WPL 2024 : वुमन्स प्रीमियर लीगमध्ये पहिली लढत मुंबई इंडियन्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स, मागच्या वर्षी असा लागला होता निकाल

वुमन्स प्रीमियर लीगमध्ये पहिलाच सामना दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध मुंबई इंडियन्स यांच्यात आहे. पहिल्या पर्वात मुंबईने दिल्लीला पराभवाची धूळ चारली होती आणि जेतेपदावर नाव कोरलं होतं. आता गेल्या स्पर्धेतील पराभवाचा वचपा दिल्ली काढणार का? की मुंबई इंडियन्स आपली सरशी कायम ठेवणार? याकडे लक्ष लागून आहे.

WPL 2024 : वुमन्स प्रीमियर लीगमध्ये पहिली लढत मुंबई इंडियन्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स, मागच्या वर्षी असा लागला होता निकाल
वुमन्स प्रीमियर लीगमध्ये दिल्ली कॅपिटल्स आणि मुंबई इंडियन्स आमनेसामने, मागच्या वर्षी अंतिम फेरीत असं झालं होतं
Follow us
| Updated on: Jan 23, 2024 | 3:33 PM

मुंबई : वुमन्स प्रीमियर लीग स्पर्धेचं वेळापत्रक समोर आलं आहे. 23 फेब्रुवारील गतविजेता मुंबई इंडियन्स आणि उपविजेता दिल्ली कॅपिटल्स संघ आमनेसामने येणार आहे. या सामन्यापासून सामन्याला सुरुवात होणार आहे. त्यामुळे गेल्या वर्षी अंतिम फेरीतील पराभवाचा वचपा दिल्ली कॅपिटल्स काढणार का? असा प्रश्न क्रीडाप्रेमी विचारत आहेत. पहिल्या पर्वातील अंतिम फेरीचा सामना अतितटीचा झाला होता. दिल्ली कॅपिटल्सने नाणेफेकीचा कौल जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. दिल्लीने 20 षटकात 9 गडी गमवून 131 धावा केल्या आणि विजयासाठी 132 धावांचं आव्हान दिलं. मुंबई इंडियन्सने हे आव्हान 3 गडी गमवून 19.3 षटकात पूर्ण केलं. मुंबई इंडियन्सचा 7 विकेट्स आणि 3 चेंडू राखून विजय झाला. मुंबई इंडियन्सकडून नॅट स्कायव्हर ब्रंट 55 चेंडूत नाबाद 60 धावा केल्या होत्या. तर कर्णधार हरमनप्रीत कौर हीने 39 चेंडूत 37 धावा केल्या होत्या.

वुमन्स प्रीमियरल लीगमध्ये मुंबई आणि दिल्लीचे सामने

  • 23 फेब्रुवारी- मुंबई इंडियन्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स (बंगळुरूमध्ये )
  • 25 फेब्रुवारी- गुजरात जायंट्स विरुद्ध मुंबई इंडियन्स (बंगळुरूमध्ये )
  • 26 फेब्रुवारी- यूपी वॉरियर्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स (बंगळुरूमध्ये )
  • 28 फेब्रुवारी – मुंबई इंडियन्स विरुद्ध यूपी वॉरियर्स (बंगळुरूमध्ये )
  • 29 फेब्रुवारी – रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स (बंगळुरूमध्ये )
  • 2 मार्च – रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध मुंबई इंडियन्स (बंगळुरूमध्ये )
  • 3 मार्च -बगुजरात जायंट्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स (बंगळुरूमध्ये )
  • 5 मार्च – दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध मुंबई इंडियन्स (दिल्लीमध्ये)
  • 7 मार्च – यूपी वॉरियर्स विरुद्ध मुंबई इंडियन्स (दिल्लीमध्ये)
  • 8 मार्च – दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध यूपी वॉरियर्स (दिल्लीमध्ये)
  • 9 मार्च – मुंबई इंडियन्स विरुद्ध गुजरात जायंट्स (दिल्लीमध्ये)
  • 10 मार्च – दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु (दिल्लीमध्ये)
  • 12 मार्च दिल्लीमध्ये – मुंबई इंडियन्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु (दिल्लीमध्ये)
  • 13 मार्च- दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध गुजरात जायंट्स (दिल्लीमध्ये)

