ICC W T20 World Cup 2023 | ‘प्लेअर ऑफ टूर्नामेंट’साठी 9 जणांमध्ये चुरस, टीम इंडियाच्या एकीचा समावेश

आयसीसीने या संपूर्ण स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी केलेल्या 9 क्रिकेटपटूंची नावं घोषित केली आहेत. या 9 खेळाडूंमध्ये टीम इंडियाच्या एकाच खेळाडूची निवड करण्यात आली आहे.

ICC W T20 World Cup 2023 | 'प्लेअर ऑफ टूर्नामेंट'साठी 9 जणांमध्ये चुरस, टीम इंडियाच्या एकीचा समावेश
Follow us
| Updated on: Feb 25, 2023 | 7:27 PM

मुंबई | आयसीसी वूमन्स टी 20 वर्ल्ड कप स्पर्धेतील टीम इंडियाचं आव्हान संपुष्टात आलं आहे. पहिल्या सेमी फायनल सामन्यात ऑस्ट्रेलियाने टीम इंडियाचा 5 धावांनी पराभव केला. यासह टीम इंडियाचं पुन्हा एकदा वर्ल्ड चॅम्पियन होण्याचं स्वप्न भंगलं. तर दुसऱ्या सेमीफायनलमध्ये दक्षिण आफ्रिकेने इंग्लंडचा पराभव केला. आता वर्ल्ड कप ट्रॉफीसाठी ऑस्ट्रेलिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यात कडवी झुंज पाहायला मिळणार आहे. हा अंतिम सामना हा रविवारी 26 फेब्रुवारीला खेळवण्यात येणार आहे. त्याआधी आयसीसीने या संपूर्ण स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी केलेल्या 9 क्रिकेटपटूंची नावं घोषित केली आहेत.

या 9 खेळाडूंमध्ये टीम इंडियाच्या एकाच खेळाडूची निवड करण्यात आली आहे. यामध्ये विकेटकीपर बॅट्समन रिचा घोष हीला नामांकन मिळालं आहे. या 9 पैकी एका खेळाडूला आयसीसी प्लेअर ऑफ टुर्नामेंट या पुरस्काराने गौरवणार आहे. प्लेअर ऑफ टुर्नामेंट ठरवण्यासाठी आयसीसीने व्होटिंगचा पर्याय ठेवला आहे. त्यानुसार क्रिकेच चाहते या 9 पैकी आपल्या आवडत्या खेळाडूला व्होट देऊ शकतात.

टीम इंडियाची रिचा आयसीसीच्या या 9 जणांच्या यादीत 6 व्या स्थानावर आहे. रिचाने या स्पर्धेतील साखळी फेरीत अतिशय उल्लेखनीय कामगिरी केली. रिचाने टीम इंडियाला सेमीफायनलमध्ये पोहचवण्यात महत्त्वाची भूमिका बजावली.

हे सुद्धा वाचा

टीम इंडिया साखळी फेरीत अनुक्रमे पाकिस्तान, विंडिज, इंग्लंड आणि आयर्लंड या 4 टीम विरुद्ध भिडली. या 4 पैकी आयर्लंडचा अपवाद वगळता रिचाने 3 सामन्यात बॅटिंगने धमाका केला.

रिचाने पाकिस्तान विरुद्ध 20 बॉलमध्ये नाबाद 31 धावा केल्या होत्या. यामध्ये 5 खणखणीत चौकारांचा समावेश होता. तसेच विंडिज विरुद्ध 32 बॉलमध्ये 5 चौकारांच्या मदतीने नाबाद 44 धावांची खेळी केली.रिचाने टीम इंडियाला विजयासाठी अवघ्या काही धावा हव्या असताना चौकार ठोकत शानदार फिनिशिंग टच दिला होता.

तर इंग्लंड विरुद्ध 34 बॉलमध्ये 4 चौकार आणि 2 सिक्समध्ये 47 धावांची खेळी केली. मात्र रिचा आयर्लंड विरुद्ध अपयशी ठरली. रिचा आयर्लंड विरुद्ध पहिल्याच बॉलवर आऊट झाली होती. मात्र रिचाला सेमीफायनलमध्ये धमाका करता आला नाही. रिचाने ऑस्ट्रेलिया विरुद्ध 14 धावा केल्या. अशा प्रकारे रिचाने वर्ल्ड कपमधील 5 सामन्यांमध्ये 136 धावा केल्या. तसेच शानदार विकेटकीपींगही केली.

आयसीसीकडून नामांकन मिळालेले 9 खेळाडू

1. ताजमिन ब्रित्स (दक्षिण आफ्रिका)

2. एश्ले गार्डनर(ऑस्ट्रेलिया)

3. लौरा वोलावार्ड (दक्षिण आफ्रिका)

4. मॅग लॅनिंग (ऑस्ट्रेलिया)

5. एलिसा हिली (ऑस्ट्रेलिया)

6. रिचा घोष (टीम इंडिया)

7. नेट साईवर (इंग्लंड)

8. सोफी एक्लेस्टोन (इंग्लंड)

9. हेले मॅथ्यूज (विंडिज)

खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.