IND W vs AUS W | टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियाकडून पराभव, पूजा वस्त्राकरची तुफानी खेळी व्यर्थ
IND W vs AUS W : वुमन्स टीम इंडिया आणि वुमन्स साऊथ आफ्रिका यांच्यात झालेल्या पहिल्या वन डे सामन्यामध्ये टीम इंडियाचा पराभव झाला आहे. या सामन्यात विजय मिळवत ऑस्ट्रेलिया संघाने तीन सामन्यांच्या मालिकेत 1-0 ने आघाडी घेतली आहे.
मुंबई : वुमन्स टीम इंडिया आणि वुमन्स ऑस्ट्रेलियामध्ये झालेल्या पहिल्या वन डे सामन्यामध्ये टीम इंडियाचा पराभव झाला आहे. वानखेडेवर झालेल्या वन डे सामन्यात टीम इंडियाने टॉस जिंकत प्रथम फलंदाजी करताना 50 ओव्हरमध्ये 282-8 धावा केल्या होत्या. आव्हानाचा वुमन्स ऑस्ट्रेलिया संघाने यशस्वीपणे पाठलाग करताना 47 व्या ओव्हरमध्ये विजय मिळवला. ऑस्ट्रेलिया संघाकडून फोबी लिचफील्ड एलिस पेरी आणि ताहलिया मॅकग्रा यांनी अर्धशतकी खेळी करत विजयाचा पाया रचला. तीन सामन्यांच्या मालिकेत ऑस्ट्रेलिया संघाने 1-0 ने आघाडी घेतली आहे.
टीम इंडियाचा डाव
टीम इंडियाकडून सलामीला आलेली शफाली वर्मा परत एकदा अपयशी ठरली. यास्तिका भाटिया 49 धावा, जेमिमाफ रॉड्रिग्स 87 धावा आणि ऑल राऊंडर पूजा वस्त्राकर हिने आक्रमक खेळ अर्धशतकी खेळी केली. जेमिमाहने 77 चेंडूत 82 धावांची खेळी केली, यामध्ये तिने सात चौकार मारले. तर पूजाने अवघ्या 46 चेंडूत 62 धावा केल्या, यामध्ये तिने सात चौकार आणि दोन षटकार मारले. हरमनप्रीत कौर, रिचा घोष, अमनज्योत कौर यांना मोठी खेळी करता आली नाही. पूजा वस्त्राकर हिने केलेल्या आक्रमक अर्धशतकी खेळीच्या जोरावर टीम इंडियाने तीनशेच्या आसपासचा टप्पा गाठला.
ऑस्ट्रेलियाचा डाव
टीम इंडियाने दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या ऑस्ट्रेलिया संघाचीही सुरूवात काही खास झाली नाही. पहिल्याच ओव्हरमध्ये ऑस्ट्रेलियाला रेणूका ठाकूर हिने अॅलिसा हिलीला शून्यावर माघारी पाठवलं होतं. या विकेटनंतर टीम इंडियाच्या गोलंदाजांना विकेटसाठी चांगलाच संघर्ष करावा लागला. फोबी लिचफील्ड आणि एलिस पेरी यांनी 148 धावांची भागीदारी केली होती. स्नेह राणा हिने एलिस पेरीला 75 धावांवर आऊट करत ही जोडी फोडली. त्यानंतर काही ओव्हरच्या अंतराने दीप्ती शर्मा हिने लिचफील्ड हिला 78 धालांवर माघारी पाठवलं.
दरम्यान, ताहलिया मॅकग्रा आणि बेथ मुनी यांनी चांगली भागीदारी करत विजयाचा पाया रचला. मात्र बेथ मुनीला पूजा वस्त्राकरने 42 धावांवर बोल्ड केलं. त्यानंतर अॅशले गार्डनर आणि मॅकग्रा यांनी विजयावर शिक्कामोर्तब केलं.
भारतीय महिला (प्लेइंग इलेव्हन): जेमिमाह रॉड्रिग्स, शफाली वर्मा, हरमनप्रीत कौर (C), दीप्ती शर्मा, यास्तिका भाटिया (W), रिचा घोष, स्नेह राणा, अमनजोत कौर, पूजा वस्त्राकर, रेणुका ठाकूर सिंग, सायका इशाक
ऑस्ट्रेलिया महिला (प्लेइंग इलेव्हन): फोबी लिचफील्ड, अॅलिसा हिली (C/W), एलिस पेरी, बेथ मूनी, ताहलिया मॅकग्रा, अॅशले गार्डनर, अॅनाबेल सदरलँड, जॉर्जिया वेरहॅम, अलाना किंग, मेगन शट, डार्सी ब्राउना