Richa Ghosh | रिचा घोष हीचा तडाखा कायम, विंडिजविरुद्ध तोडफोड बॅटिंग

महिला टीम इंडियाने टी 20 वर्ल्ड कपमध्ये सलग दुसरा विजय मिळवला आहे. टीम इंडियाने विंडिजचा 6 विकेट्सने विजय मिळवला आहे. रिचा घोषने शानदार खेळी केली.

Richa Ghosh | रिचा घोष हीचा तडाखा कायम, विंडिजविरुद्ध तोडफोड बॅटिंग
Follow us
| Updated on: Feb 21, 2023 | 9:21 PM

केपटाउन : वूमन्स टीम इंडियाने टी 20 वर्ल्ड कपमध्ये विजयी घोडदौड सुरु ठेवली आहे. टीम इंडियाने वेस्टइंडिजचा 6 विकेट्सने विजय मिळवला आहे. वूमन्स विंडिजने टीम इंडियाला विजयासाठी 119 धावांचं आव्हान दिलं होतं. टीम इंडियाने हे आव्हान 4 विकेट्सच्या मोबदल्यात 18.1 ओव्हरमध्ये पूर्ण केलं. रिचा घोषने या सामन्यातही आपला तडाखा कायम ठेवत शानदार फलंदाजी केली. रिचा घोष हीने चौकार ठोकत टीम इंडियाला विजय मिळवून दिला. टीम इंडियाचे या विजयासह एकूण 4 पॉइंट्स झाले आहेत.

रिचा घोषचा तडाखा कायम

रिचाने 32 बॉलमध्ये 5 चौकारांच्या मदतीने नाबाद 44 धावांची खेळी केली. रिचाने टीम इंडियाला विजयासाठी अवघ्या काही धावा हव्या असताना चौकार ठोकत शानदार फिनिशिंग टच दिला. रिचाने पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यात 20 बॉलमध्ये नाबाद 31 धावा केल्या. यामध्ये 5 खणखणीत चौकारांचा समावेश होता.

चौथ्या विकेटसाठी निर्णायक भागीदारी

रिचा आणि कॅप्टन हरमनप्रीत कौर या दोघींनी तिसऱ्या विकेटसाठी निर्णायक भागीदारी केली. या दोघींनी चौथ्या विकेटसाठी 72 धावा जोडल्या. मात्र त्यानंतर हरमनप्रीत 33 धावा करुन बाद झाली.

हे सुद्धा वाचा

टीम इंडियाच्या नावावर एकूण 4 पॉइंट्स झाले आहेत. तर नेट रनरेट +0.590 इतका आहे. टीम इंडिया बी ग्रुपमध्ये दुसऱ्या स्थानावर आहे.

दरम्यान टीम इंडिया वर्ल्ड कप स्पर्धेतील आपला तिसरा सामना हा 18 फेब्रुवारीला खेळणार आहे. टीम इंडियाचा इंग्लंड विरुद्ध सामना होणार आहे.

टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड, 18 फेब्रुवारी, संध्याकाळी 6 वाजून 30 मिनिटांनी.

टीम इंडिया विरुद्ध आयर्लंड, 20 फेब्रुवारी, संध्याकाळी 6 वाजून 30 मिनिटांनी.

टीम इंडिया प्लेइंग इलेव्हन : स्मृती मंधाना, शफाली वर्मा, जेमिमा रोड्रिग्स, हरमनप्रीत कौर (कॅप्टन), ऋचा घोष (विकेटकीपर), दीप्ति शर्मा, पूजा वस्त्राकर, देविका वैद्य, राधा यादव, राजेश्वरी गायकवाड आणि रेणुका ठाकूर सिंह.

विडिंज प्लेइंग इलेव्हन : हेले मॅथ्यूज (कॅप्टन), स्टॅफनी टेलर, शेमेन कँपबेल, शबिका गजनबी, चिनले हेनरी, चेडियन नेशन, अफी फ्लेचर, शामिलिया कॉनेल, रशादा विलियम्स (विकेटकीपर), करिश्मा रामहरॅक आणि शकीरा सेलमॅन.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.