WSL vs WIRE, 1st T20i: श्रीलंकेची विजयी सलामी, आयर्लंडवर 7 विकेट्सने मात

Ireland Women vs Sri Lanka Women 1st T20I: श्रीलंका वूमन्स टीमने आपला विजयी तडाखा कायम ठेवली आहे. श्रीलंकेने आशिया कपनंतर आयर्लंडवर पहिल्या टी 20i सामन्यात 7 विकेट्सने विजय मिळवला आहे.

WSL vs WIRE, 1st T20i: श्रीलंकेची विजयी सलामी, आयर्लंडवर 7 विकेट्सने मात
harshitha samarawickrama
Follow us
| Updated on: Aug 12, 2024 | 12:55 AM

वूमन्स श्रीलंकने आशिया कप 2024 फायनलमध्ये टीम इंडियाचा धुव्वा उडवत इतिहास रचला. श्रीलंकेने तगड्या टीम इंडियाला पराभूत करत आशिया कपवर नाव कोरलं. श्रीलंकेने ही विजयी घोडदौड कायम राखत आयर्लंड विरुद्धही कायम ठेवली आहे. श्रीलंकेने आयर्लंडवर पहिल्या टी 20i सामन्यात 7 विकेट्सने मात करत विजय सलामी दिली आहे. आयर्लंडने श्रीलंकेला विजयासाठी 146 धावांचं आव्हान दिलं होतं. आयर्लंडने हे विजयी आव्हान 20 बॉलआधी 3 विकेट्स गमावून पूर्ण केलं. श्रीलंकेने 16.4 ओव्हरमध्ये 3 बाद 149 धावा केल्या. श्रीलंकेने या विजयासह 2 सामन्यांच्या या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे.

हर्षिता समरविक्रमा ही श्रीलंकेच्या विजयाची नायिका ठरली. हर्षिताने नाबाद 86 धावांची खेळी केली. हर्षिताने 45 चेंडूत 1 षटकार आणि 15 चौकार ठोकले. विश्मी गुणारत्ने हीने 34 बॉलमध्ये 30 रन्स केल्या. कविशा दिल्हारी हीने 9 धावा केल्या. कॅप्टन अनुष्का संजीवनीने 12 रन्स केल्या. तर निलाकशी डी सिल्वा हीने नाबाद 1 धाव केली. आयर्लंडकडून फ्रेया सार्जेंट, आर्लेन केली आणि लॉरा डेलनी या तिघींनी प्रत्येकी 1-1 विकेट गेली.

त्याआधी श्रीलंकेने टॉस जिंकून आयर्लंडला बॅटिंगसाठी बोलावलं. आयर्लंडने 20 ओव्हरमध्ये 6 विकेट्स गमावून 145 धावांपर्यंत मजल मारली. आयर्लंडकडून 5 फलंदाजांना चांगली सुरुवात मिळाली. मात्र एकालाही त्या खेळीचं मोठ्या आकड्यात रुपांतर करता आलं नाही. आयर्लंडसाठी एमी हंटर 17, गॅबी लुईस 39, ओरला प्रेंडरगास्ट 29, कॅप्टन लॉरा डेलनी 25 आणि रेबेका स्टोकेल 21* अशा धावा केल्या. तर श्रीलंकेकडून प्रियदर्शनी हीने सर्वाधिक 2 विकेट्स घेतल्या. तर प्रबोधिनी आणि सुगंदीका कुमारी या दोघींना 1-1 विकेट मिळाली.

श्रीलंकेची विजयी सुरुवात

आयर्लंड वूमन्स प्लेइंग ईलेव्हन : लॉरा डेलनी (कॅप्टन), एमी हंटर (विकेटकीपर), गॅबी लुईस, ओरला प्रेंडरगास्ट, लेह पॉल, रेबेका स्टोकेल, उना रेमंड-होए, आर्लेन केली, अवा कॅनिंग, कारा मरे आणि फ्रेया सार्जेंट.

श्रीलंका वूमन्स प्लेइंग ईलेव्हन : अनुष्का संजीवनी (कॅप्टन आणि विकेटकीपर), विश्मी गुणरत्ने, हर्षिता समरविक्रमा, कविशा दिलहारी, निलाक्षी डी सिल्वा, सुगंधिका कुमारी, इनोशी प्रियदर्शनी, हसिनी परेरा, सचिन निसानसाला, उदेशिका प्रबोधनी आणि अचिनी कुलसूरिया,

Non Stop LIVE Update
गौतमी अदानींच्या विरोधात अमेरिकेत फसवणुकीचा खटला दाखल, आरोप काय?
गौतमी अदानींच्या विरोधात अमेरिकेत फसवणुकीचा खटला दाखल, आरोप काय?.
'आव्हाडांनी फ्रान्सची निवडणूक लढवावी','त्या' वक्तव्यावर दरेकरांचा टोला
'आव्हाडांनी फ्रान्सची निवडणूक लढवावी','त्या' वक्तव्यावर दरेकरांचा टोला.
'लाडक्या बहिणी'चे भाऊ चीटर, मनसे नेत्याचा मुख्यमंत्री शिंदेंवर निशाणा
'लाडक्या बहिणी'चे भाऊ चीटर, मनसे नेत्याचा मुख्यमंत्री शिंदेंवर निशाणा.
'गुवाहाटीला जाण्याची गरज नाही तर...', संजय शिरसाट नवा प्रदेश शोधणार?
'गुवाहाटीला जाण्याची गरज नाही तर...', संजय शिरसाट नवा प्रदेश शोधणार?.
निकालासाठी 2 दिवस बाकी, एक्झिट पोलनंतर राजकीय पक्षांकडून हॉटेलवारी?
निकालासाठी 2 दिवस बाकी, एक्झिट पोलनंतर राजकीय पक्षांकडून हॉटेलवारी?.
निकालाआधीच बच्चू कडूंचा मोठा दावा, 'आमच्याशिवाय सत्ता स्थापन....'
निकालाआधीच बच्चू कडूंचा मोठा दावा, 'आमच्याशिवाय सत्ता स्थापन....'.
परळीत शरद पवार गटाच्या नेत्याला धुतलं, मुंडेंच्या समर्थकांकडून मारहाण?
परळीत शरद पवार गटाच्या नेत्याला धुतलं, मुंडेंच्या समर्थकांकडून मारहाण?.
निवडणुकीच्या एक्झिट पोलनंतर BJP अ‍ॅक्शन मोडवर, कोणाला साधणार संपर्क?
निवडणुकीच्या एक्झिट पोलनंतर BJP अ‍ॅक्शन मोडवर, कोणाला साधणार संपर्क?.
'तू जिंदगी भर याद..',ठाकरे गटाच्या जिल्हाप्रमुखाला जीवे मारण्याची धमकी
'तू जिंदगी भर याद..',ठाकरे गटाच्या जिल्हाप्रमुखाला जीवे मारण्याची धमकी.
राज्यात 65.02 टक्के मतदान, तुमच्या भागात किती जणांनी बजावला हक्क?
राज्यात 65.02 टक्के मतदान, तुमच्या भागात किती जणांनी बजावला हक्क?.