IND vs NZ : इंडिया-न्यूझीलंड पहिला एकदिवसीय सामना गुरुवारी, किती वाजता सुरुवात होणार?
India vs New Zealand Women 1st Odi Live Streaming : इंडिया विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील पहिला एकदिवसीय सामना हा गुरुवारी 24 ऑक्टोबरला खेळवण्यात येणार आहे. जाणून घ्या सविस्तर.
टीम इंडिया विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात गुरुवारी 24 ऑक्टोबरपासून पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियममध्ये कसोटी मालिकेतील दुसरा सामान खेळण्यात येणार आहे. तर दुसऱ्या बाजूला वूमन्स टी 20 वर्ल्ड कप विजेता न्यूझीलंड विरुद्ध टीम इंडिया यांच्यातील एकदिवसीय मालिकेला सुरुवात होणार आहे. उभयसंघात एकूण 3 सामने होणार आहेत. पहिला सामना हा अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये होणार आहे. या सामन्याला दुपारी 1 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होणार आहे. तर 1 वाजता टॉस होणार आहे. हरमनप्रीत कौर टीम इंडियाचं नेतृत्व करणार आहे. तर सोफी डिवाईन हीच्याकडे न्यूझीलंडच्या नेतृत्वाची जबाबदारी आहे.
टीम इंडिया टी 20 वर्ल्ड कप स्पर्धेतील साखळी फेरीतूनच बाहेर पडली होती. त्यामुळे कर्णधार हरमनप्रीत कौर हीच्यावर टीका करण्यात आली होती. हरमनप्रीतकडून भारतीय संघाच कर्णधारपद काढून घेणार असल्याची चर्चा होती. मात्र टीम मॅनेजमेंटने हरमनवर विश्वास दाखवत कर्णधारपदी कायम ठेवलं आहे. त्यामुळे टीम इंडियाच्या महिला ब्रिगेडचा आता वर्ल्ड कपमध्ये झालं गेलं ते विसरुन नव्याने सुरुवात करण्याचा प्रयत्न असणार आहे. मात्र भारतासमोर विश्व विजेत्या न्यूझीलंडचं आव्हान असणार आहे. वर्ल्ड कप जिंकून आलेल्या न्यूझीलंडचा विश्वास चांगलाच दुणावलेला आहे. मात्र न्यूझीलंड भारतात खेळणार आहे, हे देखील त्यांना विसरुन चालणार नाही. त्यामुळे एकूणच भारतासाठी ही मालिका प्रतिष्ठेची असणार आहे.
इंडिया वूमन्स विरुद्ध न्यूझीलंड वूमन्स पहिला सामना टीव्हीवर कुठे पाहता येणार?
इंडिया वूमन्स विरुद्ध न्यूझीलंड वूमन्स पहिला सामना टीव्हीवर स्पोर्ट्स 18 नेटवर्कवरील चॅनेल्सवर पाहायला मिळेल.
इंडिया वूमन्स विरुद्ध न्यूझीलंड वूमन्स पहिला सामना मोबाईलवर कुठे पाहायला मिळेल?
इंडिया वूमन्स विरुद्ध न्यूझीलंड वूमन्स पहिला सामना मोबाईलवर जिओ सिनेमा एपवर पाहायला मिळेल.
वनडे सीरिजसाठी न्यूझीलंड वूमन्स टीम : सोफी डिवाइन (कॅप्टन), सजी बेट्स, ईडन कार्सन, लॉरेन डाउन, इजी गेज (विकेटकीपर), मॅडी ग्रीन, ब्रूक हॉलिडे, पॉली इंग्लिस (विकेटकीपर), फ्रॅन जोनास, जेस केर, अमेलिया केर, मॉली पेनफोल्ड, जॉर्जिया प्लिमर, हन्ना रोव आणि ली ताहुहु.
न्यूझीलंड विरूद्धच्या एकदिवसीय मालिकेसाठी वूमन्स टीम इंडिया : हरमनप्रीत कौर (कॅप्टन), स्मृति मानधना (उपकर्णधार), शफाली वर्मा, डी हेमलता, दीप्ति शर्मा, जेमिमाह रोड्रिग्स, यास्तिका भाटिया (विकेटकीपर), उमा छेत्री (विकेटकीपर), सायली सातघरे, अरुंधती रेड्डी, रेणुका सिंह ठाकुर, तेजल हसबनीस, साइमा ठाकोर, प्रिया मिश्रा, राधा यादव, श्रेयांका पाटील.