दिल्ली कॅपिटल्स

एलिस कॅप्सी, अरुंधती रेड्डी, जेमिमाह रॉड्रिग्स, जेस जोनासेन*, लॉरा हॅरिस, मारिझान कॅप, मेग लॅनिंग, मिन्नू मणी, पूनम यादव, राधा यादव, शफाली वर्मा, शिखा पांडे, स्नेहा दीप्ती, तानिया भाटिया, तितास साधू

नवीन खरेदी: एनाबेल सदरलँड, अपर्णा मंडल, अश्विनी कुमारी

मुंबई इंडियन्स

अमनजोत कौर, अमेलिया केर, क्लो ट्रायॉन, हरमनप्रीत कौर, हेली मॅथ्यू, हुमैरा काझी, इसाबेल वोंग, जिंतिमनी कलिता, नताली स्कायव्हर, पूजा वस्त्राकर, प्रियांका बाला, सायका इशाक, यास्तिका भाटिया

नवीन खरेदी: शबनीम इस्माईल, अमनदीप कौर, एस सजना, फातिमा जाफर, कीर्थना बालकृष्णन

दिल्लीत केजरीवाल जिंकणार? महाराष्ट्रातील काँग्रेसच्या नेत्याचं वक्तव्य
दिल्लीत केजरीवाल जिंकणार? महाराष्ट्रातील काँग्रेसच्या नेत्याचं वक्तव्य.
'मुंडेंचे चिल्लर चाळे अन्...',पैठणच्या मोर्च्यात जरांगेंचा राग अनावर
'मुंडेंचे चिल्लर चाळे अन्...',पैठणच्या मोर्च्यात जरांगेंचा राग अनावर.
'लाडकी बहीण'चा अध्यक्ष वाल्मिक कराडच, 14 गुन्हे तरीही मुंडेंची शिफारस
'लाडकी बहीण'चा अध्यक्ष वाल्मिक कराडच, 14 गुन्हे तरीही मुंडेंची शिफारस.
'कोणाला तिकडे जायचं असेल तर त्यांनी...', बैठकीत जयंत पाटील आक्रमक?
'कोणाला तिकडे जायचं असेल तर त्यांनी...', बैठकीत जयंत पाटील आक्रमक?.
शरद पवारांकडून RSS चं कौतुक; 'हातचा मळ असा समज अन् गाफिल राहिलो, पण..'
शरद पवारांकडून RSS चं कौतुक; 'हातचा मळ असा समज अन् गाफिल राहिलो, पण..'.
पवार बाप-लेकीला सोडून दादांचा नवा प्लॅन? सुनील तटकरेंचं प्रपोजल काय?
पवार बाप-लेकीला सोडून दादांचा नवा प्लॅन? सुनील तटकरेंचं प्रपोजल काय?.
चोराकडे न्याय मागत होती,पंकजाही धुतल्या तांदळासारखी नाही,मामीकडून आरोप
चोराकडे न्याय मागत होती,पंकजाही धुतल्या तांदळासारखी नाही,मामीकडून आरोप.
वाल्मिक कराडला CID ऑफिसमध्ये सोडणारा मुक्त अन् 'त्याची' गाडी जप्त
वाल्मिक कराडला CID ऑफिसमध्ये सोडणारा मुक्त अन् 'त्याची' गाडी जप्त.
मुंडेंचं मंत्रिपद वाचणार की जाणार? दादांनी घेतली दिल्लीत शहांची भेट
मुंडेंचं मंत्रिपद वाचणार की जाणार? दादांनी घेतली दिल्लीत शहांची भेट.
महाराष्ट्रातील असं एक गाव जिथं माणसं आपोआप होतात टकले, नेमक काय घडतय?
महाराष्ट्रातील असं एक गाव जिथं माणसं आपोआप होतात टकले, नेमक काय घडतय?.