IND W vs AUS W | टीम इंडियाने वानखेडेवर रचला इतिहास, ऑस्ट्रेलियावर पहिला कसोटी विजय
India Women vs Australia Women : वुमन्स टीम इंंडियाने वुमन्स ऑस्ट्रेलिया संघावर 8 विकेटने विजय मिळवला आहे. टीम इंडियाच्या पोरींनी दमदार कामगिरी करत वानखेडेवर इतिहास रचला आहे.
मुंबई : वुमन्स टीम इंडिया आणि वुमन्स ऑस्ट्रेलिया यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्यात ऐतिहासिक विजय मिळवला आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्ध वानखेडे कसोटी सामना 8 विकेटने जिंकला आहे. पाच दिवसांच्या कसोटीमध्ये चौथ्याच दिवशी ऑस्ट्रेलियाला चारी मुंड्या चीत केलं आहे. ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करताना पहिल्या डावात धावा केल्या होत्या. टीम इंडिआने 406 धावा करत आघाडी घेतली होती. ऑस्ट्रेलियाने दुसऱ्या डावातही काही खास कामगिरी केली नाही. अवघ्या 261 धावांवर दुसरा डाव आटोपला, टीम इंडियाने चौथ्या दिवशी अवघ्या 75 धावांचं लक्ष्य पूर्ण करत ऑस्ट्रेलियावर पहिला कसोटी विजय मिळवला.
𝙃𝙄𝙎𝙏𝙊𝙍𝙔 𝙄𝙉 𝙈𝙐𝙈𝘽𝘼𝙄! 🙌#TeamIndia women register their first win against Australia in Test Cricket 👏👏
Scorecard ▶️ https://t.co/7o69J2XRwi#INDvAUS | @IDFCFIRSTBank pic.twitter.com/R1GKeuRa69
— BCCI Women (@BCCIWomen) December 24, 2023
वुमन्स टीम इंडिया आणि वुमन्स ऑस्ट्रेलिया संघांमध्ये 1977 पासून कसोटी साामने सुरू झाले. मात्र दोन्ही संघांमध्ये जास्त सामने झाले नाहीत. टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलियामध्ये अवघे 12 कसोटी सामने झालेत त्यामधील 4 सामन्यात ऑस्ट्रेलिया संघाने विजय मिळवला आहे. तर उर्वरित 6 सामने हे अनिर्णित राहिले आहेत.
याआधी टीम इंडियाच्या कोणत्याही महिला कर्णधाराला ऑस्ट्रेलियाविरूद्ध विजय मिळवता आला नाही. कसोटी क्रिकेटमध्ये या विजयाची इतिहासात नोंद केली जाणार आहे. हरमनप्रीत कौर अँड कंपनीने हा कारनामा करत इतिहास रचला आहे. वानखेडेचं मैदान आणखी एका इतिहासाचा साक्षीदार राहिलं आहे.
दरम्यान, दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेमध्ये टीम इंडियाने 1-0 ने आघाडी घेतली आहे. एकमेव कसोटी सामन्यामध्ये विजय मिळवत टीम इंडियाने इतिहास रचला आहे. आता तीन सामन्यांची वनडे मालिका होणार आहे. या मालिकेला 28 डिसेंबरपासून सुरूवात होणार आहे. दुसरा सामना 30 डिसेंबर आणि तिसरा सामना 2 जानेवारीला पार पडणार आहे.