IND vs WI : स्मृतीची अर्धशतकी खेळी, रिचा घोषचा फिनिशिंग टच, विंडिजसमोर ‘करो या मरो’ सामन्यात 160 धावांचं आव्हान
India Women vs West Indies Women 2nd T20I 1st Innings Highlight : मालिकेत 0-1 ने पिछाडीवर असलेल्या विंडिजला या करो या मरो सामन्यात विजयासाठी 8 च्या रनरेटने धावा करायच्या आहेत.
कर्णधार स्मृती मंधाना हीचं अर्धशतक आणि रिचा घोष हीच्या विस्फोटक खेळीच्या जोरावर वूमन्स टीम इंडियाने नवी मुंबईतील डी वाय पाटील स्टेडियममध्ये खेळवण्यात येत असलेल्या दुसऱ्या टी 20i सामन्यात विंडिजला विजयासाठी 160 धावांचं आव्हान दिलं आहे. टीम इंडियाने 20 ओव्हरमध्ये 9 विकेट्स गमावून 159 धावा केल्या. टीम इंडियाकडून स्मृती मंधाना हीने सर्वाधिक 62 धावा केल्या. तर रिचाने 17 बॉलमध्ये 6 फोरसह 32 रन्स ठोकल्या. त्यामुळे टीम इंडियाला 150 पार पोहचता आलं. आता फलंदाजांनंतर गोलंदाज या विजयी धावांचा यशस्वी बचाव करुन टीम इंडियाला मालिका जिंकून देतात की विंडिज 1-1 ने बरोबरी साधते, याकडे साऱ्यांचं लक्ष असणार आहे.
टॉस जिंकून बॅटिंगसाठी आलेल्या टीम इंडियाने ठराविक अंतराने 3 विकेट्स गमावल्या. उमा चेत्री 4, जेमिमाह रॉड्रिग्स 13 आणि राघवी बिष्ट 5 धावा करुन आऊट झाल्या. त्यामुळे टीम इंडियाची स्थिती 3 बाद 48 अशी झाली. त्यानंतर कॅप्टन स्मृती मंधाना हीने दीप्ती शर्मा हीच्यासह चौथ्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी केली. स्मृतीने या दरम्यान या मालिकेतील सलग दुसरं आणि एकूण 29 वं अर्धशतक झळकावलं. मात्र स्मृती त्यानंतर 62 धावांवर बाद झाली.
स्मृती आऊट झाल्यानंतर टीम इंडियाने झटपट विकेट्स गमावल्या. मात्र रिचा घोष हीने मिडल ऑर्डरमध्ये विस्फोटक फलंदाजी करत भरपाई केली. रिचाने 17 बॉलमध्ये 6 फोर ठोकून 32 धावा केल्या. त्यानंतर इतर फलंदाजांनी काही धावा जोडल्या. टीम इंडियाने अशाप्रकारे 20 ओव्हरमध्ये 9 विकेट्स गमावून 159 धावांपर्यंत मजल मारली. विंडिजकडून कॅप्नट हॅली मॅथ्यूज, डिआंड्रा डॉटिन, ऍफी फ्लेचे आणि चिनेल हेन्री या चौघींनी प्रत्येकी 2-2 विकेट्स घेतल्या.
विंडिजसमोर 160 धावांचं आव्हान
Innings Break! #TeamIndia post 159/9 on the board!
6⃣2⃣ for captain Smriti Mandhana 3⃣2⃣ for Richa Ghosh
Over to our bowlers now! 👍 👍
Updates ▶️ https://t.co/msHanvwQsI#INDvWI | @mandhana_smriti | @13richaghosh | @IDFCFIRSTBank pic.twitter.com/9F8DMPjAIS
— BCCI Women (@BCCIWomen) December 17, 2024
वूमन्स इंडिया प्लेइंग ईलेव्हन : स्मृती मंधाना (कर्णधार), उमा चेत्री, जेमिमाह रॉड्रिग्ज, रिचा घोष (विकेटकीपर), राघवी बिस्त, सजीवन सजना, दीप्ती शर्मा, राधा यादव, सायमा ठाकोर, तितास साधू आणि रेणुका ठाकूर सिंग.
वूमन्स विंडीज प्लेइंग इलेव्हन : हेली मॅथ्यूज (कर्णधार), कियाना जोसेफ, शेमेन कॅम्पबेले (विकेटकीपर), डिआंड्रा डॉटिन, चिनेल हेन्री, नेरिसा क्राफ्टन, शबिका गजनबी, जैदा जेम्स, अश्मिनी मुनिसार, ऍफी फ्लेचे आणि करिश्मा रामहरक.