IND vs AUS: टीम इंडियाकडून कांगारुंचा 171 धावांनी धुव्वा, ऑस्ट्रेलिया दौऱ्याचा विजयी शेवट
INDA Women vs AUSA Women 3rd Odi Match Result: वूमन्स टीम इंडिया एने ऑस्ट्रेलिया दौऱ्याची सांगता विजयाने केली आहे.टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाचा मानहानीकारक पराभव केला आहे.
वूमन्स टीम इंडिया एने ऑस्ट्रेलिया दौऱ्याचा शेवट विजयाने केला आहे. टीम इंडियाने तिसऱ्या आणि अंतिम एकदिवसीय सामन्यात ऑस्ट्रेलियाला 171 धावांच्या फरकाने धुव्वा उडवला आहे. टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाला विजयासाठी 244 धावांचं आव्हान दिलं होतं. मात्र टीम इंडियाच्या गोलंदाजांसमोर कांगारुंनी गुडघे टेकले. कांगारु 22.1 ओव्हरमध्ये 72 धावांवर ऑलआऊट झाले. टीम इंडियासाठी प्रिया मिश्रा हीने सर्वाधिक 5 विकेट्स घेतल्या. तर ऑस्ट्रेलियाकडून फक्त तिघींनाच दुहेरी आकडा गाठता आला. ऑस्ट्रेलियाने या पराभवानंतर 3 सामन्यांची मालिका ही 2-1 अशा फरकाने जिंकली.
ऑस्ट्रेलियाकडून मॅडी डार्क, टेस फ्लिंटॉफ आणि चार्ली नॉट या तिघींनी सर्वाधिक धावा केल्या. मॅडी डार्क हीने सर्वाधिक 22 धावांचं योगदान दिलं. टेस फ्लिंटॉफ हीने 20 धावा केल्या. तर चार्ली नॉट हीने 11 रन्स जोडल्या. ऑस्ट्रेलियाच्या दोघींना भोपळाही फोडता आला नाही. तर 5 जणींना दुहेरी आकड्याआधीच मैदानाबाहेरचा रस्ता धरला. टीम इंडियाकडून प्रिया मिश्रा हीच्याव्यतिरिक्त कॅप्टन मिन्नू मणी हीने 2 विकेट्स घेतल्या. मेघना सिंह आणि, सोप्पधंडी यशश्री आणि साईका ईशाक या तिघींनी प्रत्येकी 1-1 विकेट घेतली.
टीम इंडियाची बॅटिंग
दरम्यान त्याआधी ऑस्ट्रेलियाने टॉस जिंकून टीम इंडियाला बॅटिंगसाठी भाग पाडलं. टीम इंडियाने 50 ओव्हरमध्ये 9 विकेट्स गमावून 243 धावांपर्यंत मजल मारली. टीम इंडियासाठी तेजल हसबनीस आणि राघवी बिष्ठ या दोघींनी प्रत्येकी अर्धशतकी खेळी केली. तेजल-राघवी या दोघींनी प्रत्येकी 50 आणि 53 अशा धावा केल्या. तर सजीवन सजना हीने 40 तर मिन्नू मणीने 34 धावांचं योगदान दिलं. किरण नवगिरेने 25 तर उमा चेत्रीने 16 धावा जोडल्या. ऑस्ट्रेलियासाठी मॅटलान ब्राउन हीने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या. निकोला हॅनकॉक आणि टेस फ्लिंटॉफ आणि या दोघींना 2-2 विकेट्स मिळाल्या.
भारतीय महिला अ संघाचा विजय
🇮🇳 Finally a win for India A 👏
They beat Australia A by a mammoth 171 Runs.
Priya Mishra was outstanding with her bowling spell of 5/14 #CricketTwitter #AUSvIND pic.twitter.com/zrnBIc7K8t
— Female Cricket (@imfemalecricket) August 18, 2024
वूमन्स ऑस्ट्रेलिया ए प्लेइंग ईलेव्हन: ताहलिया मॅकग्राथ (कॅप्टन), चार्ली नॉट, मॅडी डार्क, टेस फ्लिंटॉफ, केटी मॅक, निकोल फाल्टम (विकेटकीपर), मॅटलान ब्राउन, केट पीटरसन, लिली मिल्स, निकोला हॅनकॉक आणि ग्रेस पार्सन्स.
वूमन्स टीम इंडिया ए प्लेइंग ईलेव्हन: मिन्नू मणी (कर्णधार), किरण नवगिरे, श्वेता सेहरावत, उमा चेत्री (विकेटकीपर), तेजल हसबनीस, बिस्त राघवी, सजीवन सजना, मेघना सिंग, सोप्पधंडी यशश्री, सायका इशाक आणि प्रिया मिश्रा.