Womens Asia Cup 2024: टीम इंडिया-पाकिस्तानची सेमी फायनलमध्ये धडक, अंतिम फेरीत आमनेसामने येणार?
Womens Asia Cup 2024 Semi Final India Pakistan: टीम इंडिया आणि पाकिस्तान या 2 कट्ट्रर प्रतिस्पर्ध्यांनी वूमन्स आशिया कप स्पर्धेत सेमीफायनलमध्ये धडक मारली आहे.
वूमन्स टीम इंडियाने आशिया कप स्पर्धेतील दहाव्या सामन्यात स्मृती मंधाना हीच्या नेतृत्वात नेपाळवर मात करत सलग तिसरा विजय मिळवला आहे. टीम इंडियाने नेपाळला 82 धावांनी पराभवाची धुळ चारली. टीम इंडियाने नेपाळसमोर 179 धावांचं आव्हान ठेवलं होतं. मात्र नेपाळला भारतीय गोलंदाजांनी बांधून ठेवलं. त्यामुळे त्यांना काहीच करता आलं नाही. नेपाळला 20 ओव्हरमध्ये 9 विकेट्स गमावून 96 धावांपर्यंतच धडक मारता आली. नेपाळचा यासह या स्पर्धेतील प्रवास संपला. तर टीम इंडियाने 3 विजयांसह आणि पहिल्या क्रमांकासह सेमी फायनलमध्ये प्रवेश केला आहे. तसेच कट्टर प्रतिस्पर्धी असलेल्या पाकिस्ताननेही उपांत्य फेरीत धडक मारली आहे. इंडिया-पाकिस्ताने ए ग्रुपमध्ये सेमी फायलनमध्ये प्रवेश मिळवला आहे. तर बी ग्रुपमधून श्रीलंकेचा प्रवेश जवळपास निश्चित आहे. तर दुसऱ्या स्थानासाठी थायलंड आणि बांग्लादेश यांच्यात रस्सीखेच आहे.
सेमी फायनलमधील सामने केव्हा?
साखली फेरीतील शेवटचे 2 सामने हे 24 जुलै रोजी पार पडणार आहेत. त्यानंतर उर्वरित 2 संघ निश्चित होतील. त्यानंतर 26 आणि 28 जुलैला दोन्ही सेमी फायनल सामने होणार आहेत. पहिल्या सेमी फायनलमध्ये टीम इंडिया विरुद्ध बी ग्रुपमधील दुसरी टीम (A1 vs B2) भिडणार आहे. तर दुसऱ्या सेमी फायनलमध्ये पाकिस्तान आणि बी ग्रुपमधील नंबर 1 टीम (B1 vs A2) असा सामना होणार आहे.
इंडिया-पाकिस्तान फायनल?
दरम्यान टीम इंडिया आणि पाकिस्तान या दोन्ही संघांनी सेमी फायनलमधील सामने जिंकल्यास क्रिकेट चाहत्यांना महामुकाबला पाहायला मिळू शकतो. दोन्ही संघ या स्पर्धेत साखळी फेरीत आमनेसामने आले होते. तेव्हा भारताने पाकिस्तानवर विजय मिळवला होता. त्यामुळे आता आशिया कप स्पर्धेत क्रिकेट चाहत्यांना महामुकाबला पाहायला मिळणार का? हे येत्या काही दिवसातच स्पष्ट होईल.
टीम इंडिया सेमी फायनलमध्ये
𝙄𝙣𝙩𝙤 𝙩𝙝𝙚 𝙎𝙚𝙢𝙞𝙨!#TeamIndia continue their winning run in #WomensAsiaCup2024 👏👏
Scorecard ▶️ https://t.co/PeRykFLdTV#ACC | #INDvNEP pic.twitter.com/8Eg77qAJOt
— BCCI Women (@BCCIWomen) July 23, 2024
आशिया कप 2024 स्पर्धेसाठी वूमन्स टीम इंडिया: हरमनप्रीत कौर (कॅप्टन), स्मृती मंधाना (उपकर्णधार), शफाली वर्मा, दीप्ती शर्मा, जेमिमा रोड्रिग्स, ऋचा घोष (विकेटकीपर), उमा छेत्री (विकेटकीपर), पूजा वस्त्राकार, अरुंधती रेड्डी, रेणुका सिंह ठाकुर, दयालन हेमलता, आशा शोभना, राधा यादव, श्रेयंका पाटील आणि सजाना संजीवन.
वूमन्स पाकिस्तान क्रिकेट टीम: निदा डार (कॅप्टन), आलिया रियाज, डायना बेग, फातिमा सना, गुल फिरोजा, इरम जावेद, मुनीबा अली, नजीहा अल्वी, नाशरा संधू, ओमैमा सोहेल, सादिया इकबाल, सिदरा अमीन, सैयदा अरूब शाह, तस्मिया रुबाब आणि तुबा हसन.