI Preview : इंडिया वूमन्स विरुद्ध न्यझीलंड वूम्नस 3 सामन्यांची मालिका 1-1 ने बरोबरीत आहे. त्यामुळे दोन्ही संघांकडे तिसऱ्या सामन्यासह मालिका जिंकण्याची बरोबरीची संधी आहे.
न्यूझीलंड मेन्स आणि वूमन्स दोन्ही संघ सध्या भारत दौऱ्यावर आहेत. टॉम लॅथम याच्या नेतृत्वात न्यूझीलंडने क्रिकेट टीमने इतिहास रचला आहे. लॅथमच्या नेतृत्वात न्यूझीलंडने भारतात पहिल्यांदाच कसोटी मालिका जिंकण्याची कामगिरी केली आहे. न्यूझीलंड या 3 सामन्यांच्या मालिकेत 2-0 ने आघाडीवर आहे. तर तिसरा आणि अंतिम सामना जिंकून त्यांच्याकडे यजमान रोहितसेनेला व्हाईटवॉश देण्याची संधी आहे. तर दुसऱ्या बाजूला टी 20 वर्ल्ड कप जिंकून आलेल्या न्यूझीलंडच्या महिला ब्रिगेडकडेही मालिका जिंकण्याची सुवर्णसंधी आहे.
वूमन्स इंडिया विरुद्ध वूमन्स न्यूझीलंड यांच्यातील 3 सामन्यांची मालिका ही 1-1 ने बरोबरीत आहे. त्यामुळे दोन्ही संघांकडे मालिका जिंकण्याची बरोबरीची संधी आहे. त्यामुळे मालिका कोण जिंकणार याकडे साऱ्यांचं लक्ष असणार आहे. मात्र टीम इंडियावर मालिका विजयासाठी काही अंशी दबाव असणार आहे, कारण ही घरातील मालिका आहे.
न्यूझीलंडकडून मालिकेत बरोबरी
दरम्यान टीम इंडियाने या मालिकेत विजयी सुरुवात करत 1-0 ने आघाडी घेतली होती. त्यामुळे टीम इंडियाकडे दुसऱ्या सामन्यास मालिका जिंकण्याची संधी होती. मात्र दुसऱ्या सामन्यात न्यूझीलंडने कमबॅक करत विजय मिळवला आणि मालिकेत 1-1 ने बरोबरी साधण्यात यश मिळवलं. त्यामुळे तिसऱ्या सामन्यासह मालिका कोण जिंकणार? याकडेच साऱ्यांचं लक्ष असणार आहे.
सामन्याला मंगळवारी 29 ऑक्टोबरला दुपारी 1 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होणार आहे. त्याआधी 1 वाजता टॉस होईल. सामना टीव्हीवर स्पोर्ट्स 18 नेटवर्कवरील चॅनेल्सवर पाहायला मिळेल. तर मोबाईलवर जिओ सिनेमा एपद्वारे मॅच पाहता येईल.
वूमन्स टीम इंडिया : हरमनप्रीत कौर (कॅप्टन), यास्तिका भाटिया (विकेटकीपर), शफाली वर्मा, स्मृती मंधाना, जेमिमाह रॉड्रिग्ज, तेजल हसबनीस, दीप्ती शर्मा, अरुंधती रेड्डी, राधा यादव, सायमा ठाकोर, प्रिया मिश्रा, दयालन हेमलता, रेणुका ठाकूर सिंग, श्रेयांका पाटील, उमा चेत्री आणि सायली सातघरे.
न्यूझीलंड वूमन्स टीम : सोफी डेव्हाईन (कॅप्टन), इसाबेला गझ (विकेटकीपर), सुझी बेट्स, जॉर्जिया प्लिमर, लॉरेन डाउन, ब्रुक हॅलिडे, मॅडी ग्रीन, जेस केर, ली ताहुहू, ईडन कार्सन, फ्रॅन जोनास, मॉली पेनफोल्ड, पॉली इंग्लिस आणि हन्ना रोवे.