INDW vs BANW, 1st Semi Final: बांगलादेशचा टीम इंडिया विरुद्ध टॉस जिंकून बॅटिंगचा निर्णय

| Updated on: Jul 26, 2024 | 2:14 PM

India Women vs Bangladesh Women 1st Semi Final Toss: टीम इंडिया-बांगलादेश यांच्यात अंतिम फेरीत पोहचण्यासाठी कडवी झुंज पाहायला मिळणार आहे. बांगलादेशने या महत्त्वाच्या सामन्यात टॉस जिंकला आहे.

INDW vs BANW, 1st Semi Final: बांगलादेशचा टीम इंडिया विरुद्ध टॉस जिंकून बॅटिंगचा निर्णय
wind vs wban semi final toss
Image Credit source: acc x account
Follow us on

वूमन्स आशिया कप 2024 स्पर्धेतील उपांत्य फेरीतील पहिल्या सामन्यात टीम इंडिया विरुद्ध बांगलागदेश आमनेसामने आहेत. हरमनप्रीत कौर हीच्याकडे भारतीय संघाचं नेतृत्व आहे. तर निगर सुल्ताना ही बांगलादेशची धुरा सांभाळत आहे. या सामन्याचं आयोजन हे रणगिरी दांबुला आंतरराष्ट्रीय स्टेडियम येथे करण्यात आलं आहे. सामन्याला भारतीय वेळेनुसार दुपारी 2 वाजता सुरुवात होणार आहे. त्याआधी 1 वाजून 30 मिनिटांनी टॉस झाला. बांगलादेशच्या बाजूने नाणेफेकीचा कौल लागला. बांगलादेश कॅप्टन निगर सुल्ताना हीने बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे आता भारतीय गोलंदाज बांगलादेशला किती धावांवर रोखणार? याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष असणार आहे.

दोन्ही संघात बदल

टीम इंडियात तब्बल 3 बदल करण्यात आले आहेत. त्यानुसार सजना सजीवन आणि अरुंधती रेड्डी यांच्या जागी हरमनप्रीत कौर आणि पूजा वस्त्राकर याचं कमबॅक झालं आहे. या दोघींना साखळी फेरीतील नेपाळ विरुद्धच्या सामन्यासाठी विश्रांती देण्यात आली होती. तसेच स्मृती मंधानाने नेतृत्व केलं होतं. मात्र सेमी फायनलसाठी या दोघी परतल्या आहेत. तसेच दयालन हेमलता हीच्या जागी उमा चेत्री हीचा समावेश करण्यात आला आहे. तर बांगलादेशने प्लेइंग ईलेव्हनमध्ये एकमेव बदल केला आहे. मारुफा अक्टर ही सबिकुन नहर जेस्मिनची जागा आली आहे.

टीम इंडिया-बांगलादेशची साखळी फेरीतील कामगिरी

दरम्यान टीम इंडियाने साखळी फेरीतील एकूण तिन्ही सामन्यात विजय मिळवला आहे. टीम इंडियाने पाकिस्तान यूएई आणि नेपाळचा पराभव केला. तर बांगलादेशने थायलंड आणि मलेशिया विरुद्ध विजय मिळवला. त्यांची पराभवाने सुरुवात झाली. श्रीलंकेने विजयी सलामी देत बांगलादेशचा धुव्वा उडवला. मात्र त्यानंतर बांगलादेशने सलग 2 सामने जिंकत सेमी फायनलचं तिकीट मिळवंल. त्यानंतर आता सेमी फायनलमध्ये कोण बाजी मारतं? हे येत्या काही वेळातच स्पष्ट होईल.

बांगलादेशच्या बाजूने नाणेफेकीचा कौल

वूमन्स टीम इंडिया प्लेइंग ईलेव्हन : हरमनप्रीत कौर (कर्णधार), शफाली वर्मा, स्मृती मानधना, उमा चेत्री, जेमिमाह रॉड्रिग्स, रिचा घोष (विकेटकीपर), दीप्ती शर्मा, पूजा वस्त्राकर, राधा यादव, तनुजा कंवर आणि रेणुका ठाकूर सिंग.

बांगलादेश वूमन्स प्लेइंग ईलेव्हन : निगार सुल्ताना (कॅप्टन आणि विकेटकीपर), दिलारा अक्टर, मुर्शिदा खातून, रुमाना अहमद, इश्मा तंजीम, रितू मोनी, राबेया खान, शोर्ना अक्टर, नाहिदा अक्टर, जहांआरा आलम आणि मारुफा अक्टर.