WIND vs WSL Final | वूमन्स टीम इंडियाची एशियन गेम्समध्ये सुवर्ण कामगिरी, श्रीलंकावर 19 धावांनी विजय
Asian Games Womens India Women vs Sri Lanka Women Final Match Result | महिला टीम इंडियाने इतिहास रचत सुवर्ण कामगिरी केली आहे. टीम इंडियाने एशियन गेम्समध्ये पहिल्याच झटक्यात गोल्ड मेडल पटकावत ऐतिहासिक कामगिरी केली आहे.
बिजिंग | वूमन्स क्रिकेट टीम इंडियाने इतिहास रचला आहे. वूमन्स टीम इंडियाने एशियन गेम्स 2023 स्पर्धेत श्रीलंका क्रिकेट टीमवर 19 धावांनी विजय मिळवत सुवर्ण पदक पटकावलं आहे. टीम इंडियाने श्रीलंकेला विजयासाठी 117 धावांचं आव्हान दिलं होतं. मात्र टीम इंडियाच्या गोलंदाजांनी श्रीलंकेला 20 ओव्हरमध्ये 97 धावांवरच रोखलं. वूमन्स टीम इंडियाने केलेल्या या कामगिरीसाठी सर्वच स्तरातून कौतुक केलं जात आहे. तसेच वूमन्स टीम इंडियाचं अभिनंदन केलं जात आहे. सोशल मीडियावर नेटकऱ्यांचा जल्लोष पाहायला मिळत आहे.
श्रीलंकेला टीम इंडियाच्या गोलंदाजांनी सुरुवातीपासूनच झटके द्यायला सुरुवात केली. तिटास साधू हीने श्रीलंकेला पहिलेच 3 झटके देत बॅकफुटवर ढकललं. त्यामुळे टीम इंडियाला चांगली सुरुवात मिळाली. तिटासने दिलेल्या या सुरुवातीचा फायदा इतर गोलंदाजांनी घेतला. मात्र मिडल ऑर्डरमधील दोघींनी खेळी करुन सामना एकतर्फी होऊ दिला नाही. मात्र पुन्हा टीम इंडियाने कमबॅक केलं आणि श्रीलंकेला झटके दिले. टीम इंडियाला श्रीलंकेला ऑलआऊट करता आलं नाही. मात्र शानदार पद्धतीने 117 धावांचा बचाव केला.
पहिल्याच प्रयत्नात सुवर्ण पदक
HISTORIC WIN for 🇮🇳 CRICKET TEAM!
They won a Gold Medal in their first attempt at Asian Games.
Proud moment for every cricket fan. #CricketTwitter #AsianGames2023 pic.twitter.com/CLrX84eMmb
— Female Cricket (@imfemalecricket) September 25, 2023
श्रीलंकेकडून हसीनी पेरेरा हीने सर्वाधिक 25 धावा केल्या. निलाक्षी डी सिल्वा हीने 23 धावा जोडल्या. ओशाडी रनसिंगे हीने 19 धावांचं योगदान दिलं. तर कॅप्टन चमारी अथापथू 12 धावांवर परतली. या शिवाय तिघांना दुहेरी आकडाही गाठता आला नाही. एक तर आली तशीच गेली. तर दोघी प्रत्येकी 1 धावेवर नाबाद परतल्या.
टीम इंडियाकडून तितास साधू हीने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या. राजेश्वरी गायकवाड हीने 2 विकेट्स घेत श्रीलंकेला रोखलं. तर दीप्ती शर्मा, पूजा वस्त्राकर आणि देविका वैद्य या तिघांनी प्रत्येकी 1 विकेट घेत इतरांना चांगली साथ दिली.
वूमन्स टीम इंडिया प्लेईंग ईलेव्हन | हरमनप्रीत कौर (कॅप्टन), स्मृती मंधाना, शेफाली वर्मा, जेमिमाह रॉड्रिग्स, ऋचा घोष (विकेटकीपर), दीप्ती शर्मा, देविका वैद्य, अमनजोत कौर, पूजा वस्त्राकार, तीतस साधू आणि राजेश्वरी गायकवाड.
वूमन्स श्रीलंका प्लेईंग ईलेव्हन | चमारी अथापथु (कर्णधार), अनुष्का संजीवनी (विकेटकीपर), विश्मी गुणरत्ने, निलाक्षी डी सिल्वा, हसिनी परेरा, ओशादी रणसिंघे, इनोका रणवीरा, कविशा दिलहारी, उदेशिका प्रबोधनी, सुगंधिका कुमारी, इनोशी प्रियदर्शनी