INDW vs AUSW 2nd ODI | टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाला रोखलं, जिंकण्यासाठी इतक्या धावांचं आव्हान; दीप्ती शर्माचा पंजा

IND W AUS W 2nd ODI : वुमन्स टीम इंडिया आणि वुमन्स ऑस्ट्रेलियामधील दुसरा वनडे सामना वानखेडे मैदानावर सुरू आहे. या सामन्यामध्ये ऑस्ट्रेलिया संघाने टॉस जिंकत प्रथम बॅटींगचा निर्णय घेतला होता.

INDW vs AUSW 2nd ODI | टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाला रोखलं, जिंकण्यासाठी इतक्या धावांचं आव्हान; दीप्ती शर्माचा पंजा
IND W vs AUS W Secod ODI
Follow us
| Updated on: Dec 30, 2023 | 6:11 PM

मुंबई : वुमन्स टीम इंडिया आणि वुमन्स ऑस्ट्रेलियामध्ये दुसरा वन डे सामना सुरू आहे. या सामन्यात ऑस्ट्रिलिया संघाने टॉस जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. ऑस्ट्रेलिया संघाने 50 ओव्हरमध्ये 258-8 धावा केल्या असून सलामीवीर फोबी लिचफिल्डने सर्वाधिक 63 धावांची खेळी केली. त्यानंतर एलिस पेरीने 50 धावांची खेळी केली. तर टीम इंडियाकडून स्पिनर दीप्ती शर्मा हिने सर्वाधिक पाच विकेट घेतल्या. आता फलंदाजांना आपला खेळ दाखवावा लागणार असून जिंकण्यासाठी 258 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करण्यात टीम इंडिया यशस्वी होते की नाही हे पाहावं लागणार आहे.

ऑस्ट्रेलियाची बॅटींग

ऑस्ट्रेलिया संघ बॅटींगला उतरल्यावर एक चांगली सुरूवात झाली होती. फोबी लिचफिल्ड आणि अॅलिसा हिली सेट झाल्या होत्या त्यावेळी पूजा वस्त्राकरने अॅलिसा हिलीला 13 धावांवर माघारी पाठवलं. त्यानंतर दुसऱ्या विकेटसाठी वाट पाहावी लागली, अॅलिसा हिली आणि एलिस पेरी यांनी चांगली भागीदारी केली होती. वेगवान गोलंदाजांना विकेट मिळत नव्हती. हरमनुप्रीत कौर हिने स्पिनर्स काढले, पिचवर स्पिनर्सला मदत मिळत होती, दीप्ती शर्माने ऑस्ट्रेलियाला धक्क्यावर धक्के दिले. दीप्ती शर्माने पाच विकेट घेतल्या. पदार्पणवीर श्रेयांका पाटील हिने एक विकेट घेतली तर स्नेह राणा हिनेही एक विकेट घेतली.

ऑस्ट्रेलिया संघाकडून फोबी लिचफिल्डने सर्वाधिक 63 धावा केल्या. यामध्ये तिने सहा चौकार मारले. तर एलिसा पेरीने केलेल्या 50 धावांमध्ये पाच चौकार आणि एक षटकार मारला. शेवटला अलाना किंग हिने अवघ्या 17 बॉलमध्ये तीन षटकार मारत 27 धावा केल्या. किंगने केलेल्या फटकेबाजीच्या जोरावर ऑस्ट्रेलिया संघाने 250 चा टप्पा पार केला.

भारतीय महिला (प्लेइंग इलेव्हन): स्मृती मानधना, यास्तिका भाटिया, जेमिमाह रॉड्रिग्स, हरमनप्रीत कौर (C), दीप्ती शर्मा, रिचा घोष (डब्ल्यू), स्नेह राणा, अमनजोत कौर, पूजा वस्त्राकर, श्रेयंका पाटील, रेणुका ठाकूर सिंग

ऑस्ट्रेलिया महिला (प्लेइंग इलेव्हन): अॅलिसा हिली (W/C), फोबी लिचफिल्ड, एलिस पेरी, बेथ मूनी, ताहलिया मॅकग्रा, अॅशले गार्डनर, अॅनाबेल सदरलँड, जॉर्जिया वेअरहम, अलाना किंग, किम गर्थ, डार्सी ब्राउन

'एक खून करून पोट भरलं नाही?', जरांगे पाटलांचा थेट मुंडेंवर आरोप
'एक खून करून पोट भरलं नाही?', जरांगे पाटलांचा थेट मुंडेंवर आरोप.
'कोल्हेंच्या वक्तव्याची कीव, त्यांनीही...'; मित्रपक्षांकडून टीकास्त्र
'कोल्हेंच्या वक्तव्याची कीव, त्यांनीही...'; मित्रपक्षांकडून टीकास्त्र.
शरद पवार गटात अलबेल नाही? सत्तेत सहभागी होण्यासाठी 2 मतप्रवाह?
शरद पवार गटात अलबेल नाही? सत्तेत सहभागी होण्यासाठी 2 मतप्रवाह?.
वाल्मिक कराड लाडकी बहीण योजनेचा अध्यक्ष, बावनकुळेंचं समर्थन? म्हणाले..
वाल्मिक कराड लाडकी बहीण योजनेचा अध्यक्ष, बावनकुळेंचं समर्थन? म्हणाले...
'मुन्नीचं लय प्रेम पण ती बोलना, बोलली तर मुन्नीचे कपडे टराटरा...'
'मुन्नीचं लय प्रेम पण ती बोलना, बोलली तर मुन्नीचे कपडे टराटरा...'.
'EVM म्हणजे एव्हरी व्होट अगेन्स्ट मुल्ला',भाजपचा बडा नेता काय म्हणाला?
'EVM म्हणजे एव्हरी व्होट अगेन्स्ट मुल्ला',भाजपचा बडा नेता काय म्हणाला?.
'ठाकरे गट झोपेत, काँग्रेसची मोडलेली पाठ..',कोल्हेंच्या वक्तव्यानं खळबळ
'ठाकरे गट झोपेत, काँग्रेसची मोडलेली पाठ..',कोल्हेंच्या वक्तव्यानं खळबळ.
वडेट्टीवारांचा गंभीर आरोप, 'मविआ'ला फटका बसण्याचं सांगितलं कारण
वडेट्टीवारांचा गंभीर आरोप, 'मविआ'ला फटका बसण्याचं सांगितलं कारण.
...म्हणून शरद पवार महाविकास आघाडीत नाराज, मोठी माहिती समोर
...म्हणून शरद पवार महाविकास आघाडीत नाराज, मोठी माहिती समोर.
काँट्रॅक्ट द्यायचं असेल तर कराडशी संपर्क साधा.', आव्हाडांचं गंभीर आरोप
काँट्रॅक्ट द्यायचं असेल तर कराडशी संपर्क साधा.', आव्हाडांचं गंभीर आरोप.